(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अन्न आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन

जागतिक व्यापार संस्थांचे नियम आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता यामुळे कृषी आधारित उद्योग/व्यवसायाच्या व्यवस्थापनास महत्व मिळतेय. या क्षेत्रातील व्यवस्थापन तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनौसह देशातील काही महत्वाच्या संस्थांनी, “एमबीए इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट” हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या उद्योगाच्या सुयोग्य व्यवस्थापन व्युहनीतीसाठी  या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे.

अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

(१) कृषी आधारित व्यवसाय/उद्योग वाढीसाठी आवश्यक नेतृत्व/ उद्योजकांची निर्मिती व्हावी.या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक दृष्टी, कौशल्य आणि समज मिळावी या अनुषंगानं या अभ्यासक्रमात विषय घटकांचा समावेश करण्यात आलाय.(२)  पहिल्या वर्षामध्ये नियमित स्वरुपाच्या एमबीएसाठी विषय शिकवले जातात, मात्र दुसऱ्या वर्षी कृषी-व्यवसाय/उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे विषयांवर लक्ष केंद्रित केलं जातं. (३) नामवंत एमबीए महाविद्यालयातील ॲग्री- बिझिनेस व्यवस्थापन शाखेच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून प्लेसमेंट मिळालेय. (४) या क्षेत्रातील व्यवस्थापकांना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगली वेतनवाढ दिली जात असल्याचे दिसून येतं.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात ढोबळमानाने पुढील बाबींचा समावेश करण्यात येतो.  (१) कृषी आणि खाद्दाने धोरण, (२) कृषीक्षेत्रासाठी लागणारे वित्त, (३) कृषी उत्पादनांचे विपणन (मार्केटिंग), (४) अन्नपदार्थांच्या विपणनासाठी व्युहनीती, (५) कृषी-उद्यो प्रकल्पांचे व्यवस्थापन, (६) बाजाराचे संशोधन (मार्केट रिसर्च) आणि माहितीची कार्यप्रणाली, (७) आंतरराष्ट्रीय कृषी-अन्न व्यापार, (८) कृषी व्यवसायाच्या अनुषंगाने मूल्य साखळी व्यवस्थापन, (९) कृषी उद्योगासाठी लागणारी सर्जनशीलता,नावीन्यता, उद्योजकतेचे कौशल्य, विविध प्रकारच्या संबंधांची साखळी (नेटवर्किंग), (१०) अन्न आणि कृषी उद्योसंदर्भात आंतरराष्ट्रीय व्युहनीती आणि आंतरराष्ट्रीय संस्था, (११) सूक्ष्म वित्त व्यवस्थापन, (१२) अन्न पुरवठा साखळी व्यवस्थापन, (१३) क्षमतावृध्दीचे विश्लेषण आणि क्षमताबांधणी, (१४) सार्वजनिक धोरण, (१५) सामाजिक उद्योजकता– सामाजिक बदलासाठीचे नावीन्यपूर्ण उपक्रम ,(१६) विक्री आणि वितरण व्यवस्थापन, (१७) कृषीव्यवसाय उद्योजकता , (१८) कृषी व्यवसायासाठीचे नेतृत्व कौशल्य, (१९) अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि दर्जाचे अर्थशास्त्र, (२०) कृषी व्यापार व्यवस्था आणि मूल्यनिर्धारण, (२१) भांडवली बाजारात कृषी आधारित व्यवसायाचे स्थान, (२२) कृषी आधारित उपयोजित व्यापार आणि धोरणाचे विश्लेषण, (२३) स्थैर्याचे व्यवस्थापन, (२४) उर्जा व्यवसायाचे व्यवस्थापन.

हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी व्यवसायाच्या वाढ-विकास-समृध्दी आणि स्थैर्यासाठी लागणारे सैध्दांतिक ज्ञान दिलं जातं.

रोजगार संधी

या क्षेत्रात रोजगाराची संधी देणाऱ्या महत्वाच्या संस्था- (१) गोदरेज ॲग्रोव्हेट, (२) पीआय इंडस्ट्रीज, (३) पायोनिअरिंग व्हेंचर्स, (४) निन्जाकार्ट, (५) वेकूल, (६) आयएनआय फार्म्स, (७) रिलायन्स फ्रेश, (८) केपीएमजी, (९) एचयूएल, (१०) ॲमाझॉन, (११) ओलॅम, (१२) डोव ॲग्रोसायन्स, (१३) ड्यू पॉईंट, (१४) मोन्सॅन्टो, (१५) सिनजेंटा, (१६) एबी ॲग्री, (१७) एडीएम-बियाणे वाहतूक आणि प्रकिया, (१८) जॉन डेरे-कृषी संयंत्रे निर्मिती, (१९) ओशन स्प्रे-शेतकऱ्यांची सहकारी संस्था.

कृषी व्यवसाय/ उद्योगातील स्टार्टअप्समध्येही मोठ्या संधी मिळायला सुरुवात  झाली आहे. बियाणे उत्पादन,कृषी सयंत्रे आणि उपकरणांची निर्मिती करणाऱ्या शेतीशी संबधित  विविध कंपन्या/उद्योग आणि व्यवसायांमध्ये करिअर संधी मिळू शकते. यामध्ये पशूखाद्य, कृषी रसायने, कुक्कूट पक्षांचे खाद्द, अन्न प्रकिया उद्यो, दुग्धजन्य पदार्थ प्रकिया उद्यो, फळे आणि भाजिपाला प्रकिया, मांस प्रकिया, किरकोळ विक्री उद्यो, वित्तीय सेवा, खाजगी क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सूक्ष्म वित्त बँक, कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात कार्यरत नॉन बॅकिंग फायनांशिअल कंपन्या, कृषी साठवणूक गृहे/केंद्रे, कमोडिटी ट्रेडिंग क्षेत्र, कृषी निर्यात केंद्रे, ई-कॉमर्स, संशोधन, सहकारी संस्था आणि फार्मर प्रोड्यूसिंग ऑर्गनायझेशन, सल्लागार आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्या,यांचा समावेश करता येतो.

आयआयएम अहमदाबाद

या संस्थेमार्फत एमबीए इन फूड ॲण्ड ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. कृषी, अन्नपदार्थ निर्मिती, कृषी व्यवसाय, ग्रामीण आणि तत्सम क्षेत्रासाठी सक्षम आणि समर्थ व्यवस्थापकांची निर्मिती होण्याच्या अनुषंगानं या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील या क्षेत्रातील उद्योगांच्या उच्च दर्जाच्या अपेक्षा साध्य करण्याची क्षमता आणि कौशल्य या विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमाव्दारे निर्माण केली जातात.

कृषी आधारित व्यवसाय हा इतर उद्योग/व्यवसायांपेक्षा भिन्न असल्यानं अचुक निर्णय घेणं व त्याची तत्काळ व प्रभावी अंमलबजावणी कणं आवश्यक असत. हे कौशल्य  या अभ्यासक्रमाव्दारे शिकवलं जातं. उद्योजकीय प्रेरणा व क्षमतावृध्दीवर भर देण्यात येत असल्याने कृषी आधारित उद्यो/व्यवसायासाठी हे विद्यार्थी सकारात्मक बदलाचे घटक ठरावेत यासाठी विषय घटकांची दिशा निश्चित केली जाते. कालावधी- दोन वर्षे.

 आयआयएमच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाची जोड या अभ्यासक्रमास मिळाली असून तो या क्षेत्रातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च श्रेणीच्या करिअरसाठी उपयुक्त ठरतो.

अर्हता- (१) कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.खुला संवर्ग गुण -५० टक्के.राखीव संवर्ग- ४५ टक्के आणि कृषी व खाद्द्याने व्यवसाय क्षेत्रातील आवडीविषयी त्याला एक विशिष्ट नमुन्यातील अर्ज ऑनलाइन सादर करावा लागेल.किंवा कृषी‍ वा कृषी क्षेत्राशी संबंधित इतर विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.खुला संवर्ग गुण -५० टक्के.राखीव संवर्ग- ४५ टक्के.

निवड प्रक्रिया या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पुढील पध्दतीने राबवली जाते. कॉमन एंट्रंस टेस्ट (कॅट) मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित निवडक उमेदवारांची विश्लेषणात्मक लिखान कौशल्य (ॲनॅलिटिकल रायटिंग स्किल्स) चाचणी  आणि मुलाखत घेतली जाते. अंतिम निवड करताना ६५ टक्के वेटेज हे कॅटमधील गुण आणि ३५ टक्के वेटेज हे इतर बाबींना (ॲप्लिकेशन रेटिंग स्कोअर) दिले जाते. यामध्ये १० वी ,१२ वी आणि पदवीमधील गुणांचा समावेश असतो.

संपर्क प्रोग्रॅम ऑफिसर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट ,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद-380015, ईमेल- admission@iima.ac.in संकेतस्थळ- iima.ac.in, दूरध्वनी-०७९-७१५२३४५६