
रुग्णालयांचे प्रशासक भाग दोन
आपल्या देशात कॉर्पोरेट रुग्णालयांच्या सतत वाढत चालेल्या साखळीमुळे, या क्षेत्राचे रुपांतर आता मोठ्या व्यवसायात झाले आहे.या क्षेत्रात नवेनवे गुंतवणुकदार किंवा उद्योजक उतरत आहे.
व्यावसायिक कार्यक्षमता वाढण्यासाठी बीग डेटा ॲनॅलिटिक्स, मशिन लर्निंग, कृत्रिम बुध्दीमत्ता आधारित आरोग्य सुविधा /सेवांचा समावेश केला जात आहे. हे क्षेत्र झपाट्याने आंतरज्ञानशाखीय बनत आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. ही गरज रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासन (हॉस्पिटल मॅनेजमेंट/ॲडिमिनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम भागवू शकेल.
रुग्णालय प्रशासक
(१) टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सांयन्स संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या, स्कूल ऑफ हेल्थ सिस्टिम स्टडीज मार्फत, दोन वर्षे कालावधीचा, मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश हा, देशात सर्वत्र वेगाने विकसित होत असलेल्या कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळाच्या निर्मिती व्हावी हा आहे. अशा रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस व्यामिश्र स्वरुपाच्या आणि तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या कौशल्ययुक्त शेकडो व्यक्तींचा वावर वाढला आहे. या सर्व मनुष्यबळास कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आणि रुग्णांच्या विविध स्वरुपाचे प्रश्न आणि समस्यांना सोडवण्यासाठी या मनुष्यबळाचा उपयोग होतो.
रुग्णालयातील रुग्णांच्या थेट जीवनमरणाचा प्रश्न असल्याने रुग्णालच्या व्यवस्थापनासाठी उत्तम दर्जाच्या नेतृत्वाची गरज भासायला लागली आहे. असे कौशल्य प्रदान करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन अभ्यासक्रमाव्दारे प्रयत्न केला जातो.
काय शिकाल?
सर्वसाधारणत: पुढील क्षेत्राचे ज्ञान, हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते. आरोग्याशी संबंधित अर्थकारण किंवा अर्थशास्त्र, वित्तीय व्यवस्थापन, संस्थात्मक वर्तणूक, रुग्णालय व्यवस्थापनाची तत्वे, रुग्णालयांसाठी संशोधन पध्दती, संस्था आणि सहाय्यकारी कर्मचारी/ कामगार सेवा, संस्था आणि वैद्यकीय व सुपर स्पेशॅलिटी (अतिविशेषज्ञ) सेवांचे प्रशासन, वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान व्यवस्थापन, जैवसांख्यिकीची तोंडओळख, रुग्णालय माहिती सेवा, रुग्णालय नियोजन आणि कार्यक्रम व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि कामगार कायदे, रुग्णालयांशी संबंधित नैतिक बाबी, रुग्णालय किंवा आरोग्य व्यवस्थेचे गुणवत्ता व्यवस्थापन, व्यवस्थापकीय विश्लेषण आणि कार्यपध्दतीचे विश्लेषण, रुग्णालयाच्या व्यावसायिक बाबींच्या कायदेशीर चौकटी, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास वाढीच्या व्युहनीती, आरोग्यविमा आणि धोके व्यवस्थापन, नागरी आरोग्य, व्युहात्मक व्यवस्थापन आणि संस्थात्मक विकास, आरोग्य व्यवस्थेतील उद्योजकता, सेवा व्यवस्थापन.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केलेल्या उमदेवारांना कॉर्पोरेट क्षेत्रातील वा सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये वेगवेगळया विभांगाचे संनियंत्रण करणे, रुग्णालयातील नव्या सेवा किंवा नव्या रुग्णालयांचे डिझाइन आणि नियोजन करणे आदी जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. रुग्णालये सल्लागार कंपन्या (हॉस्पिटल कंसलटन्सी फर्म्स), आरोग्यविमा क्षेत्र, आरोग्य सुविधा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (हेल्थकेअर आयटी इंडस्ट्री) या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
अर्हता- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, औषधीनिर्माण शास्त्र, विधि अशा कोणत्याही शाखेतील पदवीधरास अर्ज करता येतो. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करु शकतात. मात्र त्यांचा निकाल ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असलेली ऑनलाइन टेस्ट द्यावी लागते.
संपर्क – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, व्ही. एन. पुरव मार्ग देवनार, मुंबई- ४०००८८, दूरध्वनी- ०२२-२५५२५००० आणि २५५२५२५२, संकेतस्थळ- https://admissions.tiss.edu/
(२) मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने एक वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही विषयातील पदवीधरास हा अभ्यासक्रम करता येत असला तरी, बी.एस्सी, एमबीबीएस, बीएएमएस, बी.फार्म, एमबीए या पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
करिअर संधी – रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासनाचा अभ्यासक्रम केल्यावर रुग्णालयाचे फ्रंट ऑफिस, बिलिंग, अकाऊंट, वित्त, माहिती व्यवस्थापन सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन, साहित्य/ वस्तू व्यवस्थापन, विपणन, पुरवठा व्यवस्थापन, डाक्युमेंटशन आदी विभागांमध्ये संधी मिळू शकतात.
संपर्क- विद्यानगरी, सांताक्रुज पूर्व, मुंबई-४०००९८, दूरध्वनी-८१०४४१२०७१, फॅक्स-०२२-२६५३०२६३, ईमेल-gicedenquiry@giced.mu.ac.in, संकेतस्थळ- giced.mu.ac.in
(३) सोमय्या इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने एमबीए इन हेल्थकेअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- दोन वर्षे.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात – हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, डिजिटल हेल्थ केअर, डिजिटल मार्केटिंग ऑफ हेल्थकेअर, सेल्स ॲण्ड मार्केटिंग प्रॉडक्टस ॲण्ड सर्व्हिस, एचआर मॅनेजमेंट इन हेल्थ केअर सेक्टर, ऑपरेशन्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट इन हेल्थकेअर, हेल्थकेअर ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड मीडिया मॅनेजमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट इन हेल्थकेअर, पेशंट केअर ॲण्ड सर्पोट मॅनेजमेंट, फायनांशिअल मॅनेजमेंट इन हेल्थकेअर, मॅनेजिंग हेल्थेअर चैन, डेटा ॲनॅलिटिक्स ॲण्ड इन्फॉर्मेटिक्स इन हेल्थकेअर, क्वालिटी मॅनेजमेंट, कंन्सलटन्सी इन हेल्थकेअर, न्यू बिझिनेस डेव्हलपमेंट इन हेल्थकेअर
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. व्यवसाय संवाद संप्रेशन आणि अहवाल लेखन, सांख्यिकी विश्लेषण, आरोग्य अर्थकारणाच्या मूलभूत बाबी, आरोग व्यवस्था व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्था/सेवा क्षेत्रातील अर्थशास्त्राच्या सूक्ष्म बाजू, या क्षेत्राशी निगडित पुरवठा साखळी व्यवस्थापन, वित्त, विपणन, मनुष्यबळ विकास, मूल्य आणि व्यवस्थापकीय लेखा, औषधी आणि जैवतंत्र व्यवस्थापन, रुग्णालय प्रशासन, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था, गुणवत्ता व्यवस्थापन, कायदेशीर बाजू/पैलू, सुविध व्यवस्थापन, आरोग्य सुविधा/सेवा विपणन-मार्केटिंग (औषधी/ रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे,) रुग्णांची काळजी आणि वर्तणूक, व्यवसाय विकास, ब्रँड व्यवस्थापन, वैद्यकीय पर्यटन (आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि विपणन), समुपदेशन, बौध्दिक संपदा अधिकार, उद्योजकता व्यवस्थापन, आरोग्य विमा आणि वित्त पुरवठा, आरोग्य धोरण आणि लोकसंख्या/ भुभागाचे विश्लेषण, सांखिकी विश्लेषण, डिजिटल विपणन, करनिर्धारण, मार्केट संशोधन, व्युहनीती व्यवस्थापन, पर्यावरणीय आरेाग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा/ व्यवस्थेतील उदयमान तंत्रज्ञान, ग्राहकसंबंध व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्था/ संघटना व्यवस्थापन, कार्यप्रणव व्यवस्थापकीय कार्यपध्दती, जागतिक आरोग्य संघटना (शास्वत आरोग्य व्यवस्था), जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन.
निवड- या अभ्यासक्रमासाठी ५० टक्के गुणांसह कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर अर्ज करु शकतो. या उमेदवाराने कॅट- २०२०/ सीमॅट-२०२१/ झॅट-२०२१ /जीमॅट-जानेवारी (२०१८ ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ग्राह्य.) परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षांमधील गुणांवर आधारित उमेदवारांची निवड समूहचर्चा आणि मुलाखतीसाठी केली जाते. हा अभ्यासक्रम करण्याचा हेतू स्पष्ट करणारे निवदेन (स्टेटमेंट ऑफ परपोज) देणे आवश्यक आहे.
संपर्क– के. जे. सोमय्या इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, विद्याविहार- पूर्व, मुंबई – ४०००७७, दूरध्वनी- ०२२-६७२८३०००, ईमेल-info.simsr@somaiya.edu, संकेतस्थळ- somaiya.edu
(४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- कोझिकोड या संस्थेने प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन हेल्थकेअर मॅनेजमेंट ॲण्ड ॲनॅलिटिक्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. सांख्यिकी विश्लेषणाचे तंत्र आणि कौशल्य वापरुन आरोग्य सुविधा उद्योगातील विविधांगी समस्यांचे निराकरण करण्याचे ज्ञान या अभ्यासक्रमाव्दारे प्रदान केले जाते. या अभ्यासक्रमात आरोग्य सुविधा, त्यासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापकीय कौशल्य, आरोग्य व्यव्यस्थेचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापन, आरोग्य सुविधा विश्लेषण, व्युहनीती आणि नेत्वृत्व कौशल्य अशा सारख्या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमाला कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर व तीन वर्षे प्रत्यक्ष कार्यानुभाचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
संपर्क- संकेतस्थळ – https://iimk.eruditus.com/healthcare-management-and-analytics
०००