विकेट उडाली बाबांची
विनयच्याघरी आज त्याचे बाबा आणि तो यांच्यात किंचित खिटपीट झाली.त्याचं कारणघडला एक फुटकळ वाद.
बाबाविनयला म्हणाले,
यंदाच्या उन्हाळयाच्या सुटीत गोष्टीची खूपपुस्तक वाच.त्यासाठी वाचनालय लाव.मी सुध्दा खूप पुस्तक आणून देईन.
विनयने मात्र पुस्तकवाचण्यासाठी ठाम नकार दिला.
अहो बाबा, वर्षभर अभ्यासाची पुस्तकंवाचलीत ना, आता परत पुन्हापुस्तक वाचायला सांगू नका बॉ. विनय म्हणाला.
मग कायउंडारक्या करत टाईमपास करणारआहेस का?बाबा विनयवर ओरडले.
मी कुठे, उंडारक्या करणारम्हणतोय?
मग मोबाईलमध्ये घुसून बसशील नाही तर टीव्हीपुढे बसलशील चिकटपट्टीसारखा. बाबा चढ्या आवाजात म्हणाले.
अहो बाबा, एक तर तुम्ही मला मोबाईल दिलेला नाही, त्यामुळे मोबाईलमध्ये घुसण्याचा प्रश्नच शिल्लक राहत नाही. रिमोटचा ताबा आईकडे असल्याने तोही प्रश्न मिटला. विनय डोळे मिचकावत म्हणाला.
त्याचं म्हणणं बरोबर असल्याचं बाबांच्या लक्षात आल्याने त्यांनी नरमाईनं विचारलं..
अरे मग,तू पुस्तकं नाही वाचणार म्हणजेयाचा अर्थ मी कायसमजायचा?
अहोबाबा, तुम्ही जरागोष्टींच्या पुस्तकांच्या पलिकडेबघाना.बाबांच्या नजरेला नजर भिडवित विनय म्हणाला.
शहाण्या,तू मलासमजवणार आहेस का आता? बाबा पुन्हा चढ्या आवाजात म्हणाले.
छे हो बाबामोठयांना कुठं समजावयचं असतं.लहानांनीचसमजून घ्यायचं असतं.विनय मिश्किलपणे म्हणाला.
हे बघ तू फारचआगावू झालास हं.
बाबा, मी म्हणालो की गोष्टींच्यापुस्तकांच्या पलिकडे बघू या ना.यात कसला आलाय आगावूपणा ? विनय म्हणाला.
तुलाम्हणायच तरी काय?बाबांनी विचारलं.
बाबा, वर्षभर माझ्या असंलक्षात आलय की माझीमराठी आणि इंग्रजी शब्दसंपत्ती फारशी चांगली नाहीय.या उन्हाळयात ही शब्दीसंपत्तीगोळा करण्यात घालवली तर मलाकिती फायदा होईल. अहो वेगेवगळी पुस्तकंवाचतांना या शब्दांचाच मलाफायदा होईल की नाही?तुम्हीच सांगा.
आतायावर काय बोलावं हे बाबांनाकळेना.शब्दसंपत्ती वाढवण्याची आयाडिया मस्तच होती. विनयने दररोज पाच शब्द जरी पाठ केले तर या उन्हाळाच्या दोन महिन्यात त्याचे ३०० शब्द पाठ होतील. तो या ३०० शब्दांनी श्रीमंत होईल. या विचारात बाबा गढून गेले. या विचारात त्यांच्याकडून विनयच्या या मस्त कल्पेनेचं कौतुक करायचं राहून गेलं.
सुरेश वांदिले
000
