
बीबीएची दिशा!
कला, वाणिज्य आणि विज्ञान या ज्ञानशाखांपैकी कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण झालेल्या किंवा यंदा १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) , बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), इंटिग्रेटेड एमबीए आणि इंटिग्रेट एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीइटी परीक्षा २७ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा आहे. तथापि प्रवेश केंद्रातील प्रवेशापासून ते परीक्षा संपेपर्यंतच्या वेगवेगळया बाबींसाठी हा कालावधी १८० मिनिटांचा राहू शकतो, ही बाब सीइटी सेलने स्पष्ट केली आहे.
परीक्षा पध्दती
या परीक्षेत बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातील. यामधून अचूक उत्तर शोधावे लागेल. प्रत्येक अचूक उत्तरास एक गुण दिला जाईल. निगेटिव्ह गुण नाहीत. ही परीक्षा संगणकाधारित म्हणजेच ऑनलाइन आहे.
या परीक्षेत पुढील विषयघटकांवर प्रश्न विचारले जातील- (१) इंग्रजी- एकूण प्रश्न ३०, एकूण गुण- ३०, (२) सामान्य ज्ञान आणि जाणीव- (जनरल नॉलेज ॲण्ड अवेअरनेस) – एकूण प्रश्न १५, एकूण गुण- १५, (३) संगणकाचे मूलभूत ज्ञान (कॉम्प्युटर बेसिक्स) – एकूण प्रश्न १५, एकूण गुण- १५, (४) तार्किकता- शाब्दिक आणि गणितीय (रिझनिंग व्हर्बल ॲण्ड अर्थमॅटिक)- एकूण प्रश्न ४५, एकूण गुण- ४५. प्रश्न इंग्रजितच विचारले जातील.
हा अभ्यासक्रम सर्वसाधारण स्वरुपाचा असून विद्यार्थ्यांची सर्वसामान्य आकलन क्षमता, सामान्यज्ञान, मूलभूत गणित अशासारख्या बाबींचे ज्ञान तपासण्यासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. सीइटी सेलने यापरीक्षेसाठी काही नमूना प्रश्न दिले आहेत, त्यावरुन याची कल्पना येऊ शकते. उदा- प्रसिध्द खजुराहो मंदिर कुठे आहे? किंवा कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तार्किकता, इंग्रजी या विषयघटकांचेही असेच नमूना प्रश्न देण्यात आले आहे. या सर्व अभ्यासक्रमाच्या, महाराष्ट्रातील वेगवेगळया शहरांमध्ये असलेल्या शिक्षण संस्था किंवा महाविद्यालयांमध्ये साधारणत: १ लाखाच्या आसपास जागा उपलब्ध आहेत. मात्र यंदा ७७ हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी या सीइटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. उपलब्ध जागांपेक्षा उमेदवारांची संख्या कमी असल्याने सर्वच उमेदवारांना प्रवेश मिळेल, हे जरी खरी असले तरी, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास, दर्जेदार आणि मनासारख्या शिक्षण संस्थेमध्ये प्राधान्याने प्रवेश मिळू शकतो. त्यादृष्टिने आता उर्वरित दिवसांमध्ये विषयघटकांची उजळणी करावी. संकल्पनात्मक बाजू आणखी पक्क्या कराव्यात.
काही संस्था
गेल्यावर्षी, या परीक्षेच्या आधारे सामाईक प्रवेश (कॉमन ॲडमिशन प्रोसेस- कॅप) प्रकियेत सामील झालेल्या काही संस्था व महाविद्यालये नमुन्यादाखल पुढे दिली आहे-
मुंबई-
(१) अखिलेश दिनेश मोदी इंस्टिट्यूट ऑफ फायनांस ॲण्ड मॅनेजमेंट, बीएएमस-एमएमस इंटिग्रेटेड आणि बीएमएस, (२) स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई विद्यापीठ उपकेंद्र ठाणे-बीएमएस- एमएमएस इंटिग्रेटेड आणि बीएमएस, (३) ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- बीबीए, (४) आदित्य इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च- बीएमस,
(५) भारतीय विद्याभवनचे- एमएम कॉलेज ऑफ आर्ट्स, एनएम इंस्टिट्यूट ऑफ सायंस, एचआरजे कॉलेज ऑफ कॉमर्स-बीएमएस, (६) आर ए पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स- बीबीए आणि बीएमएस, (७) मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्स- बीएमएस, (८) नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स- बीएमएस, (९) एसआयइएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स -बीएमएस, (१०) गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स – बीएमएस, (११) जयहिंद कॉलेज- बीबीए आणि बीएमएस, (१२) रामनारायण झुनझुनवाला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स – बीएमएस आणि बीबीए, (१३) उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स -बीएमएस, (१४) डी. जी. रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स -बीएमएस, (१५) विद्यालंकार स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी- बीएमएस, (१६) विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स – बीबीए आणि बीएमएस, (१७) सस्मिरा ऑफ इंस्टिट्यूट आर्ट्स ॲण्ड कॉमर्स – बीएमएस, (१८) वझे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स -बीएमएस आणि बीबीए, (१९) जानकीदेवी बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- बीबीए (एसएनडीटी विद्यापीठ)
पुणे
(१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नासिक- बीबीए, (२) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी ऑफ पुणे (पुम्बा) बीबीए इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट,
(३) विद्या प्रतिष्ठान इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बारामती- बीबीए, (४) एमआयटी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स – बीबीए, बीबीए (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन), बीबीए (इंटरनॅशनल बिझिनेस), (५) सर परशुराम भाऊ कॉलेज – बीबीए आणि बीबीए- इंटरनॅशनल बिझिनेस, (६) सेंट मिरा कॉलेज फॉर गर्ल्स – बीबीए आणि बीबीए- कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
इतर–
(१) लेडी अमृताबाई डागा लेडिज कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स नागपूर -बीबीए, (२) हिस्लॉप कॉलेज, नागपूर- बीबीए, (३) शिवाजी सायंस कॉलेज अमरावती-बीबीए, (४) डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट, कोल्हापूर विद्यापीठ- कोल्हापूर- बीबीए- एमबीए इंटिग्रेटेड, (५) कर्मवीर भाऊराव पाटील इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च सातारा- बीबीए, (५) जीएस रायसोनी कॉलेज इंजिनीअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट जळगाव- बीबीए
अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने बीबीए, बीएमएस, या अभ्यासक्रमांना व्यावसायिक (प्रोफेशनल) अभ्यासक्रमाचा दर्जा दिल्याने, याचे प्रवेश सीइटी मार्फत घेण्यात येत आहेत. या परीक्षेत उत्तम गुण मिळवून चांगल्या संस्थेत प्रवेश मिळाल्यास, इंटर्नशीप, प्लेसमेंट सारख्या संधी मिळू शकतात. बरीच महाविद्यालये आता स्वायत्त झाली आहेत. उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यांच्या सल्ल्यानेही काही संस्था अभ्यासक्रमातील विषय घटक ठरवताहेत. त्यामुळे अशा संस्थांमधील प्रवेश हा पुढील करिअरच्या अनुषंगाने उपयुक्त ठरु शकतो.
०००
हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट
डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी ऑफ पुणे (पुम्बा) ही संस्था व्यवस्थापनविषयक शिक्षण-प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील महत्वाची आणि प्रतिष्ठित संस्था आहे. व्यवस्थापनशाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याऱ्या देशातील पहिल्या काही संस्थांमध्ये पुम्बाचा समावेश होतो.
या संस्थेने, बीबीए इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम २०१८ साली सुरु केला. कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्होकेशनल या शांखापैकी कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतो. १२ वीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्याला ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात पुढील विषयघटकांचा समावेश आहे-(१) आंत्रप्र्यिुनरशिप डेव्हलमपेंट ॲण्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट, (२) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, (३) ॲडव्हान्स्ड हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅशिलिटिज ऑपरेशन्स, (४) मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स, (५) रिटेल मॅनेजमेंट, (६) टुरिझम मॅनेजमेंट, (७) फायनांशिअल मॅनेजमेंट, (८) मार्केटिंग मॅनेजमेंट, (९) डिझास्टर मॅनेजमेंट, (१०) सप्लायचेन मॅनेजमेंट, (११) हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅशिलिटिज मॅनेजमेंट, (१२) अॅनॅलिटिक्स ॲण्ड डाटा प्रोटेक्शन, (१३) ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर, (१४) बिझिनेस स्टॅटिस्टिक्स, (१५) ॲडव्हान्स्ड हॉस्पिटॅलिटी स्किल्स, (१६) बिझिनेस इथिक्स, (१७) बिझिनेस लॉ, (१८) एनव्हीरॉन्मेंटल सायंस, (१९) इंग्लिश फॉर बिझिनेस कम्युनिकेशन, (२०) ईकॉमर्स, (२१) फॅसिलिटिज ऑपरेशन स्किल्स, (२२) बिझिनेस मॅथेमॅटिक्स, (२३) इव्हॉल्यूशन ऑफ इंडियन सर्व्हिस इंडस्ट्री, (२४) बेसिक्स ऑफ हॉस्पिटॅलिटी स्किल्स, (२५) फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, (२७) इंटरनॅशनल रिटेल मॅनेजमेंट, (२८) इंटरनॅशनल टुरिझम मॅनेजमेंट, (२९) इंटरनॅशनल फायनांशिअल मॅनेजमेंट, (३०) इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट,इत्यादी
करिअर संधी
तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळतात- (१) इव्हेंट मॅनेजमेंट, (२) फॅसिलिटीज मॅनेजमेंट, (३) हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, (४) रिटेल मॅनेजमेंट, (५) ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट, (६) सेल्स ॲण्ड मार्केटिंग, (७) बँकिंग ॲण्ड फायनांस, (८) ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, (९) कस्टमर रिलेशनशीप ॲण्ड केअर
संपर्क-https://pumba.in
सुरेश वांदिले