सशाचा नकार
कासवाच्या नव्या पिढीस पुन्हा एकदा सशासोबत धावण्याची स्पर्धा करण्याची उर्मी दाटून आली. नव्या पिढीतील पिंकू कासवानं त्याच्या बाबांना आपला इरादा सांगितला.
बाबांनी त्याला हरप्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. की असल्या भाकड आव्हानांना काही अर्थ नसतो म्हणून.
मात्र पिंकूला काही ते पटलं नाही. तो बाबास म्हणाला,
बाबाकाही झालंना तरीविजय माझाचहोणार, ससाकितीही वेगानंधावला नातरी त्यासकाही वेळानंकंटाळायेणार नि तोझोपी जाणार. हे पाचपिढीचं सत्यआताच्या पिढीतअसत्य कसंठरु शकतं.
आधीतसं घडलंम्हणून आताहीतसच घडेलहा भ्रमठेवणं धोक्याचंठरतं. पिंकूचेबाबा त्यालासमजावत म्हणाले. पण पिंकू हट्टासच पेटला होता.
बघ बाबातुझं तूच. काळाप्रमाणे पिढीबदलत राहते. तशी आजचीसशाची पिढीबदलली असेलतर तूतोंडघशी पडशील.पिंकूचे बाबा त्यास समजावत म्हणाले.
अहोबाबा, काहीजण बदलूचशकत नाहीतसचं यासशांचं आहे. त्यांचा आकारबदलला नाही, की त्यांचंगवत खाणंबदललं नाही. तेव्हा आपणत्यांना आव्हानदिलच पाहिजे. पुन्हा एकदाकासवच श्रेष्ठअसं सिध्दकरुन दाखवलंपाहिजे.
अरे, पण त्याचीगरज काय. असल्या बिनकामाच्याआव्हानांवर आपणआपली शक्तीकशाला खर्चीघालायची. बाबाने पिंकूला समजवण्याचा प्रयत्न केला. पण पिंकूस बाबांचं म्हणणं काही पटलं नाही. त्यास वाटलं बाबा आता म्हातारे झाले तसेच त्यांचे विचारही म्हातारे झाले .
त्याने बाबांचा सल्ला न ऐकताटिंकू सशाला आव्हान दिलं. त्यास वाटलं कीआपल्या आवाहनामुळे टिंकूस राग येईल .तो झटपट स्पर्धेसाठी तयार होईल. पण, तसं काही झालं नाही. टिंकूला अजिबातच राग आला नाही.
तो म्हणाला,
पिंकू, आता स्पर्धाबिर्धा नको वाटते. स्पर्धा तुझ्यातआणि माझ्यातकरुन कायउपयोग. तूधावू शकतनाही आणिमी हळूचालू शकतनाही. तेव्हाअशी असमानस्पर्धा कशालाकरायची. आमच्यापूर्वजांनी तेकेलं आणिससा हरल्याचाठपका आमच्यामाथी लागला. त्या आमच्यापूर्वजानं केलेलीचूक मीकां करावी. तुझ्याशी स्पर्धाकरण्यापेक्षा मीदुसऱ्या जंगलातल्यासशाशी नाहीका स्पर्धाकरणार. तोश्रेष्ठ कीमी श्रेष्ठहे ठरेलना त्यात. कधीतरी झालेलीचूक मीपुन्हा कांबरं करायची? तू सुध्दाअसल्या बकवासआव्हानांचा विचारकरायला लागलासम्हणजे यारतू मागच्याकाळात जगतोसकी.
टिंकू असं बरच काही पिंकूस बोलला.
पिंकूस वाटलं ससा घाबरला.
म्हणजे, तू माझंआव्हान स्वीकारणारनाहीस तर, कासावनं पुन्हा एकदा विचारलं.
छेछे त्याऐवजीमी आताचतुला विजेतेपददेऊन टाकतोना. तूजाऊन सांगतुझ्या मित्रांना, तू कसामला हरवलसते.
असंकसं शक्यआहे.
कांनाही, अरेमला आव्हानदेणं जरतुला शक्यआहे तसंतू मलाहरवलस हेतुझ्या मित्रांनासांगणं शक्यनाही का.
पिंकूला सशाचं म्हणणं काही कळलं नाही. तो तसाच या कथनाचा विचार करत बसला.
टिंकू मात्र आपला वेग कसा वाढेल याच्या सरावाला लागला.
सुरेश वांदिले