(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

आपलं सामर्थ्य

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलन मनलावून तेजोमयीनं बघितलं. इतकंटक लावून तेजोमयी बघतेय हे लक्षात आल्यानं अलेक्झांडर टीव्हीवर नजर रोखून बसला.एकापथकात सैन्यातील डॉगीही थाटात संचलन करताना  दिसताच,त्यालाआनंद झाला.त्याआनंदात त्याने टुणदिशी उडी मारली आणि स्वयंपाकघरात काम करत असलेल्या आईकडे जाऊन लाडीगोडी केली. आईनंत्याची त्याच्या आवडीचे डॉगी बिस्किटं त्याला दिले.स्वारीखुष. पुन्हादिवाणखान्यात येऊन टीव्हीवरील संचलन एकटक तो बघू लागला.

संचलानात असणारे रणगाडे,विमान,जहाज अत्याधुनिक शस्त्रे,बंदुका,रायफल आणि गणवेषधारी सैनिक बघून तेजोमयीचा उर भरुन येत होता. मध्येमध्येती टाळ्याही वाजवायची. अलेक्झांडरशेपटी हलवून आनंद व्यक्त करायचा.

बाबांना यात काही रस दिसत नव्हता.तेपेपरमध्ये डोके खुपसून बसले होते. मध्येचएखादेवेळस शहामृगासारखी मान वर करुन बघायचे आणि लगेच शहामृगाची मान खाली. आईचातर प्रश्नच नव्हता.तीस्वयंघरात मग्न एकदोन वेळेला तेजोमयीनं तिला हे संचलन बघण्याठी आवाज दिला.एकदाती दिवाणखान्यात डोकावून गेली.

अगं,हेदरवर्षीच असतं.पुढच्यावर्षीबघता येईलना, असंबोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली.

या मोठ्यांच काही कळत नाही बुवा. तेजोमयीमनात म्हणाली. प्रजासत्ताकाचंमहत्वं यांना शिकवलं की नाही यांच्या शिक्षकांनी, अशीच शंका येते,असाएक विचार तेजोमयीचा मनात आला आणि ती खुदकन हसली. त्याहसण्यानं बाबांचं पेपरमधील लक्ष विचलित झालं.

काय गं, हसण्यासारखंकाही घडला या संचलनात,बाबांनीतेजोमयीस विचारलं.

त्यासाठी ते तुम्ही बघायला हवं की नाही बाबा..

अगं ते दरवर्षीच असतं.पुढच्यावर्षी बघू..बाबाम्हणाले. आईहीअशीच म्हणाली होती.बाबांच्याया बोलण्याचा तेजोमयीस राग आला.त्यामुळेतिने टीव्ही बंद केला. काहीतरी भलतच घडतय हे लक्षात आल्यानं अलेक्झांडर सावध झाला आणि त्याने कान टवकारले. टीव्हीचाआवाज ऐकूनासा झाल्याने आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. बाबांनीहीपेपर बाजूला ठेवला. टीव्हीकां बंद केला, दोघांनिहीएकाच वेळी तेजोमयीस विचारलं.

तेजोमयीनं मान फिरवली.

बाईसाहेबांना राग आलेला दिसतोय, बाबातिच्या जवळ जात म्हणाले.

रागोबा काय बुवा, एकाजणाच्या नाकावरच मुक्कामाला असतोतेजोयमीचनाक हलकसं ओढत आई म्हणाली.

आम्ही संचलन बघत नाही याचा राग आला होय तुला,बाबांनीविचारलं.

होय आला..तेजोमयीगुस्स्यात म्हणाली.

हात्तिच्या.. बस एव्हढचं..आईउत्सुर्फतपणे म्हणाली.

हात्तीच्या काय आई, मलासांग आत्ता तुझ्या आवडीची मालिका आणि बाबांची एखादी क्रिकेट मॅच असती तर तुम्ही दोघांनी तुमच्या तुमच्या आवडीचे कार्यक्रम हातचं सारं सोडून बघितले नसते का..तेजोमयीनंविचारलं.

आँ,बाबा आणि आईने एकाच वेळी आँ फाकला. आताकाहीतरी घडणार हे अलेक्झांडरच्या लक्षात आलं.उत्सुकतेनंतिघांकडे बघू लागला.

यात रागवण्यासारखं काय….

बाबा, तुम्हीच सांगताना की आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला,प्रजासत्ताकव्हायला खूप कष्ट करावे लागले..

खरय ना ते..

मग इतक्या कष्टानं प्रजासत्ताक झालेल्या आपल्या देशानं कशी प्रगती केली,आपलादेश कसा सामर्थ्यशाली झाला हे घरबसल्या बघण्याच कष्ट, तुम्हालाघ्यावे वाटत नाही.

आईने पुन्हा एकदा आँ फासला. बाबांनातेजोयमीचा त्रागा कळला. तिलाते सॉरी म्हणाले. तेजोमयीच्याचेहऱ्यावर हसू परतलं.

या संचलनात दिसणारी आपल्या देशाची प्रगती बघून मनात जे रोमांच उठतात,त्याचाआनंद मोठा की मालिकांमध्ये तेच तेच बघण्याचा आंनद मोठा..तेजोमयीनंआईला विचारलं..

आईनं कान पकडला. आईलाहीचूक कळली असावी. तेजोमयीतिला बिलगली आणि छानशी पप्पी दिली.

सुरेश वांदिले