निस्वार्थी कोंबडोबा
वननगरीतसिंह महाराजांनी जाहीरकेलं की जी मूलंनवं वर्ष धुमधडाक्यात साजरंकरतील, त्यांना ते त्यांनादक्षिण आफ्रिकेतील सफारीलापाठवतील. महाराजांची ही घोषणाअघटीत होती.अचंबित करणारी होती.ही घोषणा एैकून महाराणीचिंतित झाल्या.
अहो, तुम्हाला झालंतरी काय?महाराणी म्हणाल्या.
कुठेकाय?महाराज उत्तरले.
अहो,तुमच्याघोषणेबद्दल म्हणतेय मी.
छानआहे ना..
अहो,याआधी तुम्हाला असंकाही आवडायचं नाही.आता सर्वच मुलं नवंवर्ष साजरं करतील.या सर्वांनादक्षिण आफ्रिकेला पाठवायचंम्हणजे अर्ध राज्यच विकावंलागेल हो तुम्हाला.महाराणी चिंतेच्या स्वरातम्हणाल्या. यावर महाराज काहीचबोलले नाहीत.त्यांनी फक्तस्मित केलं.
महाराजांचीघोषणा एैकल्यानंतर,वननगरीच्या मुलांचा उत्साह वाऱ्यासारखावाहू लागला. त्यांनीजंगी तयारी चालवली.31 डिसेंबर आलंनि जोरात साऱ्यांचं नाचं गाणं,खाणं पिणं,मस्त धम्माल झाली.प्रत्येकाला खात्रीचहोती दक्षिण आफ्रिकेच्या जंगलसफारीमध्ये नंबर लागण्याची.मध्यरात्र उलटून गेल्यावरही धम्मालसुरुच राहिली.
मध्यरात्रीनंतर कधीतरी थकून सारी मूलं निद्रादेवीच्या स्वाधीन झाली.सूर्यदेवाचं आगमन झालं.तरी एकहीमुलगा साखर झोपेतून उठलाचनाही. दुपारपर्यंत मंडळी आळस देतराहिली.
00
महाराजमात्र नवीन वर्षाच्या पहाटेचउठले.सकाळच्या सर्व विधी आटोपूनत्यांनी वननगरीचा फेरफटकामारायला सुरुवात केली.तेव्हा त्यांना दिसल की वननगरीचीमुलं अजूनही झोपेतच आहेत.नवीन वर्षात आळसात लोळतपडली आहेत.फक्त एकच मुलगा उत्साहानं कामालालागला होता.महाराजांना बरं वाटलं.त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छादेऊन महाराज महालात परतले.
त्यांनीदुपारी वननगरीच्या स्टेडियममध्येदरबार बोलावला.महाराज आता जंगल सफारीचीतारीख जाहीर करतील असंसर्वांनाच वाटत होतं.मुलं आणि त्यांचे आईवडीलखुषित होते.
सभासुरु होताच महाराजांनी सर्वांनानवीन वर्षाच्या शुभेच्छादिल्या. जंगल सफारीची तारीखकधी जाहीर करतात,असं सर्वांनाझालं होतं.
महाराजम्हणाले,की त्यांनी जंगल सफारीसाठीएकाचीच निवड केली आहे.
फक्त एकच..मुलांनी एकचगलका केला.
होय...
पण आम्हीतर जोरात आणि जोमातनवीन वर्ष साजरं केलं.…मुलंओरडली.
अजिबातनाही.तुम्ही नवीन वर्ष साजरचकेलं नाही.तुम्ही जुनंवर्ष साजरं केलं.नि नव्या वर्षाचा प्रारंभआळसानं केला.सूर्य देवाचंआगमन झालं तरी तुम्हीझोपेतच होता.फक्त कोंबडयाचा हा मुलगापहाटे उठून त्याचं कामउत्साहानं करत होता.नव्या वर्षाचं हे खरंस्वागत. झोपून स्वागत करणारेआळशी. अशा आळशांना मी दक्षिणआफ्रिकेच्या सफारीला पाठवणार नाही.समजलं.
सर्वमुलांना त्यांची चूक लक्षातआली.सर्वांनी महाराजांच्या समोर शपथ घेतली. यापुढे उगाच धांगडधिंगा करणार नाही. लवकर झोपू आणि लवकर उठू…कामाला लागू..व्यायाम करु..अभ्यास करु..
ही शपथ ऐकून महाराजांना अत्यानंद झाला. त्यांनी सर्व मुलांना सर्वांना शाबासकी दिली. पुढच्या वर्षी केनिया जंगलाची सफारी घडवण्याची घोषणा केली…त्याच बरोबर कोंबड्याची यंदाची जंगल सफरी पुढे ढकलण्याची घोषणा सर्वांसमोर केली.
ही घोषणा ऐकून सर्वांना धक्का बसला..महाराणी सर्वांदेखत म्हणाल्या…अहो ही फसवणूक झाली..असं तुम्ही करु शकत नाही..
महाराज फक्त हसले.तेव्हा महाराणींना आणखीनच राग आला. त्या जोरजाराने भांडू लागल्या. ते बघून कोंबडा व्यासपीठावर गेला आणि त्याने महाराणींना शांत केले.
अरे, पण तुला वाईट नाही का वाटले..महाराणींनी विचारलं.
नाही राणीसाहेब..उलट मला आनंदच झाला. अहो, मी माझ्या या सर्व मित्रांना एकटाच सोडून कसा काय दक्षिण आफ्रिकेत जाणार बरं..सोबत मित्र असतील तर तर खरी गंमत आणि मजा की नाही ..
महाराणी काहीच बोलल्या नाही. महाराजांनी पुन्हा एकदा स्मित केलं.
कोबंडा पुन्हा राणीसाहेबांना उद्देशून म्हणाला..
राणीसाहेब अहो, मी आता दक्षिण आफ्रिकेत गेलो तर पहाटे पहाटे आरवणार कोण? मग माझ्या मित्रांना जाग कशी येणार बरं..मग त्यांनी आता घेतलेल्या शपथेचं काय?म्हणजे शपथ मोडली म्हणून त्यांची केनिया सफारी सुध्दा रद्द नाही कां होणार?
महाराणींना कोंबड्यांच्या या सुज्ञपणाचे कौतुक वाटले. त्यांनी जोराने कोंबडोबाकी जय असा नारा दिला. या नाऱ्याने आख्खे स्टेडियम दणाणून गेले..
सुरेश वांदिले
0000