(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

विज्ञान आणि अर्थशास्त्राची सांगड

कोणत्याही कारणाने कां होईना २०२३ किंवा २०२४ मध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना, मनोजोगती शाखा किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला नसल्यास त्यांना, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस ॲण्ड रिसर्च (आयसर) या महत्वाच्या संस्थेत यंदा प्रवेश मिळवता येऊ शकतो. या विद्यार्थ्यांना त्यासाठी, “आयसर ॲडमिशन टेस्ट” द्यावी लागेल. ही टेस्ट दि. २५ मे २०२५ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र पुणे आहे. पुढील काही दिवस, झोकून अभ्यास केल्यास यश मिळू शकते. त्यासाठी अतिशय काटेकोरपणे, आयसर ॲडमिशन टेस्टसाठी निर्धारित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची तयारी करावी लागेल. हा सिलॅबस किंवा अभ्यासक्रम, एनसीइआरटी (नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग)च्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. तथापि १२वी बोर्डाच्या भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातील सर्व घटक पुन्हा एकदा अभ्यासल्यास, ही परीक्षा यशस्वीरीत्या देता येऊ शकेल. या टेस्टसाठी निर्धारित अभ्यासक्रमातील जे घटक १२ वी बोर्डाच्या पुस्तकात नसतील, त्यांची तयारी मात्र एनसीइआरटीच्या पुस्तकातून करावी लागेल.

नवे अभ्यासक्रम

(१) इंडियन  इंस्टिट्यूट ऑफ सांयस रिसर्च ॲण्ड एज्युकेशन कोलकता, येथे २०२५ च्या शैक्षणिक वर्षापासून, बॅचलर ऑफ सायंस-मास्टर ऑफ सायंस (बीएस-एमएस) इन कॉम्प्युटेशनल डाटा सायंस, हा नवा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. हा आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम आहे. संगणकशास्त्र आणि प्रत्यक्ष जगातील शास्त्रीय आव्हानांमधील दरी सांधण्यासाठी या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग, डाटा ॲनॅलिसीस, मशिन लर्निंग, उच्च कार्यक्षमतचे संगणकीय ज्ञान यांचे प्रशिक्षण दिले जाते. नैसर्गिक शास्त्रातील व्यामिश्र समस्या सोडवण्यासाठी हे कौशल्य विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरु शकते. सैध्दां‍तिक ज्ञान आणि प्रात्यक्षिक यांच्या सुयोग्य मेळ या अभ्यासक्रमात साधला जातो. त्यामुळे हा अभ्यासक्रम करण्याऱ्या विद्यार्थ्यांना विविध उद्योग, संशोधन संस्था, अध्यापन आदी क्षेत्रात उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. संगणकशास्त्रातील भविष्यातील आव्हाने पेलू शकणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अपेक्षित आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.

(२) इंडियन  इंस्टिट्यूट ऑफ सांयस रिसर्च ॲण्ड एज्युकेशन तिरुपती, येथे २०२५ च्या शैक्षणिक वर्षापासून, बॅचलर ऑफ सायंस (बीएस) – इन इकॉनॉमिकल  ॲण्ड स्टॅटिस्टिकल सायंसेस, हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

संशोधनाला प्राधान्य

विज्ञानशाखेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांतील आंतरज्ञानशाखीय अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी प्राधान्य  द्यावे यासाठी, इंडिन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) या संस्थेची स्थापना भारत सरकारने केली. या संस्थेला नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्पॉर्टन्सचा दर्जा भारत सरकारने दिला आहे. या संस्थेचे पुणे, तिरुपती, भोपाळ, कोलकता, थिरुवंतपूरम, मोहाली, बेहरामपूर या ठिकाणी कॅम्पसेस आहेत.

अभ्यासक्रम

(१) आयसरच्या सर्व सातही कॅम्पसमध्ये बीएस – एमस या पाच वर्षे कालावधीचा ड्युएल डिग्री अभ्यासक्रम शिकवला जातो. (२) आयसर भोपाळ कॅम्पसमध्ये प्रत्येकी चार वर्षे कालावधीचे (अ) बीटेक इन डाटा सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग, (ब) बीटेक इन केमिकल इंजिनीअरिंग, (क) बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, (ड) बीएस- इकॉनॉमिक्स हे अभ्यासक्रम करता येतात. आयसरच्या अभ्यासक्रमात पहिल्या दोन वर्षात मूलभूत विज्ञानशाखेतील सर्व विषय शिकवले जातात. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय निवडू शकतो.

डाटा सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग

भोपाळ आयसरमधील या अभ्यासक्रमात (१) डीप लर्निंग, (२) मशिन लर्निंग, (३) आर्टिफिशिल इंटेलिजन्स, (४) नॅचरल लँग्वेज प्रोसेस, (५) कॉम्प्युटर व्हिजन, (६) डाटा सायंस इन प्रॅक्टिस, (७) ॲल्गॉरिदम, (८) ॲडव्हान्स्ड प्रोग्रॅमिंग, (९) डाटाबेस्ड मॅनेजमेंट सिस्टिम, (१०) डाटा स्ट्रक्चर ॲण्ड लेबॉरेटरी, (११) डाटा स्ट्रक्चर ॲण्ड ॲल्गॉरिदम, अशासारख्या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

बीएस- इकॉनॉमिक्स

आयसर भोपाळचा, हा अभ्यासक्रम विज्ञान केंद्रिभूत आहे. विज्ञान आणि समाज यांच्यातील संबंध अधिक सुदृढ करण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. अर्थशास्त्रातील मुख्य विषय घटकांसोबत इतर ज्ञानशाखांचेही घटक या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी अध्यापन, उद्योग, निर्णय प्रकिया आणि इतर क्षेत्रात उत्तम करिअर करु शकतात.

आयसर ॲडमिशन टेस्ट-

ही परीक्षा संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) आहे. या पेपरमधील प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विषयाचे १५, असे एकूण ६० प्रश्न असतील. प्रत्येक अचुक उत्तरास ४ गुण दिले जातात. अशाप्रकारे एकूण २४० गुणांचा हा पेपर असेल. चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण कपात केला जातो.  परीक्षेचा कालावधी – तीन तास.

आयसर ॲडमिशनच्या वेबपोर्टलवर यंदाच्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे. २०१७ पासून ते २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे पेपर संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले  आहेत. हे पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे प्रश्नांची नेमकी जाण येऊ शकते, त्यानुसार अभ्यासाची दिशाही ठरवता येते. लवकरच सरावासाठी पेपरही उपलब्ध करुन देण्यात येईल.

अर्हता-

(१) सर्व आयसरमधील बीए-एस -एमएस – भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यापैक कोणतेही तीन विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण.(२) कोलकता येथील बीएस- एमएस इन  कॉम्प्युटेशनल डाटा सायंस, आयसर भोपाळ  येथील बीटेक आणि बीएस- इकॉनॉमिक सायंसेस , आयसर तिरुपती येथील  बीएस- इकॉनॉमिक ॲण्ड स्टॅटिस्टिकल सायंसेस – १२ वीमध्ये गणित विषयाचा अभ्यास केलेला असावा.

या परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के तर राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळायला हवे. १२ वीमध्ये गुणांची टक्केवारी काढताना सर्व विषयांचे गुण धरले जातील. २०२४ मध्ये १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणाने, २०२५ मध्ये पुन्हा एक किंवा दोन विषयांसाठी परीक्षा दिली असल्यास, या दोन वर्षातील ज्या विषयात सर्वोच्च गुण मिळाले असतील ते  गुण ग्राह्य धरले जातील.

विज्ञान शाखेत ज्या विद्यार्थ्यांनी गणिताऐवजी जीवशास्त्र आणि जीवशास्त्राऐवजी गणित घेतले असेल त्यांनासुध्दा ही परीक्षा देता येते. मात्र या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.

एकूण जागा

या सर्व कॅम्पसमध्ये  (१) बीएस-एमएस अभ्यासक्रमाला २१३८ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये आयसर कोलकता- ३१०, आयसर भोपाळ आणि आयसर बेहरामपूर प्रत्येकी ३००, आयसर मोहाली २७०, आयसर पुणे २८८, थिरुवनंतपूरम- ३२०, तिरुपती- ३५०, अशा जागांचा समावेश आहे. (२) बीटेक/बीएस अभ्यासक्रमाच्या २२५ (आयसर भोपाळ- बीटेक- १४०, बीएस इकॉनॉमिकल सायंस- ४०, आयसर तिरुपती- बीएस इकॉनॉमिकल ॲण्ड स्टॅटिस्टिकल सायंस ५०) अशा जागांचा समावेश आहे. यामध्ये शासनाच्या निर्णयानुसार राखीव जागांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी ५ टक्के जागा राखीव आहेत.

आयसरमधील प्रवेश पुढील घटकांवर अवलंबून असतो- (१) सर्व आयसरमधील एकूण जागा, (२) आयसर ॲडमिशन टेस्टमध्ये उमेदवाराने प्राप्त केलेली श्रेणी, (३) उमेदवाराने दिलेला आयसरचा प्राधान्यक्रम , (४) उमेदवारांचा संवर्ग. सर्व कॅम्पसच्या प्रवेशासाठी सामाइक प्रवेश प्रकिया राबवण्यात येत असल्याने एकच अर्ज भरावा लागतो.

शिष्यवृत्ती

  या अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या काही उमेदवारांना दरमहा ५ हजार रुपयांची इन्स्पायर (इनोव्हेशन इन सायंस पर्स्युइट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च) शिष्यवृत्ती दिली जाते. हा संपूर्णपणे निवासी स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोईंनी युक्त वसतीगृह उपलब्ध करुन दिले जाते. 

संपर्क-

(१) प्रवेश प्रकिया संकेतस्थळ- https://iiseradmission.in/

(२) पुणे कॅम्पस – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, डॉ.होमी भाभा रोड ,पाषाण पुणे- ४११००८, दूरध्वनी- ०२०– २५९०८०००,  ई-मेल-admissions@iiserpune/ac.in,संकेतस्थळ – www.iiserpune.ac.in 

सुरेश वांदिले