(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

आनंदआणि आशीर्वाद

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे बंद असलेली मंदिरं सुरु झाली. याचातेजोमयीच्या आईस खूप आनंद झाला. मंदिरंबंद होण्याआधी ती दर मंगळवारी उद्यान गणेशाच्या दर्शनाला जायची. मंदिरंसुरु झाल्याचं कळताच, आतापुन्हा दर्शनाला जाण्याचं तिन बाबांना सांगितलं.

वा छान.. आपणसगळेच जाऊ या ना..बाबाम्हणाले.

तू येशील ना गं..आईनेतेजोमयीला विचारलं..

यावर काय उत्तर द्यावं, हेतेजोमयीस कळेना. कारणजिथे दोघे,तिथेगर्दी,असंतिने वाचलं होतं. सध्यागर्दी करण्याचाकाळआपणकशाला त्यात हातभार लावायचा, असाविचार तिच्या मनात आला. तोतिने चाचरत बाबांना सांगितला..

त्यांना तिचं म्हणणं पटलं. तेजोमयीमंदिरात आली नाही तर चालणार नाही का, त्यांनीआईला विचारलं.आईनंथोड्याशा नाखुषिनेच होकार दिला..

मंगळवारी आईबाबा सकाळीच मंदिरात जाण्यासाठी निघाले. बाबांनीमुखपट्टी घातली. आईनेघातली नाही.

अगं,तूमुखपट्टी लावून जा..तेजोमयीम्हणाली.

मंदिरात कुठे लावायची असते का, बाप्पांनाते आवडेल का

त्यांना कां नाही आवडणार..भक्तांचंरक्षण करणं हे तर त्यांचं मुख्य काम..जेभक्त स्वत:चीयोग्य काळजी घेतात, तेबाप्पांना अधिक आवडतात….तेजोमयीम्हणाली.

बरं मॅडम, हेसगळं तुम्हाला कुणी सांगितलं..आईनेविचारलं.

खुद्द बाप्पाच, मलाकाल स्वप्नात येऊन सांगून गेले..

थापा नको मारुस..आईलटक्या रागाने म्हणाली.

आई, हीकाही थाप नाही.तूगणेशालाच दर्शनानंतर विचारुन घे ना..म्हणजेमग दूध का दूध आणि मोदक का मोदक..

अगं कसली ही तुकबंदी..

मंदिरात गेल्यावर दोघांनीही मुखपट्टी काढायची नाही.

अगं, पणअथर्वशीर्ष कसं म्हणणार..

मुखपट्टीच्या आत म्हणाना..

ते बाप्पांना कसं कळणार..

त्यांना सगळं कळत बाबा..तेसर्व समर्थ असल्याचं तुम्हीच मला सांगता ना..

आणखी काय आदेश आहेत मॅडम आपले..आईगमतिनं म्हणाली..

सोबत सॅनिटायझर ने..इकडेतिकडे हात लागला तर लगेच सॅनिटायझरने स्वच्छ कर. देव्हाऱ्यासमोरच्याकठड्यावर डोकं ठेऊ नकोस. मूषकस्वामीच्या कानात,तेजोमयीलाचांगलं उत्तीर्ण होऊ देउ असं सांगू नकोस..तेजोमयीएका दमात बोलली..

आजीबाई, हेसगळं करायचं नाही तर मग मंदिरात जायचच कशाला..आईम्हणाली..

वा s ते तर फारच उत्तम ..असंतेजोमयीस बोलावस वाटलंपणयामुळे आई रागवेल हे लक्षात आल्यानं,तीकाही क्षण काहीच बोलली नाही.पणलगेच आईच्या डोळयात थेट बघत ती म्हणाली,

तसं नाही गं..मंदिरातजायचं नाही  असं मी म्हणतेय का..नाहीनामंदिरातआनंद आणि आर्शीवादासाठी जातो,असंतूच सांगतेस नेहमीमगया आनंदाचा विचका कोरोना विषाणूने करु नये असं वाटलं म्हणून बोलले..

बाळ, तूअगदी माझ्या मनातलंस बोललीस..बाबाम्हणाले. मीसुध्दा जाऊ नये असं वाटतय आता..कायगं,चालेलना तुला..आईकडेबघून बाबा म्हणाले.आईलाहीत्यांचं म्हणणं पटलं.तिनेहोकारार्थी मान हलवली.

तेजोयमीने आईला मुखपट्टी आणून दिली.. आईलाटॅक्सी करुन देण्यासाठी बाबा तिच्यासोबत खाली उतरु लागले..तोचतेजोमयीला काहीतरी आठवलं आणि ती वस्तू आणण्यासाठी मागे वळली..बघतेतर काय, अलेक्झांडरती वस्तू तोंडात घेऊन उभा. तिघानांहीआश्चर्य वाटलं. अलेक्झांडरच्याशहाणपणाचं कौतुकही वाटलं.. तीवस्तू होती सॅनिटायझरची बॉटल..

बघ आई.. तुलाआता अलेक्झांडरचं ऐकावचं लागेल आणि सॅनिटाझर लावावचं लागेल..तेजोमयीआईकडे बघत म्हणाली..

तेजो मॅडम आणि अलेक्झांडर सरांचं सांगणं ऐकलं नाही तर बाप्पा रागवणार नाही का मला..आईहसत म्हणाली आणि अलेक्झांडरने तोंडात धरलेली सॅनिटायझरची बॉटल घेऊन पर्समध्ये टाकली

 सुरेश वांदिले