संकल्पाचा अर्थ
नवं वर्षं आलं की, यूंवकरणार, त्यूंवकरणार असं तेजोमयी करायची.
१ जानेवारीससकाळी बाबांना आपली संकल्प यादी दाखवायची. हेकरणार, तेकरणार अशा दहा – बारागोष्टी त्यात असायच्या. सुरुवातीचेकाही दिवस खूप उत्साहाने ती या यादीतील संकल्पाप्रमाणे वागायची सुध्दा. पणहळू हळू तिचा उत्साह कमी व्हायचा आणि महिन्याभरातच संकल्प यादी अडगळीत जायची. बाबातिला अधूनमधून आठवण करुन द्यायचा, पणआज करते उद्या करते असं करत ती टाळाटाळ करायची.
यंदाच्या १ जानेवारीलातेजोयमीनं उत्साहानं,गेल्यावर्षी सारखीच १०–१२गोष्टिंचा समावेश असणारी संकल्प यादी बाबांना दाखवली.बाबांनीती न बघताचफाडून टाकली.
तेजोयमीलावाईट वाटलं. तीफुरगुंठून बसली. यादोघांमध्ये तणाव आल्याचं अलेक्झांडरला कळलं. अशावेळीडोळे मिटून पण कान उघडे ठेऊन काय घडतय याकडे लक्ष तो ठेऊन असायचा.
तेजोमयी गाल फुगवून दुसरीकडेच बघू लागल्यावर, झोपेचेनाटक करणाऱ्या अलेक्झांडरचं कान हलकसं पिरगाळत बाबा त्याला म्हणाले, तूचसमजावरे बाबा तिला… आपल्यालासारं काही कळलय, असंसमजून अलेक्झांडर आळोखे–पिळोखेदेत उठला आणि तेजोमयी जवळ जाउुन तिच्याशी लाडीगोडी करु लागला.
त्यांना, सांगमाझी कट्टी म्हणून. असंबोलून तेजोमयीने तिसरीकडेच मान वळवली.अशावेळी आई जिथे कुठे असेल,तिथेजाऊन अलेक्झांडर तिचा पदर ओढत घेऊन यायचा.आताहीत्याने तसेच केले.
आई दिवाणखान्यात आल्यावर तिच्या लक्षात आलं की बाप लेकिंच काहीतरी बिनसलय. तिनेबाबांना विचारल, तेव्हाबाबांनी घडलेला प्रकार सांगितला.
अहो, मगतुम्ही कशाला तिची संकल्प यादी न बघताचफाडून टाकली.आईम्हणाली. आईआपली बाजू घेतेय हे लक्षात येताच तेजोमयी आईकडे वळली..
फुगाबाई, तुलावाईट कशाचं वाटलं ते सांगना जरा,बाबांनीसंधी साधली.
माझी यादी कां फाडलीस तू.. मीनाही बोलायची तुझ्याशी.
बाईसाहेब,असंकां केलं ते समजून घ्या ना…
हे मात्र बरोबर….कायरे ठोंब्या. अलेक्झांडरकडेबघत आई म्हणाली.त्यानेमान हलवली..
बघ, त्यालाकळलय..
मग त्यालाच समजावून सांगाना..तेजोयमीचाराग काही जाईना…
मग बाबा अलेक्झांडरकडे बघून पण तेजोमयीस उद्देशून म्हणाले,
अलेक्झू, तिला सांग की संकल्प करायचे ते करण्यासाठी,केवळ कागदावर लिहिण्यासाठी नाही.संकल्पकागदावरच राहिले तर काही साध्य होत नाही.कागदावरचंमनात उतरवायचं नि मग उत्साहानं, जेठरवलं ते दररोज करायचं.बाबांच्याया बोलण्यावर अलेक्झांडरने मान हलवली.
बस झालं तुम्हा तिघांचं हे नाटक नाटक खेळणं.आईबाबांकडे बघत म्हणाली.
तेजोमयीला आपल्या कुशीत घेऊन ती तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाली,
हे बघ तेजो,तुझ्यारागाला पळवून लाव बघू,गेल्यावर्षी तू इंग्रजी शब्द पाठ करण्याचा संकल्प केला होतास ना,तोकाही पूर्ण झाला नाही..तोचयंदा पूर्ण करना.एकना धड भाराभार चिंध्या असं करण्याऐवजी तू हाच एकमेव संकल्प पूर्ण केलास ना की बघ तू ३६५ इंग्रजी शब्दांनी श्रीमंत होशील. इंग्रजीबोलणं अवघड जाणार नाही. निबंधलिहिताना नवे नवे शब्द वापरता येतील.तेबघून तुझे सर कौतुक करतील तुझं. आईनंतेजोमयीस समजावलं.तेतिला पटलं. यंदाएकच संकल्प,दररोजएक शब्द पाठ करण्याचा..असंतिने जाहीर केलं.बाबांनीतिला जवळ घेऊन तिची पप्पी घेतली.
अलेक्झांडरच्या डोळयात आनंदी भाव उमटले.
सुरेश वांदिले