
कॉर्पोरेटचे लिगल मॅनेजर्स!
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (रोहतक)ने बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट- एलएलबी (बीबीए- एलएलबी) हा उत्तम करिअर घडवणारा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षाचा आहे. यंदा या अभ्यासक्रमाची पाचवी बॅच, २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निवडली जाईल.
या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो. (१) कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (सीएलएटी- क्लॅट २०२५) किंवा (२) आयआयएम ॲप्टिट्यूड टेस्ट (आयआयएम- एटी २०२५. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख निघून गेली आहे.) यापैकी क्लॅट परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना, या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असल्यास, त्यांनी १९ एप्रिल २०२५ पर्यंत, संस्थेकडे अर्ज करणे आवश्यक आहे. क्लॅट २०२५ मधील गुणांसह ऑनलाइन अर्ज करावा लागेल. पात्र विद्यार्थ्यांना जून २०२५ मध्ये मुलाखतीसाठी पाचारण केलं जाईल.
मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची (१) शैक्षणिक कामगिरी, (२) संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स), (३) सर्वसाधारण घडामोडीं (करंट अफेअर्स) चं ज्ञान यावर भर दिला जातो. क्लॅट मधील गुणांना ५५ टक्के वेटेज, मुलाखतीला १५ टक्के वेटेज, दहावीतील गुणांना १० टक्के वेटेज आणि १२ वीतील गुणांना १५ टक्के वेटेज दिलं जातं.
अर्हता – या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला दहावी आणि बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग संवर्गासाठी ही मर्यादा ५५ टक्के आहे. संबंधित सर्व संवर्गातील विद्यार्थ्याचं, ३० जून २०२५ रोजी कमाल वय २० वर्षे असावं.
आयआयएममध्ये व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा, हा इतर संस्थांपेक्षा अधिक उच्च श्रेणीचा असतो. या अभ्यासक्रमामध्ये, जागतिक दर्जाचे व्यवस्थापक निर्माण व्हावेत, अशी संरचना केली असते. त्यामुळेच आयआयएमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देशविदेशातील कॉर्पोरेट, व्यवसाय, मोठे उद्योग, इंश्युरंस, बँकिंग, वित्तीय संस्था आणि स्टार्टअप यामध्ये अग्रक्रमाने नोकरीला लागतात. आयआयएममध्ये मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण ज्ञानाच्या बळावर वेगानं उच्च पदांवर पोहचतात. आयआयएम रोहतकने, हे वैशिष्ट्यूपर्ण व्यवस्थापकीय ज्ञान आणि विधि व सुशासन (गव्हर्नन्स) विषयक ज्ञानाचं एकत्रीकरण करुन विधि क्षेत्रासाठी आवश्यक ठरु पाहणाऱ्या, विधि-व्यवस्थापकां (लिगल मॅनेजर्स) ची गरज भागविण्यासाठी, बीबीए-एलएलबी हा अभ्यासक्रम २०२१ साली सुरु केला.
काय शिकाल?
अभ्यासक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना, कम्पॅरिटिव्ह लॉ, इंटरनॅशल लॉ, डोमेस्टिक लॉ, फॉरेन लॉ अशा विविधांगी घटकांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. त्याच बरोबर, व्यवसाय व्यवस्थापन, मानव्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी), परकीय भाषा (फॉरेन लँग्वेज) या विषय घटकांचाही अभ्यास करता येतो.
संपर्क – आयआयएम, मॅनेजमेंट सिटी, सदर्न बायपास रोड, एनएच १० सुनारिआ, रोहतक- १२४०१०, रोहतक, दूरध्वनी- ०१२६२-२२८६१३, संकेतस्थळ- iimrohtak.ac.in, ईमेल- ipladmission@ iimrohtak.ac.in
इतर संस्था
(१) नॅशनल ॲकॅडेमी ऑफ लिगल स्टडीज ॲण्ड रिसर्च (नाल्सार) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद – या संस्थेच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटने बीबीए- एमबीए (इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेट) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांनी १२ वी परीक्षेत ५० टक्के गुण मिळवायला हवेत.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा (नालसार मॅनेजमेंट एंट्रन्स टेस्ट- अंडर ग्रॅज्युएट) अथवा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर मार्फत घेण्यात येणाऱ्या आयपीएमएटी (इंटिग्रेटेड प्रोग्रॅम मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट) चाळणी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. एकूण ६६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापैकी ३० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येतात. गुणवत्ता यादी तयार करताना ७५ टक्के वेटेज चाळणी परीक्षेतील कामगिरीला आणि २५ टक्के वेटेज मुलाखतीतील कामगिरीस दिले जाते.
ही परीक्षा १०० गुणांची आहे. संख्यात्मक कल चाचणी (क्वांटिटेटिव्ह ॲप्टिटयूड) या विषय घटकावर ५० प्रश्न आणि तार्किक विश्लेषण आणि भाषा कौशल्य (रिझनिंग आणि व्हर्बल ॲबिलिटी) या विषय घटकावर ५० प्रश्न विचारले जातील. दोन्ही विभागाचा कालावधी – प्रत्येकी साठ मिनिटे. https://apply.nalsar.ac.in/ipm-application-form या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज करता येतो.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात पुढील काही विषयांचा अभ्यास करण्याची सुविधा आहे- (१) ऑपरेशन ॲण्ड सिस्टिम, (२) मार्केटिंग, (३) इनोव्हेशन ॲण्ड सस्टेनिबिलिटी मॅनेजमेंट, (४) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, (५) फायनांस (६) कोर्ट मॅनेजमेंट, (७) बिझिनेस रेग्युलेशन्स, (८) कॉर्पोरेट गर्व्हनन्स, (९) बिझिनेस ॲनॅलिटिक्स
तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाचा अभ्यासक्रम संपल्यावर कॉर्पोरेटमध्ये इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
संपर्क -https://doms.nalsar.ac.in/ ईमेल- ipmadmissions@ nalsar.ac.in
(२) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर- या संस्थेच्या, स्कूल ऑफ मॅनेजमेंटने, व्यवस्थापन व विधि शिक्षणाचे सांगड घालणारे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) बीबीए- एलएलबी, या अभ्यासक्रमाचा कालावधी- पाच वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी क्लॅट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. एकूण ६० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यापैकी ३७ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. ३० टक्के जागा महिलांसाठी व ५ टक्के जागा दिव्यांग आणि १ टक्के जागा अनाथ संवर्गासाठी राखीव आहेत. इतर १७ जागा या अखिल भारतीय स्तरावरील आहेत.
(२) इंटिग्रेटेड बीबीए-एमबीए इन लॉ ॲण्ड मॅनेजमेंट, कालावधी-पाच वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी क्लॅट परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येतात.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात पुढील विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे- (१) बिझिनेस एन्व्हिरॉन्मेंट, (२) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, (३) बिझिनेस कम्युनिकेशन,(४) कांस्टिट्यूशनल लॉ, (५) कॉर्पोरेट फायनांस, (६) मार्केटिंग मॅनेजमेंट, (७) फायनांशिअल सर्व्हिसेस मार्केट्स ॲण्ड इंस्टिट्यूशन्स, (८) ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चैन मॅनेजमेंट, (९) बिझिनेस इकॉनॉमिक्स ॲण्ड मॅथेमॅटिक्स, (१०) कॅपिटल मार्केट्स ॲण्ड सेक्युरिटिज लॉ, (११) क्रिमिनल लॉ, (१२) लेबर लॉ, (१३) एन्व्हिरॉन्मेंट लॉ, (१४) फायनांशिअल अकाउंटिंग, (१५) कॉर्पोरेट गव्हर्नन्स, इथिक्स ॲण्ड रिलेटेड लॉज, (१६) इकॉनॉमिक ॲण्ड सायबर लॉज, (१७) इनडायरेक्ट टॅक्स लॉज, (१८) सिव्हिल प्रोसिजर कोड, (१९) क्रिमिनल प्रोसिजर कोड, (२०) ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ.
संपर्क- महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी, पैठण रोड कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर-४३१००५, ईमेल- support@mnlua.ac.in संकेतस्थळ https://mnlua.ac.in/contact
(४) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर –
या संस्थेचे अभ्यासक्रम- (१) बीए-एलएलबी (एकूण जागा- १२०, या सर्व जागा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.), (२) बीबीए (ऑनर्स) -एलएलबी (एकूण जागा- ६०, या सर्व जागा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.), (३) बीबीए (ऑनर्स) इन ॲडज्युडिकेशन ॲण्ड जस्टिसिंग)- एलएलबी (एकूण जागा- ६०, या सर्व जागा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.) सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, क्लॅट (अंडरग्रॅज्युएट) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क- वारंगा बुटीबोरी, नागपूर- ४४११०८, संकेतस्थळ-https://www.nlunagpur.ac.in, ईमेल-admission@nlunagpu.ac.in , दूरध्वनी-०७१२-२८१२६०५
(४) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ओडिसा- येथे बीबीए – एलएलबी अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमामध्ये वित्तीय व्यवस्थापन, विपणन, मनुष्यबळ व्यवस्थापन, वित्तीय बाजार आणि संस्था, नैतिक उद्योजकता आणि नेतृत्व गुण, व्यवस्थापनाची तत्वे आणि कार्य, कॉर्पोरेट लेखा, संस्थात्मक वर्तणूक, अधिग्रहण, कॉर्पोरेट पुनर्रचना, वित्तीय अहवाल आणि विश्लेषण, व्यवस्थापकीय मानसशास्त्र आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. प्रवेशासाठी क्लॅट परिक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क-https://nluo.ac.in
(५) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूर- येथे बीबीए-एलएलबी पाच वर्षे कालवधीचा अभ्यासक्रम करता येतो.प्रवेशासाठी क्लॅट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क- https://nlujodhpur.ac.in
सुरेश वांदिले