(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्मार्ट फॅशन,स्मार्ट करिअर

१२ वीनंतर कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. विशेषत: वस्त्रप्रावरणांच्या बाबतीत तर अशा संधी स्वत:सुध्दा निर्माण करता येऊ शकतात. कौशल्य निर्मितीचं हे महत्व लक्षात घेऊन नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने १२वीनंतरचे एक वर्षं कालावधीचे अनेक अभ्यासक्रम सुरु केले आहेत.हे अभ्यासक्रम या संस्थेच्या वेगवेगळया कॅम्पसमध्ये करता येतात. मात्र हे अभ्यासक्रम केवळ करायचे म्हणून केल्यास,त्याचा लाभ होण्याची शक्यता कमीच राहील. वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रात मनापासून काम करण्याची इच्छा,सर्जनशीलता आणि सैध्दांतिक आणि प्रात्यक्षिकांचा समजून उमजून केलेला अभ्यास याव्‍दारे संधी मिळवणं म्‍सुलभ जाऊ शकतं. कोणत्याही मोठ्या रस्त्यावरुन जात असताना सर्वाधिक दुकानं ही कपड्यांची असते.खाण्यापिण्याच्या दुकानानंतर किंवा तेवढीच गर्दी या दुकानांमध्ये असते.आजकाल नव्या कपड्यांचा हंगाम सर्वकाळ स्‍असतो.त्यामुळे दर महिन्या दोन महिन्याला नवी नवी वस्त्रं मार्केटमध्ये येत असतात.या सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षित मनुष्यबळ संबंधित कंपन्या,उद्योग,स्टार्टअप यांना लागतं.या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून असं मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकतं.असे काही अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत.सर्व अभ्यासक्रमांना कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.कालावधी प्रत्येकी एक वर्षं.सर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.स्‍वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन  व साहाय्य केलं जातं. या अभ्यासक्रमांना थेट प्रवेश दिला जातो.अर्ज केलेल्या उमेदवारांची सामान्य स्वरुपाची कलचाचणी अथवा मुलाखत  घेतली जाऊ शकते किंवा यापैकी काहीही न घेता प्रवेश दिला जाऊ शकतो.

अभ्यासक्रम आणि संस्था

(१) सर्टिफिकेट इन ॲथलेश्युअर विअर-खेळाडूंसाठीच्या वस्‍त्रप्रावरण डिझाइन,पॅटर्न तयार करणं,निर्मिती आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो.एकूण जागा-३५.

(२)सर्टिफिकेट इन क्रिएटिव्ह टेक्सटाइल डिझाइन- प्रिंटिंग,डायिंग,एम्ब्रॉयडरी,नमूना विकास(सॅम्पल डेव्हलपमेंट),आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो.एकूण जागा-३५.

(३) सर्टिफिकेट इन क्लोदिंग प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी- ‍निर्मिती नियोजन आणि नियंत्रण, टेक्सटाइल सायन्स,वस्त्रप्रावरणं यंत्रसामग्री,पॅटर्न डिझाइन,गुणवत्ता नियंत्रण आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी कोलकता येथे करता येतो.एकूण जागा-३५.

(४) सर्टिफिकेट इन क्रिएटिव्ह थिंकिंग ॲण्ड डिझाइन डेव्हलपमेंट- डिझाइन कौशल्य आणि विकास,फॅशन चित्रांकन,पॅटर्न डेव्हलपमेंट,आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो.एकूण जागा-४०.

(५) सर्टिफिकेट इन कंटेम्प्ररी टेक्निक इन कंस्ट्रक्शन डिझाइन- कॉम्प्युटर एडेड डिझाइन आणि डिजिट डिझाइनचे तंत्र,आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी वाराणसी येथे करता येतो.एकूण जागा-३५.

(६) सर्टिफिकेट इन बुटिक ॲपेरल ॲण्ड ॲक्सेसरी-फॅशन रेखांकने(इलुस्ट्रशेन),बुटिक व्यवस्थापन,डिझानचा विकास,वस्त्र निर्मिती,पृष्ठभागावरील सखोल शिवणकाम,एम्ब्रॉयडरी,मूल्यनिर्धारण,आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी  कोलकता(जागा-३५) आणि दिल्ली(जागा-४०) येथे करता येतो.

(७) सर्टिफिकेट इन डिझाइन डेव्हलपमेंट फॉर एथनिक विअर-भारतीय पारंपरिक वस्त्रप्रावरणं,एम्ब्रॉयडरी आणि पृष्ठभागावरील डिझाइनचं तंत्र,रेखांकने,धाग्यांचे ज्ञान आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी चेन्नई येथे करता येतो.एकूण जागा-३०.

(८) सर्टिफिकेट इन डिझाइन इनोव्हेशन इन फॅशन ॲण्ड टेक्सटाइल- ‍डिजिटल माध्यमांचा उपयोग करुन घर, जागा,  आणि फॅशन क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण,कल्पक आणि हटके टेक्सटाइल डिझाइनचं प्रशिक्षण दिलं जातं.हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो.एकूण जागा-३०.

(९) सर्टिफिकेट इन डिझायनिंग ॲण्ड स्टायलिंग फॉर इंडियन फॅशन- फॅशन छायाचित्रण,फॅशन रेखांकने,स्टायलिंग,मेकअप,पॅटर्न निर्मिती, व्यवसाय संकल्पना,डिझाइन प्रकिया आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो.एकूण जागा-४०.

(१०) सर्टिफिकेट इन फॅशन ॲपरेल्स ॲण्ड ॲक्सेसरी डिझाइन- चामडीपासून आणि चामडीशिवाय तयार करण्यात येणाऱ्या फॅशनेबल वस्तू,या क्षेत्रातील उद्योगाची स्थिती,धागे आणि चामडींपासून वस्त्रप्रावरणं किंवा वस्तू निर्मितीचं तंत्र,कट वर्क,पॅच वर्क आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी कोलकता येथे करता येतो.एकूण जागा-३५.

(११) सर्टिफिकेट इन फॅशन क्लोदिंग टेक्नॉलॉजी – फॅशन रेखांकने आणि तांत्रिक चित्रांकन,पॅटर्न विकास आणि शिवण कौशल्य,पाश्चिमात्य आणि इंडो-वेस्टर्न पोषाख,बाजार सर्वेक्षण,टेक्सटाइल विज्ञान,संसाधने आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी बेंगळुरु,हैदराबाद,मुंबई, वाराणसी- या सर्व कॅम्पसमध्ये प्रत्येकी ३० जागा. दिल्ली (एकूण जागा-४०.) आणि कोलकता(एकूण जागा-३५.) येथे करता येतो.

(१२) सर्टिफिकेट इन फॅशन इंटिग्रेशन फॉर टेक्सटाइल- डिझाइन प्रकिया,वस्‍त्रप्रावरणांच्या निर्मितीसाठी ग्रॅफिक आणि डिजिटल डिझाइनचे सॉफ्टवेअर,निर्यात व्यवस्थापन आणि व्यापार,धागे आणि वस्त्रांच्या किमती,प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि मार्केट विकास आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी बेंगळुरु येथे करता येतो.एकूण जागा-३०.

(१३) सर्टिफिकेट इन फॅशन निटवेअर ॲण्ड प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी- पॅटर्न तयार करणं,शिवणकाम,अंतवस्त्र निर्मिती आणि नियोजन,मूल्यनिर्धारण,व्यापार,गुणवत्ता, विपणन आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी कोलकता(एकूण जागा-३५) आणि चेन्नई(एकूण जागा-३०) येथे करता येतो..

(१४) सर्टिफिकेट इन फॅशन रिटेल मॅनेजमेंट-फॅशन विपणन,किरकोळ खरेदी,व्यापार,ग्राहक संबंधाचे व्यवस्थापन,नाममुद्रा(ब्रँड)व्यवस्थापन,विक्री व्यवस्थापन आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी बेंगळुरु(एकूण जागा-३०),मुंबई(एकूण जागा-१५),दिल्ली(एकूण जागा-४०) येथे करता येतो.

(१५) सर्टिफिकेट इन ग्रॅफिक डिझाइन ॲण्ड कम्युनिकेशन- विविध प्रकारचे डिझाइन,ग्रॅफिक्स,संहिता लेखन,टायपोग्रॅफी,कॉर्पोरेट ग्रॅफिक्स,पोस्टर आणि घडिपत्रिका डिझाइन,छपाईचे तंत्र,सादरीकरणाचे तंत्र,वेब ग्रॅफिक,डिजिटल पोर्ट फोलिओ आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो.एकूण जागा-३०.

(१६) सर्टिफिकेट इन गार्मेट प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲपेरल डिझाइन- व्यापार,निर्यात,फॅशनेबल वस्त्रप्रावरणांसाठी लागणारे साहित्य,वस्त्र निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण,आंतरराष्ट्रीय व्यापार पध्दती,प्रकिया आणि व्यवस्थापन आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी गांधीनगर येथे करता येतो.एकूण जागा-३०.

(१७) सर्टिफिकेट इन इंटेरिअर डिझाइन ॲण्‍ड स्पेस प्लॅनिंग- डिझाइन थिंकिंग,तांत्रिक आणि प्रात्यक्षिक कौशल्ये,डिझाइन प्रकिया,नवे प्रवाह,वस्तू आणि साधने आणि साहित्याचे ज्ञान,चित्रांकन आणि रेखांकनाचे कौशल्य,तांत्रिक चित्रांकन,सादरीकरणाचे तंत्र आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो.एकूण जागा-३५.

(१८) सर्टिफिकेट इन गार्मेंट एक्स्पोर्ट मर्कंडायजिंग मॅनेजमेंट-

व्यापार,निर्यात,फॅशनेबल वस्त्रप्रावरणांसाठी लागणारे साहित्य,वस्त्र निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण,आंतरराष्ट्रीय व्यापार पध्दती,प्रकिया आणि व्यवस्थापन आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो.एकूण जागा-३०.

(१९) सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट ऑफ फॅशन बिझिनेस- निर्मिती व्यवस्थापन, किरकोळ व्यवस्थापन ,संस्थात्मक कार्याचं कौशल्य, धाग्यांचे ज्ञान, फॅशन प्रकियेचे ज्ञान आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा- ३५.

(२०) सर्टिफिकेट इन व्हिज्युअल मर्कंडायजिंग ॲण्ड डिजिटल डिझाइन- फॅशन आणि नव्या प्रवाहांचं चक्र, फॅशनेबल वस्त्रप्रावरणांच्या दुकानांचा अभ्यास, अशा दुकानांसाठी डिझाइनचे महत्व, ब्रँडेड कपडयांसाठीचे खास विंडो(खिडकी) डिझाइन, ग्राहक आणि बाजाराच्या गरजा, फॅशनेबल वस्त्रप्रावरणांसाठी लागणारे साहित्य, आदी बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम एनआयएफटी दिल्ली येथे करता येतो. एकूण जागा-२५.

संपर्क https://nift.ac.in/cep