गेल्या तीन- चार वर्षात वेगवेगळया सर्वेक्षण संस्था , बिझिनेस मॅगेझिन यांनी केलेले सर्वेक्षण आणि विद्यार्थी व पालकांचा कल आणि ओढा लक्षात घेतल्यास पुढील बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्यास चांगल्या करिअरची संधी सुलभतेनं मिळू शकते-
(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- अहमदाबाद, (२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- बेंगळुरु, (३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कोलकता, (४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- लखनौ, (५) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- इंदौर, (६) एस.पी.जैन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- मुंबई, (७) मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट -गुरगाँव, (८) फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- नवी दिल्ली, (९) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड- नवी दिल्ली, (१०) नर्सी मोन्जी स्कूल ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट- मुंबई, (११) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- शिलाँग, (१२) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- पुणे, (१३) सिम्बॉयसीस सेंटर फॉर मॅनेजमेंट ॲण्ड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट- पुणे, (१४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-उदयपूर, (१५) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी दिल्ली, (१६) शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट- आयआयटी- मुंबई, (१७) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-तिरुचिरापल्ली, (१८) झेव्हियर इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-जमेशदपूर, (१९) जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – मुंबई, (२०) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- काशीपूर, (२१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आधीचे नॅशनल इंस्टिट्यूट इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग)- मुंबई, (२२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नागपूर, (२३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-अमृतसर, (२४) सिडनेहॅम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – मुंबई, (२५) डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल ॲण्ड मॅनेजमेंट इंजिनीअरिंग- आयआयटी कानपूर, (२६) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – संबलपूर, (२७) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – बोधगया, (२८) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक एंटरप्राइज – हैदराबाद, (२९) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट – भोपाळ, (३०) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट-आनंद, (३१) इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – बनारस हिंदु युनिव्हर्सिटी वाराणसी, (३२) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप- आयआयटी धनबाद, (३३) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी रुरकी, (३४) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी गौहाटी, (३५) विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंट – आयआयटी खरगपूर, (३६) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंस- आयआयटी मद्रास, (३७) स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिन्युरशिप -आयआयटी जोधपूर, (३८) स्कूल ऑफ मॅनेजमेंट -आयआयटी मंडी, (३९) झेव्हियर इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भूवनेश्वर, (४०) डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स ॲण्ड बिझिनेस, दिल्ली स्कूल ऑफ बिझिनेस- दिल्ली, (४१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-संबलपूर, (४२) डिपार्टमेंट ऑफ ऑफ मॅनेजमेंट- बिट्स पिलाणी, (४३) स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – कोझिकोड, (४४) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंस (पुणे विद्यापीठ), (४५) इंस्टिट्यूट ऑफ ॲग्रीबिझिनेस मॅनेजमेंट -बिकानेर, (४६) वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कुऑपरेटिव्ह मॅनेजमेंट- पुणे, (४७) इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च- जयपूर, (४८) सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्सटाइल्स ॲण्ड मॅनेजमेंट- कोईम्बतूर, (४९) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – रायपूर, (५०) के.जे सोमय्या इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायंस मुंबई, (५१) अखिलेश दिनेश मोदी इंस्टिट्यूट फॉर फायनांशिअल ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज- मुंबई, (५२) एल.एन. वेलिंगकर इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च- मुंबई,
इंडियन बिझिनेस स्कूल
हैदराबाद येथील इंडियन बिझिनेस स्कूल ही संस्था कोणत्याही सर्वेक्षणात सहभागी होत नाही. तथापि या संस्थेची गुणवत्ता आणि दर्जा वादातीत आहे. या संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जीमॅट किंवा जीआरइ (ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन) परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. या परीक्षा संबंधिताने परीक्षा केंद्रावर जाऊन दिलेल्या असाव्यात. येथील, “पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट” या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन वर्षाच्या कामाचा अनुभव आवश्यक समजला जातो.
संपर्क https://www.isb.edu
रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट
याचा अर्थ प्रवेशासाठी लागणारे शुल्क अथवा संपूर्ण अभ्यासक्रमासाठी लागणारा खर्च आणि वार्षिक पॅकेजच्या रुपाने मिळणारा परतावा.
आयआयएमसह खाजगी संस्थांचे प्रवेश शुल्क, एकूण खर्च आणि पॅकेज यामध्ये मोठे अंतर पडते. काही आयआयएमच्या शिक्षणावर केलेल्या खर्चापेक्षा कमी वार्षिक पॅकेज बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळते. तथापि आपल्या देशातील काही बिझिनेस स्कूलमध्ये शुल्क कमी आणि वार्षिक पॅकेजच्या रुपातला परतावा अधिक असतो. अशा काही संस्था पुढील प्रमाणे आहेत-(१) डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स ॲण्ड बिझिनेस, दिल्ली स्कूल ऑफ बिझिनेस- दिल्ली, (२) फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- दिल्ली,
(३) फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च अलिगढ, मुस्लिम युनिव्हर्सिटी- अलिगढ
(४) फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बडोदा युनिव्हर्सिटी-वडोदरा, (५) इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी – वाराणसी, (६) सिडनेहॅम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च , – मुंबई, (७) डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल ॲण्ड मॅनेजमेंट इंजिनीअरिंग -आयआयटी कानपूर, (८) स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज -एनआयटी कोझिकोड , (९) द बिझिनेस स्कूल – युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू
(१०) जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज -मुंबई
सावधगिरी बाळगा
आपल्या देशात व राज्यातही कुत्र्याच्या छत्रीसारख्या बिझिनेस स्कूल निघाल्या आहेत. त्यांना कोणत्याही परीक्षेतील गुण चालतात. त्याला फारशी अट सुध्दा नसते. कोणतीही चाळणी परीक्षा दिली नसल्यास अशा संस्था स्वत:च्या ऑनलाइन परीक्षाही घेतात. कोणत्याहीप्रकारे विद्यार्थी, संस्थेच्या गळाला लागला पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातात. एमबीएच्या मोहात पडलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी या दृष्टिने विशेष दक्ष असणं आवश्यक ठरतं. बऱ्याच बिझिनेस स्कूल दरवर्षी, “आमचे इतक्या मुलांना हायेस्ट (सर्वोच्च) पॅकेज इतकं मिळालं, मिडियन (मध्यम श्रेणी) आणि ॲव्हरेज (सरासरी पॅकेज) इतकं-इतकं मिळालं याच्या मोठमोठ्या जाहिराती देतात. काही संस्थांचे पॅकेज आयआयएमपेक्षाही मोठे वाटतात. हायेस्ट आणि ॲव्हरेज पॅकेजमधील तफावतही लक्षणीय असतो. या बाबी ध्यानात घेणं गरजेचं आहे. प्रवेश घेण्यापूर्वी संस्थेचा दर्जा, प्राध्यापकांची संख्या आणि उपलब्धता, उद्योगजगताशी संपर्क आणि संबंध, प्लेसमेंटसाठी कंपन्या खरोखरच येतात का? त्यांची संपूर्ण माहिती घ्यायलाच हवी. प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्यांची नावे त्यांच्या नाममुद्रांसह संकेतस्थळावर दिली जातात. त्याचीही खातरजमा करायला हवी.
प्लेसमेंटसाठी कंपन्या किंवा कॉर्पोरेट हाऊस किंवा उद्योग येत नसल्यास, त्या शिक्षण संस्थेच्या गुणवत्तेबद्दल मार्केटमध्ये चांगले मत नाही, हे लक्षात घ्यावे. अशा संस्थेतील मुलांना पुढे नोकरी मिळणे सुलभ जात नाही. उमेदीचा काळ हा नैराश्यात परावर्तीत करणारा असतो. काही संस्थांमध्ये अगदीच थातूरमातूर प्रकारातील कंपन्या येतात आणि वार्षिक लाख- दीड लाखाचे पॅकेजेस देऊ करतात. तेसुध्दा अर्ध्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनाच मिळतं. अशा संस्थांमध्ये प्रवेश घेताना सावधगिरी बाळगायला हवी. “तुम्ही आमच्याकडे प्रवेश घ्याच, तुमचे कल्याण होईल”, असे सांगणारे अनेक दलाल पालकांना आणि विद्यार्थ्यांना भेटू शकतात. त्यांच्यापासूनही सावधगिरी बाळगायला हवी.
चाळणी परीक्षेसाठीची माहिती ही आता संगणकीय स्वरुपात भरली जात असल्याने “कॅट” किंवा “एमएचसीइटी-एमबीए/एमएमएस” परीक्षेतील विद्यार्थ्यांची नावे आणि पर्सेंटाइल अनेक संस्थांना कळतात. अशा काही संस्था चकचकित माहितीपत्रक घरी पाठवतात. त्यावर संस्थेची आकर्षक पध्दतीने माहिती दिली असते. त्यातही पॅकेजच्या माहितीवर भर दिला जातो. यातील काही संस्था आपला भ्रमणध्वनी क्रमांक मिळवतात आणि सतत फोन करुन प्रवेशाविषयी आग्रह धरतात. अशा आग्रहाला बळी न पडलेलं कधीही चांगलं.
आता काही नामवंत संस्थांनी वेगवेगळ्या शहरात दुकानं उघडावी तशी कॅम्पसेस उघडली आहेत. मूळ कॅम्पसमध्ये प्रवेश मिळत असल्यास, तो स्वीकारावा. इतर शहरातील कॅम्पसमधील शैक्षणिक दर्जा आणि प्लेसमेंटबद्दल खात्रीलायक काही सांगता येत नाही. काही संस्थांनी दुबई, सिंगापूर सारख्या शहारांमध्ये आपल्या शाखा उघडल्या आहेत. “तुम्ही भेटा आणि प्रवेश घ्या,” अशा आशयाच्या जाहिराती येणं सुरु झाल्या आहेत. त्यापासून सावध राहिलेलं बरं.
सुरेश वांदिले