डिझाइन हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा समजला जातो. त्यामुळेच घरापासून ते घागऱ्यापर्यंत साऱ्याच गोष्टी डिझाइन केलेल्या मिळतात. दर्जा, गुणवत्ता आणि कलात्मकता या बाबी डिझाइनशी निगडीत आहेत.
उच्चवर्गापुरतं मर्यादित असलेलं, डिझायनर्स जीवन जगण्याचं स्वप्न आता उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना पडू लागलं आहे. डिझायनिंगच्या नव्या तंत्र आणि मंत्रामुळे हे स्वप्न साकार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळेच विविध प्रकारच्या डिझायनर्सना करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळायला लागल्या आहेत. या डिझायनर्सनी आपला अभ्यासक्रम जर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेतून केलेला असल्यास त्यांच्या करिअरचा ग्रॉफ हा सदैव चढत राहतो.
डिझायनिंगच्या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक इंडियन इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेने निर्माण केला असला तरी या संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी मराठी मुले विशेष प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे या संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी गेल्या काही वर्षात अत्यल्प मराठी मुलं निवडली गेली आहेत.
विविध १७ विषयांमध्ये डिझाइनचे अभ्यासक्रम चालविणारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ही आपल्या देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव संस्था होय. या अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
डिझाइनचे प्रशिक्षण देणाऱ्या परदेशातील १६ संस्थांशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी विशेष कार्यक्रम सुरु केले आहेत. या संस्थेमार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जातात.
पदवी अभ्यासक्रम
या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील १२वी उतीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.उच्च माध्यमिक (एचएससी)-व्होकेशलन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता असलेल्या तंत्रशिक्षण मंडळाच्या तीन वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.(या सर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.) या अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील तीन शांखामध्ये स्पेशलायझेशन करता येतं. (१)इन्डस्ट्रीएल डिझाइन (प्रॉडक्ट/ फर्निचर / इन्टेरेरिअर डिझाइन, सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन) (२) टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल (३) मीडिया डिझाइन (ग्रॅफिक/ ॲनिमेशन/फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन/एक्झिबिशन)
या संस्थेच्या अहमदाबाद, आंध्रपदेश, हरयाणा, मध्यप्रदेश आणि आसाम या पाच ठिकाणी कॅम्पसेस आहेत. अहमदाबाद कॅम्पसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो.यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पाच वर्षे कालावधीचा पूर्णकालीन पीएचडी अभ्यासक्रमही सुरु करण्यात आला आहे.इतर कॅम्पसेसमध्ये सध्या फक्त पदवी अभ्यासक्रम करण्याची सुविधा आहे.
प्रवेश प्रक्रीया
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.
(१)अहमदाबाद कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)ॲनिमेशन फिल्म डिझाइन- एकूण जागा- १९,(२)एक्झिबिशन डिझाइन- एकूण जागा-१३, ,(३)फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-१९,
(५)सिरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन- एकूण जागा-१३, (६)फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन- एकूण जागा-१३, (७)प्रॉडक्ट डिझाइन- एकूण जागा-१९,
(८)टेक्स्टाइल डिझाइन- एकूण जागा-१९. अशा एकूण १२५ जागा आहेत.
या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन सत्रांचा पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच फाऊंडेशन कोर्स करणे बंधनकारक आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि विषयाचा पर्याय लक्षात घेऊन शाखा प्रदान केली जाते.
(२)आंध्रपदेश कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाईल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५,अशा एकूण ७५ जागा आहेत.या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच फाऊंडेशन कोर्स करणे बंधनकारक आहे.
(३)हरयाणा कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाईल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५,अशा एकूण ७५ जागा आहेत. या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन सत्रांचा पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच फाऊंडेशन कोर्स आणि सहा सत्राचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करणे बंधनकारक आहे.
(४)मध्य प्रदेश कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाईल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५,अशा एकूण ७५ जागा आहेत.
(५)आसाम कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाईल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५,अशा एकूण ७५ जागा आहेत. या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच फाऊंडेशन कोर्स आणि सहा सत्राचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करणे बंधनकारक आहे.
हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि विषयाचा पर्याय लक्षात घेऊन शाखा प्रदान केली जाते.
या सर्व ठिकाणी १० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग,२७ टक्के जागा ओबीसी-एनसीएल (इतर मागासवर्ग-नॉन क्रिमी लेअर)संवर्ग,१५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव आहेत. सर्व संवंर्ग मिळून एकूण ५ टक्के जागा दिव्यांगासाठी राखीत आहे. गुणवत्ता यादित पहिल्या पाच टक्क्यांमध्ये येणाऱ्या दिव्यांगाचा विचार केला जातो. या उमेदवारांना दिव्यांग प्रमाण पत्रसादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. इतर कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्गाचे प्रमाणपत्र १ एप्रिल २०२५ रोजी किंवा त्यानंतर प्राप्त केलेले असावे.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येईल. डिझाइन ॲप्टिट्यूट टेस्ट(डॅट-प्राथमिक)या नावाने ही परीक्षा ओळखली जाते. या परीक्षेत विशिष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची, डिझाइन ॲप्टिट्यूट टेस्ट(डॅट-मेन)परीक्षेसाठी केली जाईल. ही परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये घेतली जाईल. डॅट- प्राथमिक या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर ही केंद्रे आहेत. डॅट-मेनचे परीक्षा केंद्र नंतर घोषित केले जाईल. डॅट मेन परीक्षेमध्ये स्टुडिओ सेटमध्ये सुध्दा एक चाचणी द्यावी लागू शकते.
सुरेश वांदिले