कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (अंडर ग्रॅज्युएट) सीयुईटी मुळे एका नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात होत असल्याचे म्हंटल्यास वावगे ठरु नये. या परीक्षेमुळे आता आरमोरी सारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यास देशातील दर्जेदार अशा शैक्षणिक संस्थेत मनाजोगत्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवता येऊ शकेल. या सामायिक परीक्षेच्या गुणांचा आधार सर्व केंद्रिय विद्यापीठे त्यांच्या अभ्यासक्रमांसाठी घेतील. त्याशिवाय काही नामवंत खाजगी शैक्षणिक संस्थांही या परीक्षेतील गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरणार आहेत.
परीक्षा केंद्रे
ही परीक्षा देशातील ५४७ शहरांमध्ये घेण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्राच्या पुढील शहरांचा समावेश आहे – गोंदिया, जळगाव, लातूर, नवी मुंबई, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, मुंबई , नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर.
विद्यार्थी आपल्या पंसतीच्या चार केंद्राची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये करु शकतो. पहिल्या पसंतीचे शहर/केंद्रच उपलब्ध करुन देण्याचा काटेकोर प्रयत्न केला जाईल. तथापि काही प्रशासकीय कारणांमुळे हे शक्य झाले नाही तर इतर शहर/केंद्र उपलब्ध करुन दिले जाईल. एकदा निवडलेले केंद्र बदलता येणार नाही.
अर्हता – यंदा १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले किंवा १२ वीची परीक्षेला बसलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेला बसण्यासाठी वयोमर्यादेची अट नाही. (मात्र काही विद्यापीठांसाठी वयोमर्यादा निर्धारित केली जाते. त्यामध्ये संबंधित विद्यार्थी बसणे आवश्यक आहे.) केवळ या परीक्षेतील गुणवत्ता यादित येऊन चालणार नाही. प्रत्येक विद्यापीठाचे प्रवेशाचे धोरण वेगवेगळे राहू शकते. या धोरणानुसार प्रवेश निश्चित केला जाईल. त्यामुळे ज्या विद्यापीठात प्रवेश घेण्याची इच्छा असेल, त्या विद्यापीठाच्या प्रवेश अर्हतेत आपण बसतो अथवा नाही, याची खातरजमा विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. संबधित संस्थेच्या संकेतस्थळावर अशी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
संपर्क- ईमेल- ug@nta.ac.in, दूरध्वनी- ०११-४०७५९०००
००००
काही विद्यापीठे आणि अभ्यासक्रम
गुरुकूल कांग्री
अभ्यासक्रम- (१) बीए-ऑनर्स (वेदालंकार/ विद्यालंकार), -(२) बीए- ओरिएंटल स्टडीज ॲण्ड ह्युमॅनीटिज, (३) बॅचलर ऑफ -फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स
०००
राजीव गांधी युनिव्हर्सिटी https://rgu.ac.in/
अभ्यासक्रम- (१) बॅचलर ऑफ म्युझिक, (२) बीए-एलएलबी, (३) बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, (४) बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
गुरुकूल कांग्री
अभ्यासक्रम- (१) बीए-ऑनर्स (वेदालंकार/ विद्यालंकार), -(२) बीए- ओरिएंटल स्टडीज ॲण्ड ह्युमॅनीटिज, (३) बॅचलर ऑफ -फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स
०००
आयईएस युनिव्हर्सिटी
www.iesuniversity.ac.in
अभ्यासक्रम- (१) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, (२) बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग, (३) बीटेक इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (४) बीटेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग, (५) बी.फार्मसी, (६) बी.मास कम्युनिकेशन, (७) बी एस्सी हॉटेल मॅनेजमेंट, (८) बीबीए, (९) बीएस्सी- नर्सिंग, (१०) बीएस्सी- ॲग्रिकल्चर, (११)बीएस्सी-बायोटेक्नॉलॉजी
०००
जगन्नाथ युनिव्हर्सिटी
https://www.jagannathuniversityncr.ac.in/
अभ्यासक्रम- (१) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन बँकिंग ॲण्ड फायनांस, (२) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन रिटेल मॅनेजमेंट, (३) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲण्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, (४) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन फॅशन टेक्नॉलॉजी, (५) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन मास कम्युनिकेशन, (६) बॅचलर ऑफ व्होकेशनल इन हॉस्पिटॅलिटी, हॉटेल, कॅटरिंग ॲण्ड टुरिझम, (७) बीए-एलएलबी, (८) बी.फिजिओथेरपी, (९) बी.डिझाइन, (१०) बी.कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन क्लॉऊड टेक्नॉलॉजी ॲण्ड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी, (११) बीटेक इन डेटा सायंस, (१२) बीटेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (१३) बीएस्सी-बीएड, (१४) बीए-कॉम्युनिटी हेल्थ सर्व्हिस, (१५) बीएस्सी- ॲडव्हॉस्न्ड केअर पॅरामेडिक्स, (१६) बीएस्सी-फिजिशिअन असोशिएट, (१७) बीएस्सी- रेडिओलॉजी ॲण्ड इमेजिंग टेक्नॉलॉजी, (१८) बीएस्सी-डायलेसिस टेक्नॉलॉजी, (१९) बीएस्सी-अनेस्थेशिया, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, (२०) बीएस्सी- मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, (२०) बीएस्सी-ऑनर्स- ॲग्रिकल्चर, (२१) बीएस्सी- मेडिकल
०००
जेपी युनिव्हर्सिटी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
https://www.juit.ac.in/
अभ्यासक्रम– बीएस्सी-ऑनर्स इन- मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग
०००
जीवाजी युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- (१) बीए-एलएलबी, (२) बीकॉम-एलएलबी,(३) बीएस्सी- ऑनर्स/रिसर्च (बायोकेमिस्ट्री) (४) बीएस्सी-ऑनर्स/रिसर्च (बॉटनी), (५) बीएस्सी – ऑनर्स/रिसर्च (केमिस्ट्री), (६) बीएस्सी-ऑनर्स/रिसर्च (फिजिक्स), (७) बीएस्सी – ऑनर्स/ रिसर्च (मॅथेमॅटिक्स), (८) बीएस्सी-ऑनर्स/रिसर्च (झुऑलॉजी), (९)बीबीए, (१०) बी.हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी, (११) बी. ट्रॅव्हल मॅनेजमेंट, (१२) बीए-ऑनर्स/रिसर्च (मास कम्युनिकेशन)
०००
लक्ष्मीबाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन
http://www.lnipe.edu.in/wordpress/
अभ्यासक्रम– बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
०००
मदनमोहन मालविया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी
http://www.mmmut.ac.in/
अभ्यासक्रम- (१) बी.फार्म, (२) बीबीए, (३) बीटेक-पदविकाधकांसाठी दुसऱ्या वर्गात प्रवेश
०००
आरएनबी ग्लोबल युनिव्हर्सिटी
https://www.rnbglobal.edu.in/
अभ्यासक्रम- (१) बीबीए- ह्युमन रिर्सोस मॅनेजमेंट, (२) बीबीए-फायनांस, (३) बीबीए-मार्केटिंग, (४) बीबीए – फॉरेन ट्रेड, (५) बीबीए- एलएलबी, (६) बीए-एलएलबी, (७) बी.कॉम-इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, (८) बी.कॉम- बिझिनेस स्टडीज, (९) बी.कॉम-मॅथेमॅटिक्स, (१०) बी.कॉम-इकॉनॉमिक्स, (११) बी.टेक-इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, (१२) बी.टेक-कॉम्प्युटर सायंस, (१३) बी.एस्सी-ॲग्रिकल्चर, (१४) बीसीए- इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, (१५) बीए- बिझिनेस स्टडीज/ सायकॉलॉजी/ इंग्लिश/ हिंदी
०००
सरदार पटेल युनिव्हर्सिटी ऑफ पोलीस सेक्युरिटी ॲण्ड क्रिमिनल जस्टिस
https://www.policeuniversity.ac.in/
अभ्यासक्रम– (१) बीए- सेक्युरिटी मॅनेजमेंट, (२) बीए-पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन
०००
शोबित युनिव्हर्सिटी
https://www.shobhituniversity.ac.in/
अभ्यासक्रम- (१) बीबीए (२) बीबीए – एलएलबी, (३) बीए-एलएलबी, (४) बीकॉम- एलएलबी, (५) बीए- सायकॉलॉजी- ऑनर्स, (६) बीएस्सी- ॲग्रिकल्चर, (७) बीटेक-बायोमेडिकल इंजिनीअरिंग, (८) बीटेक-बायोटेक्नॉलॉजी, (९)बीटेक-ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, (१०) बीटेक – कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग
०००
एसआरएम युनिव्हर्सिटी
https://srmap.edu.in/
अभ्यासक्रम – (१) बीबीए, (२) बीए- लिबरल आर्ट्स/ सायकॉलॉजी/ इंग्लिश/ इकॉनॉमिक्स, (३) बीएस्सी-ऑनर्स- मॅथेमॅटिक्स, (४) बीएस्सी- इंटिग्रेटिव्ह बॉयलॉजी, (५) बीएस्सी-केमिस्ट्री/ फिजिक्स/ कॉम्प्युटर सायंस
०००
तीर्थंकर महावीर युनिव्हर्सिटी
https://www.tmu.ac.in/
अभ्यासक्रम- (१) बी.फिजिओथेरपी, (२) बी.फिजिकल एज्युकेशन, (३) बी.फार्मसी, (४) बी.आप्टोमेट्री, (५) बी.मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, (६) बी.रेडिओलॉजिकल इमेजिंग टेक्निक, (७) बी.नर्सिंग, (८) बीबीए. (९) बीबीए- एलएलबी, (१०) बीए-एलएलबी, (११) बीकॉम-एलएलबी, (१२) बी.फाइन आर्ट्स, (१३) बीटेक इन मेकॅनिकल/ सिव्हिल/ कॉम्प्युटर सायंस, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, (१४) बीएस्सी- एनव्हिराँन्मेंट ॲण्ड सस्टेनेबिलिटी, (१५) बीएस्सी-ऑनर्स-फिजिक्स/ मॅथ्स/ केमिस्ट्री/ कॉम्प्युटर सायंस, (१६) बीएस्सी- ॲनिमेशन
गाग्लोटियास युनिव्हर्सिटी
https://www.galgotiasuniversity.edu.in/
अभ्यासक्रम- (१) बीएस्सी ऑनर्स – कॉम्प्युटर सायंस, (२) बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, (३) इंटिग्रेटेड बीसीए ॲण्ड एमसीए (४) बीएस्सी ऑनर्स – फिजिक्स, (५) बीएस्सी ऑनर्स – केमिस्ट्री, (६) बीएस्सी ऑनर्स- मॅथेमॅटिक्स, (७) बीएस्सी ऑनर्स-बॉटनी, (८) बीएस्सी ऑनर्स-फॉरेंसिक सायंस, (९) बीएस्सी-फूड सायंस ॲण्ड डायटेटिक्स, (१०) बीएस्सी ऑनर्स-मायक्रोबॉयलॉजी, (११) बीएस्सी ऑनर्स-झुऑलॉजी, (१२) बीएस्सी ऑनर्स- बायोमेडिकल सायंस, (१३) बीएस्सी- क्लिनिकल न्युट्रिशन ॲण्ड डायेटेटिक्स, (१४) बीएस्सी- मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, (१५) बीएस्सी फॅशन डिझाइन, (१६) बी.इंटेरिअर डिझाइन, (१७) बीबीए, (१८) बीबीए- मार्केटिंग ॲण्ड आटोमोबाईल मॅनेजमेंट, (१९) बीबीए- बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (२०) बीबीए- लॉजिस्टिक्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, (२१) बीबीए- एव्हिएशन मॅनेजमेंट, (२२) बीबीए- बँकिंग ॲण्ड फायनांशिअल सर्व्हिस ॲण्ड इंशुरंस, (२३) इंटिग्रेटेड बीबीए-एमबीए, (२४) बीकॉम-ऑनर्स-इंटरनॅशनल अकाउंटिंग ॲण्ड फायनांस, (२५) बीकॉम- ऑनर्स-फायनांशिअल मार्केटस, (२६) बीबीए- बँकिंग फायनांशिअल इन्व्हेस्टमेंट ॲनॅलिसीस, (२७) बीए- ऑनर्स- अप्लाईड सायकॉलॉजी, (२८) बीए – ऑनर्स – इंग्लिश, (२९) बीए – ऑनर्स-इकॉनॉमिक्स (३०) बीबीए- ट्रॅव्हल टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल, (३१) बीए- मास कम्युनिकेशन, (३२) बी.-हॉटेल मॅनेजमेंट, (३३) बीएस्सी-ऑनर्स- ॲग्रिकल्चर, (३५) बीए-एलएलबी, (३६) बीबीए- एलएलबी, (३७) बी.फिजिओथेरपी, (३८) बी.ऑप्टोमेट्री, (३९) बीएस्सी-मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, (४०) बीएस्सी- कॉर्डिओ व्हॅस्कुलर टेक्नॉलॉजी, (४१) बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (४२) बी.टेक इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, (४३) बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग, (४४) बी.टेक इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (४५) बी.टेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, (४६) बी.टेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस, (४७) बी.टेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग
सुरेश वांदिले(ekank@hotmail.com/९३२४९७३९४७)
०००