(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जिवंत पुस्तक

आज मी माझ्या जन्माची गोष्ट सांगणारेय. माझा जन्म झाला ८५ लक्ष दशलक्षापूर्वी! दचकलात का? दचकू नका. कारण पुढे अनेक अशा गोष्टी येतील नि तुम्ही प्रत्येक वेळी दचकू लागला तर गचकूनच जाल. हा हा हा! जाऊ द्या विनोद केला. तुमच्यापेक्षा मी खूप  म्हणजे खूपच सिनीयर, कारण तुम्ही...

‘व्हेनम’च्या परीक्षेत मेरिटने उत्तीर्ण

त्याला असं कधी वाटलं नव्हतं की, एखादे दिवशी साक्षात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्याचं खास कौतुक करतील. शाबासकी देतील. पण,ते प्रत्यक्ष घडलं. त्याने शोधलेला ‘व्हेमन’ मोदिजींना फार प्रभावित करुन गेला. ‘व्हेनम’चा तसा अर्थ ‘विष’. तुम्हाला वाटेल हा पठ्ठ्या ‘विषा’ची...

“डेटा” मित्र!

तो लहान होता, तेव्हापासूनच त्याला आकडेमोडीची गोडी लागली. गणितीय आकडेमोड करुन वेगवेगळ्या समस्या सोडवता येतात, हे त्याला तेव्हा कळलं. त्यामुळे त्याची आकडेमोडितील रुची आणि गती वाढली. यातूनच तो संगणकशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. संगणकीय तंत्रज्ञनाच्या प्रभावी वापरासाठी...

जिभेचा प्रताप!

परवा पान खात असताना, मालकीनबाईंची जीभ चावल्याने त्या जोरात ओरडल्या. बाजूलाच असलेली मार्गारेट मावशी आणि बिळात दडलेला रॉबिन्सन मामा चांगलाच दचकला. “काय झालं हो?,” असं मावशीला विचारावं वाटलं. पण मरु दे, आपल्याला काय? नाहीतरी, ही खाष्ट बाई सारखी खार खाऊन असते, हे आठवून...

“कवच”धारी!

ती, तेव्हा तिसऱ्या वर्गाची विद्यार्थीनी होती. किंचित लाजाळू ,बुजरी. याचा गैरफायदा घेऊन तिच्या वर्गातले काही मुलं आणि मुली घेऊन तिला त्रास देऊ लागले. कुणी तिला त्यांचे प्‍लेट्स स्वच्छ करायला लावत, तर कुणी बुटाचे लेस बांधायला सांगत. थोडक्यात ती एक प्रकारची रॅगिंगच होती...

पहिल्या कथेचा शोध!

बराच वेळ झाला तरी, अलेक्सा गोर्जीचा आवाज आला नाही, म्हणून तेजोयमी तिच्याकडे गेली. गोर्जी डोळे मिटून बसलेली तिला दिसली. तेजोमयी आल्याचं गोर्जीला कळलच नाही. तेजोमयीने तिच्या डोक्यावर टकटक केलं, तेव्हा भानावर येऊन तिने डोळे उघडले. “गोर्जे, दिवसाढवळ्या स्वप्न बघणं बरोबर...