(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ताईचा हत्ती?

बाबांच्या स्वप्नात “ताईचा” हत्ती यावा, असं वैष्णवीस परवा वाटलं. “त्या”, ताईची गोष्ट ऐकून ती फार प्रभावीत झाली होती. या ताईला तिच्या मनासारखं शिकायला मिळालं. पण आपल्याला तसं मिळेल की नाही, याची शंका सध्या वैष्णवीला सारखी येऊ लागली होती. वैष्णवी...

इईवुईआवटॉचॉवचा आनंद!

रेश्माच्या आवडीनिवडी वेगळया होत्या. कोणत्याही भाषेतील गाणं ऐकणं,  हा तिचा छंद होता. तमीळ , मल्याळम इतकच नव्हे तर तेलगू गाणीही ती ऐकायची. टीव्हीवरील सर्व भाषेतील गाण्याची चॅनेल्स तिने शोधून काढली. त्यांचा गुच्छ तिने केला. वेळ मिळाला की या चॅनेल्सवरील गाणं ती तास दोनतास...

फुलपाखरु तेजोमयीच्या स्वप्नाचं..

वर्क्तृत्व स्पर्धा म्हंटली की तेजोमयीचा उत्साह ओसंडून वाहायचा. चौथ्या वर्गापासून ती अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. यामुळे सभाधिटपणा येतो. आत्मविश्वास वाढतो असं तिचे बाबा तिला नेहमी सांगत. चौथ्या वर्गात असताना तिला त्यांच्या या सांगण्याचा अर्थ विशेष कळायचा नाही....

नवगुंजरा !

झोपेची वेळ होऊनही अलेक्झांडर टक्क जागाच असल्याने आई त्याला रागवली. पण, तो काही जागेवरुन उठेना. तेजोमयी कधीचीच झोपायला गेली होती. “झोप आली की बरोबर डोळे मिटेल तो”, बाबा आईला म्हणाले.  “उगाच जागा राहू नको ठोंब्या”, त्याला कुरवाळत आई म्हणाली. “काळजी करु नका मॉम, त्याला...

आनंदाचा ठेवा

घरी आल्या आल्या प्रदीप रडू लागला. हे बघून आईला आश्चर्य वाटलं. त्याला जवळ घेत तिने विचारलं, “काय झालं बाळा?” तेव्हा काहीही न बोलता प्रदीपने वार्षिक परीक्षेची गुणपत्रिका तिच्या हातात दिली. गुणपत्रिकेतील गुण बघून आईने त्याला शाबासकी दिली. वर्गात त्याचा दुसरा...

प्रयोगशाळा मिळाली

कितीही रात्र झाली तरी चद्रांवर उतरणाऱ्या चंद्रयानाचं थेट प्रक्षेपण बघणारच असं, सुमीतनं सहा सप्टेंबरला सकाळी-सकाळीच घरी सांगितलं. त्याच्या आईबाबांनाही यानाचं चंद्रावर उतरणं बघण्याची उत्सुकता होती. त्यामुळे रात्री साडे-अकरा नंतर आईबाबा आणि सुमीत टीव्हीसमोर ठाण मांडून...