(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
पोपटरावांची अफवा

पोपटरावांची अफवा

वननगरीतल्या कोंबडेरावांचा थाट काही औरच होता. त्याची ती ऐटदार चाल, डोक्यावरचा मुकुटासारखा तुरा, तुरुतुरु धावण्याची नि धावताधावता पंख पसरवून उडण्याची कला! त्यामुळे इतर पक्षी आणि प्राणी त्याचा हेवा करत. त्यामुळे आपण काहीतरी विशेष असल्याचा अहंकार, या कोंबडेरावांना झाला....
गोडच बोला!

गोडच बोला!

तेजोमयीच्या घरी तिच्या बाबांनी आणलेल्या अलेक्सा “अ” आणि अलेक्सा “ब” या दोघींच्या दोन तऱ्हा होत्या. अलेक्सा “अ” ला अलेक्सा “ब” ला किती समजावयची. पण ती काही तिचं ऐकायची नाही. “तुझं तू  बघ, माझं मी बघते.” हेच...
मंत्राची युक्ती!

मंत्राची युक्ती!

तेजोयमीच्या आईला कुणालाही नकार द्यायला फार अवघड जायचं. या स्वभावाचा फायदा त्यांच्या शेजारच्या देशपांडेकाकू नेहमी घेत. दर एक-दोन दिवसाआड कोणती ना कोणती गोष्ट मागायला त्या घरी येत. आईला नकार देणं जमत नसे. परवा काकूंनी चहापत्ती मागितली. घरची चहाप्पती संपल्याचं आईच्या...
दया नाही प्रेम करा!

दया नाही प्रेम करा!

आदित्यच्या सोसायटीजवळ महापालिकेचं मोठं उद्यान आहे. इथे सगळ्या वयातील माणसं फिरायला येतात. छोट्या मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झुला अशा साहित्यांसह एक वेगळा कोपराही इथे तयार करण्यात आलाय. सकाळ-संध्याकाळ इथे तुडुंब गर्दी असते. आदित्यसुध्दा आजोबांसोबत या उद्यानात...
भुताची मात्र

भुताची मात्र

रवीला कशाचही लवकरच नैराश्य यायचं. थोडं खरचटलं तरी, आता काय होणार माझं? म्हणून तो रडत बसे. परवा, सायकल चालवताना पडला. त्याच्या गुडघ्याला चांगलाच मार मागला. यापुढे आपल्याला चालताच येणार नाही असं वाटून तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या बाबांनी लगेच डॉक्टरकडे नेलं....
थेंबे थेंबे साखर!

थेंबे थेंबे साखर!

“उगाच कशाचीही नासाडी करणं योग्य नाही”, असं आई नेहमी रवीला बजावयाची. पण रवी या कानाने ऐकणार नि त्या कानाने सोडणार. खरंतर बरेचदा तो, हो हो म्हणत ऐकायचं नाटक करायचा. त्यामुळे आईने काय सांगितलं हे याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायचं. आई त्याला सांगायची की,अरे, थोड्याथोड्या...