(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
देवाच्या शोधात मोर…

देवाच्या शोधात मोर…

मोराला आपल्या पिसाऱ्याचा फारच अभिमान. आभाळात ढग आले की तो आपला पिसारा पसरवून नृत्य करु लागे. रंगीबेरंगी पिसांनी बनलेल्या त्या पिसाऱ्यामुळे मोराच्या देखणेपणात वाढ झाली होती. शिवाय त्याला नृत्यही करता येत असे. त्यामुळे त्याला आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असं वाटू...
मैत्रीचा आनंद

मैत्रीचा आनंद

एकदा चिमणीचं लहानसं बाळं घरट्यातून खाली पडलं. घरट्याच्या खाली एक मांजर निवांत बसली होती. ते बाळं तिच्या अंगावर पडलं. त्यामुळे ते वाचलं. ते इटुकलं बाळ बघून मांजरीस दया आली. तिने बाळाला आपल्या पंजाखाली घेतलं. त्याला आपल्या जिभेने चाटायला सुरुवात केली. मांजरीच्या उबदार...
भुताईजादू

भुताईजादू

वननगरीत वाघोबांची अरेरावी दिवसेंदिवस वाढ लागली. आपणच एकमेव या वननगरीचे मालक असल्याची त्यांची समजूत होती. त्यामुळे इतर सर्व प्राण्यांनी आपल्याच आज्ञेत राहायला हवं, आपली हांजी हांजी करायला हवं असं त्यांना वाटायच.    शुल्लकशुल्लक गोष्टींवरुन इतर प्राण्यांना त्रास द्यायला...
शेपटीच्या शोधात…

शेपटीच्या शोधात…

आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. “महाराज, आज आपली तब्येत बरी नाही का?” “अं नाही. हो, म्हणजे नाही, हो काही नाही.” असं काहीतरी गजराज म्हणाले. तेव्हा प्रधानजींसोबत...
डाव उलटला

डाव उलटला

कोल्होबा आणि लांडगोबांनी ठरवलं की, सिंहाला यापुढे वननगरीचा राजा राहू द्यायचा नाही. आता आपणच सत्ता हाती घेतली पाहिजे. कोल्होबा राजा आणि लांडगोबा प्रधान. दोघेही एकमेकास म्हणाले. या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर काटा आला. पण लांडगोबा, मी राजा होण्यासाठी सध्याच्या राजाचा...
मूर्ख ससा

मूर्ख ससा

सशाच्या कोणत्यातरी पूर्वजाने म्हणे सिंह महाराजांना युक्तिने चित केलं होतं. ही कथा या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत सशाच्या कुटुंबात सांगितली जायची. खूप खूप वर्षापूर्वी, सध्याच्या सिंह महारांजाच्या पणजोबांचे पंजोबा खूप दुष्ट होते. वननगरीत त्यांची फार दहशत होती....