(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना, स्मार्ट व्यवस्थापक बनण्याची संधी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) रोहतक, या संस्थेनेही उपलब्ध करुन दिली आहे. या संस्थेच्या, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (बीबीए- एमबीए) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरु झाली आहे.

या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, आयआयएम रोहतक मार्फत घेण्यात येणारी, आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते. महाराष्ट्रातील केंद्रे- मुंबई, नागपूर आणि पुणे.

अर्हता

(१) शैक्षणिक- (अ) खुला संवर्ग /नॉन क्रिमीलेअर इतर मागास संवर्ग/आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग (इडब्‍ल्यूएस)- कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण. (ब) उपरोक्त नमूद सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना दहावीमध्येही किमान ६० टक्के गुण आवश्यक. (क) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग संवर्गासाठी गुणांची मर्यादा १० वी व १२ वीमध्ये ५५ टक्के. (२) वयोमर्यादा- दि. २० जून २०२ रोजी विद्यार्थ्याचे किमान वय २० वर्षे असावे.(४) यंदा १२ वीची परीक्षा देणारे, कोणत्याही शाखेतील विद्यार्थी, प्रवेश चाळणी परीक्षेला बसू शकतात. तथापि त्यांचा निकाल दि. ३० जून २०२५ पर्यंत लागायला हवा. त्‍यांना किमान अर्हतेसाठी निर्धारित करण्यात आलेले गुण मिळायला हवेत. अन्यथा, आयपीएम टेस्ट उत्तीर्ण होऊनही, त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

चाळणी परीक्षा

आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, ही संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) आहे. प्रश्न बहुपर्यायी पर्यायी (मल्टिपल चॉइस) पध्दतीचे असतील. या परीक्षेत पुढील विभागांचा (सेक्शन) समावेश राहील- (१) संख्यात्मक कौशल्य चाचणी (क्वांटिटेटीव्ह ॲबिलिटी टेस्ट), (२) तार्किक विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य चाचणी (लॉजिकल रिझनिंग), (३) इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व चाचणी (व्हर्बल ॲबिलिटी). प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी ४० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक भागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी ४० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. प्रत्येक अचुक उत्तराला ४ गुण दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी १ गुण कापला जातो. प्रश्न सोडवला नसल्यास कोणतेही गुण कपात केले जात नाही. प्रत्येक विभागासाठी किमान गुण प्राप्त करण्याची अट ठेवण्यात आलेली नाही.

निवड प्रक्रिया

 या चाळणी परीक्षेत विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण निवडक विद्यार्थ्यांच्या मुलाखती जून २०२च्या दुसऱ्या  आठवड्यात घेतल्या जातील. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, सामान्य ज्ञान आणि संवादकौशल्य याची चाचपणी केली जाते.  

अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना कल चाचणी परीक्षेतील गुणांना ५५ टक्के वेटेज, मुलाखतीतील गुणांना १ टक्के वेटेज, दहावीतील शैक्षणिक कामगिरीला १० टक्के आणि बारावितील कामगिरिला टक्के वेटेज दिले जाते. याचा अर्थ, या दोन्ही परीक्षेत‍ जितके अधिक गुण मिळाले असतील, तेव्हढे अधिक वेटेज मिळू शकते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा अतिशय गांभिर्याने देणे गरजेचे आहे.

या परीक्षेव्दारे ९८ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये  आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी १० टक्के जागांचा समावेश आहे. शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि नॉन क्रिमीलेअर इतर मागास वर्ग संवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात येतात.

एखाद्या विद्यार्थ्यास तीन वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडवासा वाटल्यास, बीबीए – बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान केली जाते. तथापि चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना किमान सीजीपीए (क्युमुलिटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज) ५ मिळवावा लागतो. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षी ५ आणि ४ पेक्षा कमी सीजीपीए असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम सोडावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना, बीबीए ही पदवी दिली जाते.

संपर्क संकेतस्थळwww.iimrohtak.ac.in,ईमेल ipmoffice@iimrohtak.ac.in

सुरेश वांदिले