(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

इंडस्ट्री फोर

इंडस्ट्री फोर हे नाव तुमच्या कानावरुन गेलेच असणार. चौथ्या औद्योगिक क्रांतीचा हा महत्वाचा भाग ठरण्याचे भाकित या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवले आहे. पहिल्या ओद्योगिक क्रांतीसाठी पाणी आणि वाफेद्वारे निर्मित उर्जा या दोन बाबींनी महत्वाची भूमिका बजावली. मानवीश्रमा पासून यांत्रिकी श्रमापर्यंतचा हा प्रवास होता. दुसऱ्या औद्योगिक क्रांतिमध्ये विजेने महत्वाची भूमिका बजावली. या उर्जेमुळे उत्पादनांमध्ये प्रचंड वाढ झाली. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचा आधार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ठरले. यामुळे मानवी श्रम कमी झाले. स्वंयचलीकरणाला गती आली. आता चौथी औद्योगिक क्रांती डिजिटायझेशनमुळे घडणार आहे किंवा ती प्रक्रिया झपाट्याने सुरु झाली आहे. पुढील क्षेत्रात २०२२/ २०२३ पर्यंत करीअरच्या १० कोटी संधी उपलब्ध होणार आहेत.()ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग- थ्रीडी प्रिटिंग,()सेन्सर्स,()रोबोट्स- ऑटो आणि कोबॉट्स,()सिम्युलेशन,()ऑगमेंटेड रिॲलिटी,()क्लॉउड कॉम्पुटिंग,()बिग डाटा अनॅलिटिक्स,()इंडस्ट्रिअल इंटरनेट,()सायबर सिक्युरिटी,()हॉरिझाँटल ॲण्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन

इंडस्ट्री फोर

अत्याधुनिक डिजिटल तंत्राचा समावेश

डिजिटायझेशनमुळे विविध वस्तु/सेवा एकमेकांशी जोडल्या जात आहेत. यामध्ये माहितीचा साठा, संगणकीय उर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, व्यवसाय प्रकियेचे विश्लेषण-बिझिनेस अनॅलिटिक्स, कृत्रिम बुध्दिमत्ता, प्रगत रोबो तंत्रज्ञान आदी अत्याधुनिक डिजिटल तंत्राचा समावेश आहे. या औद्योगिक क्रांतीमुळे प्रत्यक्ष आणि आभासी जगाचे अभिसरण होत आहे. त्यामुळे आधुनिक आणि पारंपरिक तंत्रे एकत्र आणून निर्मिती प्रकियेला गती दिली जात आहे. स्मार्ट फॅक्ट्री वा स्मार्ट उद्योगाच्या कार्यान्वयाचा हा आरंभबिंदू ठरत आहे. यामुळे संसाधनांचा सुयोग्य व प्रभावी वापर, बहुविधतता आणि विक्री/विपणानाशी थेट एकात्मिकरण सुलभ होऊ घातले आहे. यामुळे निमिर्ती वा उत्पादनाच्या संकल्पांमध्ये आमुलाग्र बदल अपेक्षित आहे. या अत्याधुनिक स्मार्ट तंत्राला अवगत केलेल्या मनुष्यबळाची मोठी गरज पुढील काळात लागणार आहे.

१० कोटी नवे रोजगार

सध्या भारतात सेवाक्षेत्राची वाढ वेगाने होत असली तरी अर्थकारणाची गती वाढण्यासाठी निर्मिती/उत्पादन क्षेत्राची वाढ होणे गरजेचे आहे. त्याशिवाय मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होणार नाही किंवा २०२१ पर्यंत सुपर पॉवर म्हणून झेप घेणे शक्य होणार नाही. भारताच्या सकल उत्पादनात सध्याच्या १६ टक्क्यापासून २०२२ पर्यंत २५ टक्के वाढ निर्मिती/उत्पादन क्षेत्रात वाढ झाली तरच भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढचे पाऊल टाकण्यास सक्षम आणि समर्थ होऊ शकतो. असे झाले तर १० कोटी नवे रोजगार सुध्दा निर्माण होऊ शकतात.

डिजिटिल तंत्राच्या अधिकाधिक वापरामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीस चालना मिळाली आहेच. हे तंत्र या क्रांतीचा कणा ठरणार आहे. देशात इंटरनेट जोडणीची गती वाढली आहे. ई-कॉमर्स वाढत चालला आहे. इंटरनेटवरील उद्योजकतेची वाढ विस्मयकारक आहे.ही गती यापुढील काळात आणखी वाढणार आहे.भारत सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रमाद्वारे देशाला डिजिटली सक्षम,साक्षर आणि ज्ञानवंत करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे सुरु केले आहे.

आज करिअर कंसेप्ट(https://www.facebook.com/Career-concept-100260352041907) मध्ये -इंडस्ट्री फोर-

नवे तंत्र..नव्या संकल्पना-

स्मार्ट फॅक्टी/कारखान्यांमुळे पारंपरिक निर्मिती/उत्पादन प्रक्रियेची व्याखा संकल्पना,व्यवस्थापकीय कौशल्य,तंत्र,संवाद कौशल्य,वितरण,विपणन तंत्र बदलणार आहे.नव्या व्यावसियक समिकरणाचा उदय होणार आहे.त्यातून नव्या संधीही निर्माण होणार आहे.उद्योगांमध्ये स्पर्धात्मकता वाढणार आहे.त्यामुळे निर्मिती क्षमतेत वाढ होण्यासोबतच औद्योगिक क्षेत्राचीही वाढ साध्य होऊ शकते.नव्या सेवा आणि वस्तुंची निर्मिती प्रभावीपणे होणार आहे.त्यामुळे पुढील क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज भासणार आहे.()बिग डेटा अनॅलिटिक्सशी निगडित गुणवत्ता नियंत्रण—औद्योगिक डाटा म्हणजेच माहितीच्या साठयचे विश्लेषण करण्याची क्षमता असलेले तज्ज्ञ,()रोबोट नियंत्रित उत्पादन- रोबोटचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक कामगारांची गरज कमी होणार असली तरी रोबोचे संनियंत्रण करणाऱ्या मनुष्यबळाची गरज वाढणार आहे.()स्वयंचलित वाहतूक यंत्रणा-अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये स्मार्ट वाहनांचा वापर करण्यात येत आहे.त्यामुळे मानवी वाहतुक कमी झाली असली तरी तांत्रिक मनुष्यबळ व अशा स्मार्ट वाहतुकीचे संनियंत्रक आणि डिझानयर्सची गरज वाढणार आहे.()प्रॉडक्शन लाइन सिम्युलेशन- ग्राहकोपयोगी वस्तुंच्या प्रत्यक्ष निर्मितीआधी या क्षेत्रातील उद्योजक या आभासी तंत्राचा वापर करुन निर्मिती प्रक्रिया अधिक प्रभावी/गतिमान कशी होईल याची प्रतिकृती तयार करतात.त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन कार्यान्वयन हे अधिक सुलभ आणि सहज होत असते.या तंत्राशी अवगत असणारे इंडस्ट्रिअल अभियंत्यांची यापुढे मोठी मागणी वाढू शकते.()स्मार्ट पुरवठा साखळी- पुरवठा साखळीमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने हा वस्तुंच्या पुरवठा व वाहतुकीचे समन्वय प्रभावीरीत्या करणे शक्य होणार आहे.त्यामुळे हे समन्वयाने लहान आकारातील वस्तुपुरवठा करणाऱ्या प्रक्रियेवर संनियंत्रण ठेवणाऱ्या मनुष्यबळाची गरज वाढणार आहे. ()प्रेडिक्टिव्ह मेंटनन्स-सुचक देखभाल- एखाद्या यंत्रसामग्रीत येऊ पाहणारा दोष किंवा तांत्रिक बिघाड स्मार्ट तंत्रज्ञानामुळे दुरुस्त करणे शक्य होणार आहे.त्यामुळे ही यंत्रसामग्री कोणत्याही टप्प्यावर कार्य करणे थांबवणार नाही.या नव्या तंत्रज्ञानाशी अवगत असणारे सिस्टिम डिझायनर्स,आयटी आणि डाटा सायंटिस्ट,यांची गरज पुढील काळात वाढणार आहे.क्षेत्रीय पातळीवर सुध्दा या डिजिटल यंत्रणेला सहाय्यभूत ठरणा-या तंत्रज्ञांची गरज भासेल.()मशिनच्याच सेवा-उद्योजक यापुढे घरी वा ग्राहकांच्या घरी बसवलेल्या यंत्राद्वारेच स्वयंपाकाचा गॅस,कॉम्प्रेस्ड गॅस आदींचा पुरवठा करतील.त्यामुळे पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे महत्व कमी होईल.तथापी मात्र निर्मिती वा उत्पादन क्षेत्र वा सेवा क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज अधिक वाढेल.()सेल्फ ऑर्गनायझिंग प्रॉडक्शन/स्वयंनिंयत्रित निर्मिती- निर्मिती प्रक्रियेमध्ये स्वयंचलित समन्वयन यंत्रणेची उभारणी केली जाणार आहे.त्यामुळे प्रत्येक बाबींचा काटेकोर व अधिकाधिक वापर शक्य होणार आहे.या व्यवस्थेमुळे निर्मिती आणि नियोजन विभागातील मनुष्यबळाची गरज कमी होणार असली तरी डेटा सायन्स आणि डेटा विश्लेषकाची गरज वाढणार आहे.()गुंतागुंतीच्या वा किचक यंत्रणेची निर्मिती ही थ्रीडी प्रिटिंग तंत्राद्वारे करणे शक्य होणार आहे.त्यामुळे अशी यंत्रणा विनासायास निर्मिती करणे शक्य होईल.त्यामुळे थ्रीडी कॉम्युपटर साहाय्यित डिझायनर्स आणि मॉडेलर्सची आवश्यकता वाढणार आहे.या क्षेत्रातील संशोधन आणि विकास करणाऱ्या तंत्रज्ञांचीही गरज वाढणार आहे. (१०)ऑगमेंटेड वर्क,मेंटनन्स आणि सर्व्हिस- या तंत्राचा वापर करुन कंपनी/संस्था/उद्योजकांना त्यांच्या ठिकाणी वस्तुंच्या प्रत्यक्ष वितरण/वहन आणि स्थानाची माहिती मिळू शकेल.बार कोडचे स्कॅनिंग स्वयंचलित पध्दतीने करता येऊ शकेल.ग्राहकाच्या गरज वा आवश्यकतेनुसार  पॅकेजिंग करणे शक्य होईल.मूलभूत देखभाल प्रकियेला सहाय्यक असे हे तंत्र असेल.यामुळे सेवा तंत्रातील प्रकियेतील प्रभावीपणा वाढण्यास मदत होईल.या तंत्राच्या वाढत्या उपयोगामुळे उद्योजकांना संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावे लागेल.शिवाय आयटी,डिजिटल सहाय्य प्रकियेला गती मिळेल.

इंडस्ट्र फोर

मधील करिअर संधी

पुढील क्षेत्रात करीअरच्या संधी उपलब्ध होणार आहे.()ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग- थ्रीडी प्रिटिंग,()सेन्सर्स,()रोबोट्स- ऑटो आणि कोबॉट्स,()सिम्युलेशन,()ऑगमेंटेड रिॲलिटी,()क्लॉउड कॉम्पुटिंग,()बिग डाटा अनॅलिटिक्स,()इंडस्ट्रिअल इंटरनेट,()सायबर सिक्युरिटी,()हॉरिझाँटल ॲण्ड व्हर्टिकल इंटिग्रेशन ()()()()()()()()()()()()()()()()

डाटा सायन्स अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ डाटा सायंस   हा अभ्यासक्रम एस.पी.जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट- या संस्थेने सुरु केला आहे.अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे.अर्हता- १०वी मधील गुण/१२वी विज्ञानशाखेतील गुण आणि एसपीजैन एन्ट्रन्स्‍ टेस्ट.संपर्क- एस.पी.जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट,पहिला माळा,ट्रेड पॉईंट लोअर परळ,मुंबई- ४००००१,संकेतस्थळ-www.spjain.org/ टोल फ्री क्रमांक- १८००२०००८२७

 

बीटेक इन डाटा सायंस- हा अभ्यासक्रम नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग  या संस्‍थेने सुरु केला आहे.कालावधी- चार वर्षे.अर्हता- १२वी विज्ञान शाखेत (गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र) ५० टक्के गुण.अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याला एनपीएटी २०१८(एनएमआयएमएस प्रोग्रॅम आफ्टर व्टेल्फ्थ) ही चाळणी परीक्षा द्यावी लागेल.ही परीक्षा मुंबई,नवी मुंबई,शिरपूर,बेंगळुरु,इंदौर या ठिकाणी घेतली जाईल.संपर्क- टोल फ्री क्रमांक- १८००२६६९४१० आणि १८०० १०२ ५१३८,दूरध्वनी- ०२२-४२३५ ५५५५, संकेतस्थळ- http://www.npat.in आणि NPAT.Admission@nmims.edu