जहाज बांधण्याची कला
व्यापारी व प्रवासी सागरी वाहतुकीचा कणा असलेले प्रवासी जहाज, मालवाहू जहाज पाणबुड्या, नौका, सागरी टँकर, अतिवेगवान जलनौका, फेरिज, युध्द नौका यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे नॅव्हल अर्किटेक्चर आणि शिप बिल्डिंगचा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवारांना जहाजाचे डिझाइन, बांधणी, निर्मिती, दुरुस्ती, देखभाल या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात. या अभियंत्यांना खोदकाम प्लॅटफार्मचे डिझाइन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही कार्य करावे लागते.
नॅव्हल आर्किटेक्ट हे जहाज बांधणी, उत्पादन आणि सुरक्षा या विषयाशी संबंधित आहे. या विषयातील तज्ज्ञ जहाज, बोटी, पाणबुडी यावर होणाऱ्या सागरी पर्यावरणाच्या परिणामांचा अभ्यास करतात. सागरी फलाटांचे डिझाइन, निर्मिती आणि संनियंत्रण करण्याची जबाबदारी या तंत्रज्ञावर असते. सागरतळाच्या संशोधन कार्यात यांचा महत्वाचा सहभाग असतो.
अभ्यासक्रम –
बी.टेक इन नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड शिप बिल्डिंग
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बी.टेक इन नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड शिप बिल्डिंग, हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. याच विषयात एम.टेक आणि पीएचडी अभ्यासक्रम सुध्दा करता येतात. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना जपान कोरिआ, भारत व इतर देशांच्या जहाज निर्मिती व बांधणी कंपन्या, नौदल, तटरक्षक दल, डॉकयार्ड, शिपयार्ड, शिप सर्व्हेयर, शिप डिझाइन इन्स्टिट्यूट, आइल रिग कॅन्स्ट्रक्शन सेंटर, नॅव्हल आणि ओशनोग्रॅफी सेंटर आदी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात. हे अभियंता जहाज बांधणी, निर्मिती, डिझाइन व इतर तांत्रिक बाबतीत सल्ला वा सहाय्य सेवा सुध्दा देऊ शकतात. सागरी पर्यावरण व सागरी संशोधनाचे कार्य करण्याची संधी मिळू शकते. जे विद्यार्थी नॅव्हल आर्किटेक्चर आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करतात त्यांना संपूर्ण सागरतळाच्या / शिपयार्डच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते किंवा जहाज बांधणीचे नियोजन, निर्मिती आणि त्याची प्रत्यक्ष बांधणी अशा मर्यादित स्वरुपाचे काम सोपवले जाऊ शकते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर प्रि-सी ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनीअरिंग हा एक वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्यानंतर इंजिनीअर म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते.
स्कूल ऑफ नॅव्हल आर्किटेक्चर
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीच्या विशाखापट्टणम आणि कोचिन येथील स्कूल ऑफ नॅव्हल आर्किटेक्चरमध्ये चार वर्षे कालाधीचा बी.टेक इन नॅव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता-१२ वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात किमान ६० टक्के गुण. १० वी व १२ वीमध्ये इंग्रजी विषयात ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये पाच टक्के सूट. वयोमर्यादा – किमान १७ वर्षे आणि कमाल २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षाची सूट.
विशाखापट्टणम येथील कॅम्पसमध्ये एम.टेक इन नॅव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनीअरिंग आणि एम.टेक इन नॅव्हल ड्रेजिंग आणि हार्बर इंजिनीअरिंग हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
अर्हता- मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा मरिन इंजिनीअरिंग किंवा नॅव्हल आर्किटेक्चर ही पदवी घेतलेल्या उमेदवारांना हा अभ्यासक्रम करता येतो. या उमदेवरांना संबंधित विषयातील पदवीमध्ये ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत पाच टक्क्यांची सूट.
संपर्क – (१) इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, कोचिन कॅम्पस, साऊथ एंड रिक्लेमेशन एरिया, एन.एच-४७, अलेक्झांडर पराम्बबिथारा ब्रिज, मत्स्यपुरी, पोस्ट ऑफिस, विलिंग्डन आयलँड, कोचिन- ६८२२०२९, ईमेल- director.kochi@imu.ac.in
(२) इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी ,विशाखापट्टणम कॅम्पस, पोस्ट ऑफिस गांधीग्राम, विशाखापट्टणम- ५३०००५, दूरध्वनी- ०९८१-२५७८३६०, ईमेल- director.vizag@imu.ac.in, संकेतस्थळ-imu.ac.in
अर्हता – १२ वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात किमान ६० टक्के गुण. १० वी व १२ वीमध्ये इंग्रजी विषयात ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये पाच वर्षाची सूट.
संपर्क– इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, इस्ट कोस्ट रोड, उथांडी, चेन्नई- ६००११९, दूरध्वनी- ०४४-२४५३०३४३, ईमेल- admission@imu.ac.in
०००