(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक वर्षापूर्वींच्या विविध मंदिरावर कोरलेल्या मूर्त्यांना विविध प्रकारच्या दागिने आणि आभुषणांनी सजवलेले आणि मढवलेले आढळते. उत्खनात सापडलेल्या प्राचिन काळातील अनेक मूर्त्या देशातील वेगवेगळया वस्तुसंग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्त्यांच्या शरीरावरील आभुषणे आणि दागिने हे विस्मयचकित करणारे आहेत. अतिशय सुबक आणि सुरेख असणाऱ्या या दागिन्यांना घडवणाऱ्या कलावंतांना डिझायनिंगचे उत्कृष्ट ज्ञान होते, हे स्पष्ट होते. डिझायनर्स दागिने आणि आभुषणे परिधान करण्याची ही आपली परंपरा  अशी उज्ज्वल! त्या परंपरेत कोणताही बदल सध्याच्या काळात झालेला दिसत नाही. या अशा उज्ज्वल परंपरेत करिअरसंधी सुध्दा दडल्या आहेत.

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या, वाढलेली क्रयशक्ती, स्वत:ला सजवून आणि नटवून घेण्याची देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असलेली हौस, सोन्याचे शक्य झाले नाही तर इतर धातू आणि खडे – मणी यांचे दागिने विकत घेण्याकडे असलेला कल बघता, आभुषणे आणि दागिने डिझाइनच्या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात.

प्रगतीच्या संधी

ज्वेलरी डिझायनिंगमध्ये एखाद्या कंपनीत सुरुवात केल्यानंतर अनुभव आणि विशिष्ट गुणवत्ता/दर्जा गाठल्यास स्वयंरोजगाराचं दालन खुलं होतं. प्रारंभी या क्षेत्रात मनाजोगता मेहताना कदाचित मिळणार नाही. मात्र तुम्ही ही कला उत्कृष्टरीत्या सादर करु लागलात व त्यात गती घेतली तर या उत्पन्नात वेगानं वाढ शक्य आहे. ही कमाई दरमहा काही लाख रुपयांपर्यंतही राहू शकते.

जगातील २० टक्के सोन्याची खरेदी भारतात केली जाते. यातील महत्वाचा भाग हा दागिने आणि आभूषणे निर्मितीत जातो. सध्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांना ब्रँडेड दागिने आणि आभुषणे हवी असतात. ब्रँडेडचा अर्थ, डिझाइन केलेले! वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळया आभुषणांची खरेदी, मोठी रक्कम खर्ची घालून केली जाते. काही तज्ज्ञांच्या मते या क्षेत्रात १.३ मिलियन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

 संस्था आणि अभ्यासक्रम

(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ जेम्स ॲण्ड ज्वेलरी-

अभ्यासक्रम – (अ) बॅचलर ऑफ डिझाइन इन ज्वेलरी डिझाइन. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम राज्यस्थान स्किल युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे.

अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला जनरल ॲबिलिटी टेस्ट (गॅट- सामान्य क्षमता चाचणी), डिझाइन ॲबिलिटी टेस्ट (डॅट- अभिकल्‍प क्षमता चाचणी) आणि मुलाखतीव्दारे प्रवेश दिला जातो

संपर्क- एसपी- १११, आर. के. डेरेवाला, सितापुरा, जयपूर, राजस्थान – ३०२०२२, दूरध्वनी- ०१४१- २७७०९९५ ईमेल- admissions.jaipur@iigj.com

(ब) बी.ए इन जेम्स ॲण्ड ज्वेलरी डिझाइन – या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो.

(क) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ज्वेलरी मॅनेजमेंट- या अभ्यासक्रमात दागिने/आभुषणे डिझायनिंगच्या संकल्पना, निर्मिती, संगणकाच्या साहाय्याने डिझायनिंग, विक्री आणि व्यवस्थापकीय कौशल्याचा समावेश करण्यात आला आहे. कालावधी एक वर्षं. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी.

संपर्क – () बागमल लक्ष्मीचंद पारिख कॅम्पस, प्लॉट नंबर – १११/२, १३ वा रोड, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व) – ४०००९३, दूरध्वनी- ०२२-४२९०६६६६, ईमेल- enquiries.mumbai@iigj.com, संकेतस्थळ – https://iigj.org/

सुरेश वांदिले