भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी.टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत मुलीनांही अर्ज करता येतो. बीटेक पदवी जवाहरलाल नेहरु युनिर्व्हसिटीमार्फत दिली जाते.
या योजनेमधून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती (कमिशन) दिले जाते. त्यांना नॅव्हल ॲकॅडेमी, एजिमाला (केरळ) येथे चार वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या उमेदवारांची शैक्षणिक आणि कार्यकारी, अभियांत्रिकी आणि विद्दूत शाखेसाठी निवड केली जाते. यासाठी, जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन (जेइइ) – मेन या परीक्षेतील गुण आणि प्राधान्यक्रम (प्रिफरन्स) या बाबींचा आधार घेतला जातो. पहिल्या प्रिफरंसमधील शाखा मिळाली नाही तर, जागा उपलब्ध असल्यास उमेदवाराचा विचार दुसऱ्या शाखेसाठी केला जाऊ शकतो. उमेदवाराने केवळ एकच शाखा निवडल्यास, गुणवत्ता यादित येऊनही दुसऱ्या शाखेसाठी त्याचा विचार केला जात नाही.
या योजनेंतर्गत अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारास १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ७० टक्के आणि १२ वी किंवा दहावीत इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते.
निवड प्रकिया
प्राथमिक निवड यादितील उमेदवारांना एसएसबी(सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड- सेवा निवड मंडळ)च्या केंद्रांमध्ये मुलाखती/ चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते. चाळणी परीक्षेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रांचे अवलोकन/ बोध, समूह चर्चा या बाबींचा समावेश असतो. या टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. दुसऱ्या टप्प्याची चाळणी/मुलाखती चार दिवस चालतात. यामध्ये समूह चर्चा, मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. यात यशस्वी झालेल्या उमदेवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. ही चाचणी साधारणत: तीन ते पाच दिवस चालते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड, नौदलाच्या गरजेनुसार, ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी केली जाते. या काळातील संपूर्ण खर्च नौदलामार्फत केला
जातो.
संपर्क- www.joinindiannavy.gov.in
०००
अग्निपथ योजना
लष्करातील तिनही दलातील भरतीसाठी केंद्रसरकारने, अग्नीपथ ही योजना कार्यान्वित केली आहे. साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील १०वी/१२वी उत्तीर्ण मुले या योजनेंतर्गत अर्ज करु शकतात. चार वर्षासाठी या उमेदवारांची निवड केली जाते. त्यांना सर्व प्रकारचे लष्करी प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या वर्षी त्यांना ४ लाख ७६ लाख रुपयाचे पॅकेज दिले जाईल. चौथ्या वर्षापर्यंत या पॅकेजमध्ये ६ लाख ९२ हजार रुपयांपर्यतंची वाढ होईल. चार वर्षानंतर सेवानिधीच्या स्वरुपातील, १० लाख ४ हजार रुपये दिले जातील. शिवाय यामध्ये व्याजाची रक्कम समाविष्ट केली जाईल. सेवानिधीच्या रक्कमेला आयकर लागणार नाही. निवड झालेल्या अग्निविरांमधून २५ टक्के अग्निविरांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पुढे सेवेत कायम केले जाईल. काही राज्यसरकार आणि वेगवेगळया शासकीय आस्थापनांनी, या उमेदवारांना सामावून घेण्याचे ठरवले आहे. या अग्निविरांना लष्करी शिस्तीतील प्रशिक्षण मिळाल्याने, चार वर्षाच्या कालावधीत अग्निवीरांचे रुपांतर, सक्षम, समर्थ आणि आधुनिक कौशल्यप्राप्त केलेल्या उमेदवारांमध्ये होणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याला विविध प्रकारच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात.
संपर्क https://www.mygov.in/campaigns/agniveer/
(१) अग्निवीर थलसेना- अग्निवीर जनरल ड्युटी- १० वी उत्तीर्ण, अग्निवीर टेक्निकल- १२ वी (भौतिकशासत्र, गणित, रसायनशास्त्र), अग्निवीर क्लार्क/ स्टोअरकीपर- कोणत्याही शाखेतील १२वी, अग्निवीर ट्रेडसमन- १० वी, अग्निवीर जनरल ड्युटी (महिला पोलीस)- १० वी, संपर्क- https://joinindianarmy.nic.in/eligibility-criteria-for-agniveer-recruitment-process.htm
(२) वायूसेना- अग्निवीरवायू नॉन कोम्बॅटंट- १० वी, संपर्क- https://agnipathvayu.cdac.in/
(३) नौसेना- अग्निवीर एसएसआर (सिनिअर सेकंडरी रिक्य्रुट)- १२ वी- भौतिकशास्त्र, गणित किंवा ३ वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदवी, एमआर (मॅर्टिक रिक्य्रुट)- १०वी, संपर्क- https://www.joinindiannavy.gov.in
सुरेश वांदिले
Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.
Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.