(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फॅशन उद्योजकता 

नव्या मिलेनियम पिढीला वेगळे आणि हटके  घालायला फार आवडते, असे म्हंटले जाते. ते खरे आहेच पण या पिढीच्या आधीची जी पिढी होती, ते सुध्दा  याबाबतीत काही कमी नव्हते. त्यांच्या आधीच्या पिढीलाही रंग रंगिला – छैल छबिला असा अवतार करायला म्हणजेच पेहराव घालायला आवडायचे. किंबहुना गेली कित्येक शतके त्या – त्या काळाशी सुसंगत असे फॅशेनबल कपडे घालण्याची  आपली इच्छा मानवाने कधीही लपवून ठेवली नाही. त्यामुळे चहा आणि फॅशनेबल वस्त्रप्रावरणाचे/ कपड्यांचे महत्व कायम अबाधित राहिले.

यातच या क्षेत्रातील उद्योजकतेच्या विविधांगी संधी दडल्याचे प्रत्येक दशकातील होतकरु  आणि महत्वाकांक्षी तरुण- तरुणींच्या लक्षात आले. त्यात त्यांनी उडी मारली आणि यशश्रीकडे पोहचले सुध्दा.

या क्षेत्रात कितीही जुने उद्योजक असले तरी नवे उद्योजक आपले स्वत:चे स्थान निर्माण करु शकतात, इतकी त्याची व्याप्ती अथांग आहे.

रोजगाराच्या संधी

फॅशन उद्योजकतेतील रोजगाराच्या संधींचा लाभ घेतांना त्यातील सैध्दांतिक बाजू पक्क्‌या व्हाव्यात यासाठी, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी या संस्थेने, डिप्लोमा प्रोग्रॅम इन फॅशन आंत्रप्रिन्युरशीप, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

या संस्थेच्या मुंबईतील खारघर या ठिकाणी असलेल्या कॅम्पसमध्ये हा अभ्यासक्रम करता येतो.

अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश या क्षेत्रात प्रवेश करु इच्छिणाऱ्या इच्छुक  तरुण – तरुणींमध्ये उद्योजकतेचे कौशल्य विकसित करणे, पुढे ते बळकट करणे आणि स्वतंत्र उद्योजक म्हणून कार्यरत होण्यासाठी प्रेरित करणे, असा आहे. या अभ्यासक्रमाचा अधिकाधिक भर प्रात्यक्षिकांवर आहे.

अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विक्री, विपणन (मार्केटिंग), ब्रँडिंग, रिटेलिंग आणि मर्कंडायजिंगचे (व्यवसाय) प्रशिक्षण दिले जाते. वस्त्रनिर्मितीचे तांत्रिक ज्ञान, धाग्यांचे तांत्रिक ज्ञान दिले जाते.

व्यवस्थापकीय कौशल्य तंत्र आणि तांत्रिक बाबी पक्क्या केल्यावर व्यवसाय कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये व्यवसायाचा आराखडा तयार करणे, व्यवसायाच्या सुसाध्यतेचा अभ्यास, प्रकल्प अहवाल, प्रकल्प व्यवस्थापन यांचे ज्ञान प्रदान केले जाते.

या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा १२ वीनंतर तीन वर्षे कालावधीची पदविका प्राप्त केलेले उमेदवार अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. दोन ते तीन वर्षांचा अनुभव असल्यास प्रवेश घेताना प्राधान्य दिले जाते.

पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना https://nift.ac.in/mumbai/continuingeducation या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागतो. हा अर्ज पोस्टाने पाठवावा लागतो. अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, संवाद कौशल्य, सामान्य ज्ञान, कल या बाबींचाही निवडीसाठी विचार केला जातो. त्यानंतर अंतिम निवड केली जाते.

संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर स्वतंत्र व्यावसायिक (बिझिनेस ओनर्स), व्यवसाय सल्लागार (बिझिनेस कंसलटंट्स), निधीची उपलब्धता करणे (फंड रेझर्स), नव्या व्यवसायांचा विकास (न्यू व्हेंचर डेव्हलपर्स) अशा करिअर संधी मिळू शकतात किंवा स्वत: निर्माण करता येऊ शकतात.

ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस

सध्याचा काळ ई कामर्सचा असल्याने, फॅशन व्यवसायही या पध्दतीने करता येणे शक्य व्हावे यासाठी, या संस्थेने तीन महिने कालावधीचा, ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. तो ऑनलाईन पध्दतीने करता येतो. या अभ्यासक्रमात ऑनलाईन व्यवसाय कसा करावा, त्यासाठी सुयोग्य डिजिटल प्लॅटफॉर्म कसे निवडावे, ई-कॉमर्स व्यवसायामधील सध्याचे प्रवाह, ई-बिझिनेस वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन मर्कंडायजिंग, ऑनलाईन मार्केटिंग आणि फॅशन आंत्रप्रिन्युरशीप अशा क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.

संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर-४, खारघर, नवी मुंबई-४१०२१०, दूरध्वनी-०२२-२७७४७०००, ईमेल- fce.mumbai@nift.ac.in

०००००००

अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणामुळे रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या संधी सुलभतेने मिळू शकतात, ही बाब लक्षात घेऊन नवी मुंबई येथील कॅम्पसमध्ये निरंतर शिक्षण पध्दतीचा अवलंब करुन अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम पदव्युत्तर पदविका, पदविका आणि प्रमाणपत्र या पातळीचे आहेत. या अभ्यासक्रमांना स्थानिक पातळीवर प्रवेश दिला जातो.

२०२२ मध्ये पुढील अभ्यासक्रम करता येऊ शकतात.

() पदविका अभ्यासक्रम- () फॅशन ॲड फिट स्टाइल, कालावधी एक वर्षं, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील १२ वी, ()

फॅशन आंत्र्यप्रिन्युरशीप,कालावधी एक वर्षं, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदिविका, () ॲपेरल प्रॉडक्शन ॲण्ड मर्कंडायजिंग कालावधी एक वर्षं, अर्हता-कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदिविका, () ॲडव्हान्स्ड युझर स्टडीज, कालावधी एक वर्षं, अर्हता – कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदविका.

() निरंतर शिक्षण अ भ्यासक्रम- () फॅशन क्लोदिंग टेक्नॉलॉजी, कालावधी एक वर्षं, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, () फॅशन रिटेल मॅनेजमेंट कालावधी एक वर्षं, अर्हता – कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, () लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन- कालावधी एक वर्षं, अर्हता – कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, () ॲपेरल कॉस्टिंग ॲण्ड फॅशन मर्कंडायजिंग मॅनेजमेंट कालावधी एक वर्षं, अर्हता – कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, () ॲपेरल डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट कालावधी- सहा महिने, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, () क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग, कालावधी सहा महिने, अर्हता-कोणत्याही ज्ञान शाखेतील १२ वी, () क्रिएटिव्ह पॅटर्न मेकिंग कालावधी सहा महिने, अर्हता – कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, () व्हिज्युअल मर्कंडायजिंग, कालावधी सहा महिने, अर्हता-कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, () ईकॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस, (१०)यूआय/यूएक्स

डिझाइन.

०००

गांधीनगर कॅम्पस

एनआयएफटीच्या गांधीनगर कॅम्पसमध्ये निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत पुढील अल्पमुदतीचे अभ्यासक्रम करता येतात.

() फॅशन ॲण्ड मीडिया कम्युनिकेशन- या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं असून कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास करता येतो. १२ वीनंतर एक दोन किंवा वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते. हा अभ्यासक्रम गांधीनगर कॅम्पसच्या उपकेंद्र असलेल्या सुरत येथे शिकवला जातो. या अभ्यासक्रमात फॅशनचा आढावा, व्हिज्युअल स्टडीज, एलिमेंट्स ऑफ डिझाइन या विषय घटकांचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमामध्ये संगणकीय सॉफ्टवेअरच्या मदतीने डिझाइन तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. तसेच ॲनिमेशनचे तंत्र अवगत करुन दिले जाते. डिझाइन, व्हिज्युअल मर्कंडायजिंग, फोटोग्रॅफी, स्टायलिंग, इलुस्ट्रेशन, अडॉब फ्लॅश फोटोशॉप, अडॉब फ्लॅश प्रोफेशनल, ॲडॉब ऑफ्टर इफेक्ट्स, ॲडॉब मीडिया एनकोडर, फिल्ड व्हिजिट्स, ट्रेनिंग या विषय घटकांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर कॅटलॉग डिझायनिंग, नियतकालिकांचे संपादन, वृत्तपत्रातील सदर, संपादकीय कार्य, फॅशन कम्युनिकेशन, ग्रॅफिक डिझायन, स्टायलिस्ट, शूट कुऑर्डिनेटर, फॅशन फोटोग्रॅफर, मोशन ग्रॅफिक्स ,जाहिरात, चित्रपट आदी क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात.

() फॅशन डिझाइन ॲण्ड ॲपेरल टेक्नॉलॉजी.

कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो. एक किंवा दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते. कालावधी – एक वर्षं. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र प्रदान केले जाते. सुरत येथील वस्त्रोद्योगाच्या विविध गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात डिझाइन ॲण्ड फॅशन स्टडीज, एलिमेंट्स ऑफ डिझाइन, हिस्ट्री ऑफ डिझाइन, इलुस्ट्रेशन, पॅटर्न डेव्हलपमेंट, ड्रेपिंग, गार्मेंट कंस्ट्रक्शन, टेक्स्टाईल सायन्स, ट्रॅडिशनल इंडियन टेक्सटाइल, प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी, सर्फेस ऑर्नामेंटेशन, हॅण्ड एम्ब्रॉयडेरी, मशिन एम्ब्रॉयडेरी टेक्निक्स, ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर्स, मार्केटिंग ॲण्ड मर्कंडायजिंग आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उद्योगातील सॅम्पलिंग, डिझायनिंग, एम्ब्रॉयडेरी प्रॉडक्शन कुऑर्डिनेटर आदी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

() या संस्थेने चार महिने कालावधीचा डिझायनिंग फॉर होम फर्निशिंग हा अल्पमुदतीचा अभ्यासक्रमही सुरु केला आहे.

संपर्क – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एसव्हीएनआयटी कॅम्पस, अबॉव्ह कँटिन इच्छानाथ सर्कल, सुरत ३९०००५, संपर्कध्वनी-९३७४७६६६०३, ईमेल-kalpana.kabra@nift.ac.in

००००