बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, पिलाणी (बिट्स) या संस्थेच्या वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.बिटसॅट परीक्षेतील गुणावंर आधारित या कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जातो.
(१) पिलाणी कॅम्पस – बीई इन (१) केमिकल, (२) सिव्हिल, (३) कॉम्प्युटर सायंस, (४) इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, (५) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन, (६) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, (७) मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग, (८) मेकॅनिकल, (९) मॅन्युफॅच्युरिंग, (१०) एनव्हिरॉन्मेंटल ॲण्ड सस्टेनॅबिलीटी.
एमएस्सी इन- (१) बॉयोलॉजिकल सायंस, (२) केमेस्ट्री, (३) इकॉनॉमिक्स, (४) मॅथेमॅटिक्स, (५) नॅनो सायंस ॲण्ड सेमिकंडक्टर, (६) फिजिक्स, (७) जनरल स्टडीज आणि फार्मसी
(२) गोवा कॅम्पस– बीई इन (१) केमिकल, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, (३) कॉम्प्युटर सायंस, (४) इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, (५) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन, (६) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, (७) मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग, (८) मेकॅनिकल, (९) एनव्हिरॉन्मेंटल ॲण्ड सस्टेनॅबिलीटी.
एमएस्सी इन- (१) बॉयोलॉजिकल सायंस, (२) केमेस्ट्री, (३) इकॉनॉमिक्स, (४) मॅथेमॅटिक्स, (५) सेमीकंडक्टर ॲण्ड नॅनो सायंस, (६) फिजिक्स.
(३) हैदराबाद कॅम्पस- बीई इन (१) केमिकल, (२) सिव्हिल, (३) कॉम्प्युटर सायंस, (४) इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, (५) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन, (६) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, (७) मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग, (८) मेकॅनिकल, (९) एनव्हिरॉन्मेंटल ॲण्ड सस्टेनॅबिलीटी
एमएस्सी इन- (१) बॉयोलॉजिकल सायंस, (२) केमेस्ट्री, (३) इकॉनॉमिक्स, (४) मॅथेमॅटिक्स, (५) सेमीकंडक्टर ॲण्ड नॅनो सायंस, (६) फिजिक्स आणि बी.फार्म
बीई ड्युएल डिग्री
एमएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी मिळालेल्या गुणांच्या आधारावर, बीई ड्युएल डिग्री अभ्यासक्रांच्या प्रवेशासाठी अर्ज करता येतो. यासंस्थेने काही परदेशी शैक्षणिक संस्थांसोबत शैक्षणिक सहकार्याचा करार केला आहे. या करारानुसार २ + २ ही ड्युएल डिग्री योजना राबवली जाते. यामध्ये पदवीस्तरीय दोन वर्षे पिलाणीमध्ये व उर्वरित दोन वर्षे परदेशी विद्यापीठात शिकण्याची संधी दिली जाते. या शैक्षणिक संस्थांमध्ये आरएमआय युनिव्हर्सिटी मेलबोर्न, आयोटा युनिर्व्हसिटी अमेरिका, बफेलो युनिव्हर्सिटी न्युयॉर्क, रेनस्सेलर पॉलिटेक्निक न्युयार्क यांचा समावेश आहे. या प्रवेशासाठी बीटसॅट परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो.
अर्हता- (१) बीई (सस्टेनेबिलिटी ॲण्ड एनव्हीरॉन्मेंटल स्टडीज वगळून) आणि एमएस्सी- १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ७५ टक्के आाणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत.
(२) बी फार्म आणि बीई- सस्टेनेबिलिटी ॲण्ड एनव्हीरॉन्मेंटल स्टडीज – १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्रात सरासरीने ७५ टक्के आाणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्रात किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत.
२०२४ मध्ये उपरोक्त नमूद अर्हतेसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बीटसॅट परीक्षेला बसू शकतात. २०२५ मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ३० जून २०२५ पर्यंत लागायला हवा. उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त केल्यासच संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाईल.
ज्या बोर्डाची १२ वीची परीक्षा दिली असेल, त्यात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना, त्यांना हव्या त्या शाखेत थेट प्रवेश दिला जातो.
या परीक्षेचे महाराष्ट्रातील केंद्र छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नासिक, मुंबई, पुणे, नागपूर येथे आहे
शिष्यवृत्ती
(१)संस्थेच्या शिष्यवृत्ती योजनेमधून गुणवत्ता यादित आलेल्या पहिल्या दोन टक्के विद्यार्थ्यांना १०० टक्के शैक्षणिक शुल्कातून सुट दिली जाते. पुढील एक टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्के सुट दिली जाते.
(२) गुणवत्ता आणि गरज आधारित शिष्यवृत्ती योजनेमधून पहिल्या ५ टक्के विद्यार्थ्यांना १०० टक्के, त्यानंतरच्या २ टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्के, त्यानंतरच्या २ टक्के विद्यार्थ्यांना २५ टक्के, त्यानंतरच्या १ टक्के विद्यार्थ्यांना १० टक्के शैक्षणिक शुल्क सवलत दिली जाते.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ-bitsadmission.com, ईमेल- bitsat@pilani.bits-pilani.ac.in
सुरेश वांदिले