(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भारतात महिलांसोबत उच्चभ्रू गटात गेलेले किंवा या गटात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती व्यक्तीगत आभुषणे, कपडे आणि शरीराला सजवणाऱ्या किंवा अधिक उठाव आणणाऱ्या सहाय्यकारी बाबी किंवा ॲक्सेसरीजना अधिकाधिक महत्व द्यायला लागले आहेत. त्यामुळे डिझायनर कपडे, डिझायनर पादत्राणे, डिझायनर निवासस्थाने अशा बहुतेक सर्वच बाबींना महत्व प्राप्त झाल्याचं दिसतं. या गटातील या सर्व बाबींची गरज समजून घेणारे, त्यांच्याशी संवाद साधू शकणारे व अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करु शकणारे कौशल्यप्राप्त उमेदवारांची कमतरता निर्माण झाली आहे. लक्झरी वस्तू अथवा उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांसाठी लक्झरी ब्रँड मॅनजमेंट तज्ज्ञ हवे आहेत.

पर्ल ॲकॅडेमी या आघाडीच्या फॅशन, डिझाइन आणि ब्रँड मॅनेजमेंटचं शिक्षण देणाऱ्या संस्थेने,”लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट” आणि ” फॅशन ॲण्ड लाइफ स्टाइल मॅनेजमेंट,” या विषयांशी निगडीत पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

(१) बीबीए इन ग्लोबल लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट- हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून कोणत्याही शाखेत १२ वी झालेल्या विद्यार्थ्याला तो करता येतो. या अभ्यासक्रमात लक्झरी ब्रँड विक्री व्यवस्थापनाशी संबंधित सर्व महत्वाच्या पैलूंचं ज्ञान प्रदान केलं जातं.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पुढील काही महत्वाच्या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे- (१) कल्चरल फाउंडेशन इन लक्झरी, (२) लक्झरी बिझिनेस इन्व्हार्यमेंट, (३) बिझिनेस कम्युनिकेशन, (३) लक्झरी कंझ्युमर बिहेव्हिअर, (४) फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग, (५) लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट, (६) लक्झरी गुड्स ॲण्ड सर्व्हिसेस, (७) फायनांशिअल डिसिजन मेकिंग, (८) लक्झरी बायिंग ॲण्ड मर्कंडायजिंग, (९) लक्झरी गुड्स ॲण्ड सर्व्हिस, (१०) डिजिटल मार्केटिंग ॲण्ड  ई कॉमर्स, (११) लक्झरी रिटेल  ॲण्ड व्हिज्युअल  मर्कंडायजिंग, (१२) लक्झरी ऑपरेशन्स अॅण्ड सेल्स मॅनेजमेंट, (१३) ग्लोबल लक्झरी कम्युनिकेशन ट्रेंड्स, (१४) इंटरनॅशनल लक्झरी बिझिनेस, (१५) लक्झरी पब्लिक रिलेशन ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंट, (१६) फ्युचर ऑफ लक्झरी बिझिनेस, (१७) स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ऑफ लक्झरी ब्रँड्स, (१८) ‍बिझिनेस लॉज ॲण्ड इथिकल प्रॅक्टिसेस, (१९) कस्टमर रिलेशन ॲण्ड एक्सपिरिअंस मॅनेजमेंट.

(२) एमबीए इन ग्लोबल लक्झरी मॅनेजमेंट– उच्चभ्रू संवर्गासाठी लागणाऱ्या विविध लक्झरी वस्तूंचे डिझाइन ते मार्केटिंग पर्यंतचं ज्ञान  विद्यार्थ्यांना प्रदान केलं जातं. या अभ्यासक्रमात लक्झरी मार्केटिंग, ई लक्झरी, लक्झरी गुड्स आणि सर्व्हिसेस, लक्झरी बायिंग ॲण्ड मर्कंडायजिंग, लक्झरी व्हिज्युअल मर्कंडायजिंग या सारख्या विषय घटकांचा समावेश करण्यात आल्याने या क्षेत्रात उत्तम करिअर घडण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांना हस्तगत करता येणं शक्य होतं.

या अभ्यासक्रमात प्रामुख्याने तीन प्रकारच्या लक्झरी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं जातं- (१) लक्झरी वस्तू-यामध्ये वस्त्रप्रावरणं व या वस्त्रांना अधिक सुशोभित करणाऱ्या ॲक्सेसरीज, पेन, गृह सजावट, घड्याळी, अलंकार आणि दागिने, वाईन्स आणि लक्झरी मद्य. (२) लक्झरी सेवा- स्पा, पर्यटन आणि प्रवास, फाइन डायनिंग आणि हॉटेल्स,(३) मालमत्ता- यॅच, फाइन आर्ट, जमीन जुमला, वाहने-  या सर्वांचे ग्राहक हे उच्च मूल्य श्रेणी संवर्गातील असल्याने त्यांना प्रभावीरित्या सांभाळणे व त्यांना खरेदीसाठी बाध्य करणे, याचं तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवलं जातं. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असून तो कोणत्याही शाखेतील पदवीधरास करता येतो. हा अभ्यासक्रम  पर्ल ॲकॅडेमीच्या दक्षीण दिल्ली कॅम्पस येथे शिकवला जातो.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी उपलब्ध होतात-

(१) लक्झरी ब्रँड मॅनेजर, (२) लक्झरी प्रॉडक्ट मॅनेजर, (३) लक्झरी रिटेल बायर, (४) पीआर स्पेशॅलिस्ट, (५) व्हिज्युअल मर्कंडायजर, (६) मार्केटिंग मॅनेजमेंट

संपर्क- संकेतस्थळ-https://www.pearlacademy.com,ईमेल-registrar.mumbai@https://www.pearlacademy.com