(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 मार्ग यशाचा- ६७ –गणिताची गोडी

 मानवी मेंदूचा विश्लेषणात्मक विकास करण्यात आणि त्याला अधिक सक्षम करण्यात गणिताची मदत होत असल्याचे, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. तान्या इव्हान्स यांनी त्यांच्या संशोधनाद्वारे दाखवून दिले. गणितावर प्रभुत्व मिळवल्यास कोणतीही समस्या सोडवण्याचे कौशल्य अधिकाधिक प्रगत होत असल्याचे अभ्यासकांना दिसून आले आहे. गणितज्ज्ञ जेव्हा समस्या सोडवतात, तेव्हा त्यात स्पष्टता असते. अधिक चांगल्या तऱ्हेच्या कार्यपद्धतीसुद्धा यातून विकसित होतात.

 गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची रहस्ये शोधून काढण्यासाठी गणितीय सूत्रे आणि सिद्धांताचा सर्वाधिक उपयोग झाला आहे. गणित ही एकमेव वैश्विक भाषा असल्याचे समजले जाते. कोणताही देश, भाषा, प्रांत किंवा संस्कृती यामध्ये गणितीय सूत्रे, सिद्धांत आणि व्याख्या बदलत नाहीत, त्यामुळे गणितज्ज्ञ कोणत्याही देशात आणि प्रांतात सहजतेने कार्यरत राहू शकतो.

 आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करण्यात गणिताने सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गणितीय सूत्रांचा वापर करून नवे शोध लावले जात आहेत. चंद्रावरील स्वारीपासून ते मंगळावर यान उतरवण्यापर्यंतची किमया गणितीय सूत्रे, प्रमेये आणि सिद्धांतांच्या मदतीनेच मानवास शक्य होऊ शकली. जगातील सर्व उंच इमारतींचा पाया हा गणितीय सिद्धांतांनी सिद्ध केल्यावरच पक्का होऊ शकला. संगणक, विमान वाहतूक, स्कॅनिंग, कोडिंग, सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रांचा विस्मयकारक विकास गणितामुळेच होऊ शकला आहे.

 गणितीय सूत्रांना समजून त्यांचा वापर वेगवेगळ्या उत्तरांसाठी शोधण्यात कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्ती प्रत्यक्ष जीवनातील अनेक जटील समस्यांना वस्तुनिष्ठपणे हाताळू शकतात. या समस्या सोडवण्यासाठी अचूकतेपर्यंत पोहोचणारे उपाय सुचवू शकतात. त्यामुळेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या विषयाकडे वळावे यासाठी जगभरात विशेष प्रयत्न केले जातात. अमेरिकेत एप्रिल महिना ‘गणित जाणीवजागृती महिना’ म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रोनाल्ड रिगन यांनी १९८६ साली या संदर्भातील निर्णय घेतला होता. गणिताचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन, भारतातही प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी या विषयाकडे वळायला हवे.

करिअर संधी

गणितावर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तीला करिअरच्या विविध संधी मिळतात. वित्त (फायनान्स), निर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग), विमा प्रकथन (ॲक्चुरिज), अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग), दळणवळण (कम्युनिकेशन), व्यवसाय (बिझिनेस), विज्ञान (सायन्स) या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी गणितातील प्रभुत्व किंवा उत्तम आकलन महत्त्वाचे ठरते. ही क्षेत्रे परस्परविरोधी दिसत असली तरी त्यांचा पाया गणितीय कौशल्य असते, हे लक्षात ठेवायला हवे.

काही महत्त्वाच्या संस्था आणि अभ्यासक्रम

(१) आयआयटी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स या विभागाने ‘बी.टेक ॲण्ड ड्युएल डिग्री इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग (मॅक)’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. जेईई (जॉइंट एन्ट्रन्स परीक्षा) ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाच्या वैशिष्ट्यपूर्ण विषयघटकांमुळे, हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी सातत्याने मिळाल्या आहेत. यामध्ये फायनांस (वित्त), ॲनॅलिटिक्स (विश्लेषण), कन्सल्टिंग (सल्ला-सेवा), क्रिप्टोग्रॅफी (डिजिटल डेटा सुरक्षितरीत्या पाठवण्याचे तंत्र किंवा भाषा) आधारित सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांचा समावेश आहे.

संपर्क: https://maths.iitd.ac.in/

(२) आयआयटी गुवाहाटीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सने ‘बी.टेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्यात या आयआयटीने आघाडी घेतली आहे.

संपर्क: https://www.iitg.ac.in

(३) मुंबई आयआयटीमध्ये ‘बीएस इन मॅथेमॅटिक्स’ चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. दोन पद्धतींनी प्रवेश दिला जातो – (अ) जेईई ॲडव्हान्स्ड गुण; (ब) यंदा १२ वीची (गणित विषयासह विज्ञान) परीक्षा दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी इंडियन नॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडची कनिष्ठ किंवा वरिष्ठ अर्हता प्राप्त केली असेल ते, ‘बीएस एन्ट्रन्स परीक्षा’ याद्वारे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकतात.

संपर्क: math.iitb.ac.in

(४) आयआयटी इंदूर – ‘बी.टेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग सायन्स’.

संपर्क: iiti.ac.in

(५) आयआयटी कानपूरच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सने पुढील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत:

  • (अ) बी.एस. (बॅचलर ऑफ सायन्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड सायंटिफिक कॉम्प्युटेशन (कालावधी – चार वर्षे).

 (ब) बी.एस.-एम.एस. (बॅचलर ऑफ सायन्स – मास्टर ऑफ सायन्स) इन मॅथेमॅटिक्स (कालावधी – पाच वर्षे).

 संपर्क: https://www.iitk.ac.in/math/bs-ms

 (६) आयआयटी (काशी हिंदू विद्यापीठ) वाराणसीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सने ‘ड्युएल डिग्री इन मॅथेमॅटिक्स’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी पाच वर्षांचा आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक जगतात या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संधी मिळत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा या अभ्यासक्रमाकडे दिसून येतो. या अभ्यासक्रमाला जेईई-ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.

 संपर्क: https://www.iitbhu.ac.in/dept/math

 (७) आयआयटी रोपर – ‘बी.टेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग’.

 संपर्क: iitpr.ac.in/math

 (८) एनआयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सुरत – या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स ॲण्ड ह्युमॅनिटिजमार्फत पाच वर्षे कालावधीचा ‘इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन मॅथेमॅटिक्स’ हा अभ्यासक्रम चालवला जातो. प्रवेशासाठी जेईई-मेनचे गुण ग्राह्य धरले जातात.

 संपर्क: https://www.svnit.ac.in

 (९) एनआयटी राउरकेला – ‘इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन मॅथेमॅटिक्स’ हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो.

 संपर्क: https://nitrkl.ac.in/

 (१०) एनआयटी आगरतळा – या संस्थेमध्ये ‘बी.एस.-एम.एस. ड्युएल डिग्री इन मॅथेमॅटिक्स’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे (कालावधी – पाच वर्षे).

 संपर्क: https://www.nita.ac.in

 (११) एनआयटी पटना – ‘इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन मॅथेमॅटिक्स’ या विषयामध्ये अभ्यासक्रम करता येतो.

 संपर्क: http://www.nitp.ac.in/

 (१२) बंगळुरू स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथे ‘बी.एस. (बॅचलर ऑफ सायन्स – रिसर्च) इन मॅथेमॅटिक्स’ हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन / ॲडव्हान्स्ड परीक्षा आणि आयसर (IISER) ॲडमिशन टेस्टचे गुण ग्राह्य धरले जातात.

 संपर्क: ug.iisc.ac.in/math

 (१३) कोलकाता स्थित इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (ISI) या संस्थेचा ‘बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स’ हा अभ्यासक्रम बंगळुरू कॅम्पस येथे करता येतो. तीन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. निवड संस्थेच्या चाळणी परीक्षेव्दारे होते.

 संपर्क: isical.ac.in/admission

 (१४) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (IISER) या संस्थेतील बीएस-एमएस या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांतर्गत स्पेशलायझेशनसाठी गणित हा विषय निवडता येतो.

 संपर्क: iiser.ac.in

 (१५) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (NISER) भुवनेश्वर या संस्थेतील इंटिग्रेटेड एम.एस्सी. अभ्यासक्रमांतर्गत गणित विषयात स्पेशलायझेशन करता येते.

 संपर्क: niser.ac.in

 (१६) मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स या अभ्यासक्रमांतर्गत गणित विषयात स्पेशलायझेशन करता येते.

 संपर्क: cbs.ac.in

 (१७) चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट (CMI) येथे बी.एस्सी. (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स, बी.एस्सी. (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स आणि बी.एस्सी. (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड फिजिक्स हे प्रत्येकी तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम करता येतात. प्रवेश चाळणी परीक्षेव्दारे होतो.

 (१८) इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स ॲण्ड अप्लिकेशन्स (IMA) भुवनेश्वर – या संस्थेत बी.एस्सी. (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड अप्लिकेशन हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. बारावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयांचा अभ्यास केला असावा. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स (NBHM) मार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.

 संपर्क: https://iomaorissa.ac.in

२०२६ मधील इतर काही आयआयटी किंवा एनआयटी मधील गणिताचे अभ्यासक्रम:

  • आयआयटी खरगपूर (IIT Kharagpur): गणित आणि मशििन लर्निंग किंवा डेटा सायन्सवर भर देणारा ‘बॅचलर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग’ (४ वर्षे) आणि ‘ड्युएल डिग्री (B.Tech & M.Tech)’ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
  • आयआयटी हैदराबाद (IIT Hyderabad): ‘बी.टेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग’ हा लोकप्रिय अभ्यासक्रम उपलब्ध असून, यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सायन्सचे धडे दिले जातात.

 आयआयटी जोधपूर (IIT Jodhpur): ‘बी.टेक इन मॅथेमॅटिक्स-कॉम्प्युटिंग’ हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

 एनआयटी तिरुचिरापल्ली (NIT Trichy): येथील विज्ञान विभागात गणित आणि उपयोजित विषयांवर आधारित पदव्युत्तर व संशोधनपर अभ्यासक्रम चालवले जातात.

संपर्क-

(१) आयआयटी दिल्ली (IIT Delhi)

(२) आयआयटी गुवाहाटी (IIT Guwahati)

(३) मुंबई आयआयटी (IIT Bombay)

  • संकेतस्थळ: math.iitb.ac.in
  • ईमेल: hod@math.iitb.ac.in

(४) आयआयटी इंदूर (IIT Indore)

  • संकेतस्थळ: iiti.ac.in
  • ईमेल: hoddms@iiti.ac.in

(५) आयआयटी कानपूर (IIT Kanpur)

(६) आयआयटी (काशी हिंदू विद्यापीठ) वाराणसी (IIT BHU Varanasi)

(७) आयआयटी रोपर (IIT Ropar)

  • संकेतस्थळ: iitpr.ac.in/math
  • ईमेल: hodmaths@iitpr.ac.in

(८) एनआयटी सुरत (SVNIT Surat)

(९) एनआयटी राउरकेला (NIT Rourkela)

(१०) एनआयटी आगरतळा (NIT Agartala)

(११) एनआयटी पटना (NIT Patna)

(१२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc बंगळुरू)

(१३) इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (ISI कोलकाता/बंगळुरू)

(१४) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (NISER भुवनेश्वर)

  • संकेतस्थळ: niser.ac.in
  • ईमेल: ro@niser.ac.in

(१५) मुंबई विद्यापीठाचे सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायन्स (DA-CEBS)

  • संकेतस्थळ: cbs.ac.in
  • ईमेल: admissions@cbs.ac.in

(१६) इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स ॲण्ड अप्लिकेशन्स (IMA भुवनेश्वर)

 

  • एनआयटी वारंगल (NIT Warangal): ‘मॅथेमॅटिक्स आणि सायंटिफिक कॉम्प्युटिंग’ संदर्भातील विशेष अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत.

 

सुरेश वांदिले