(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फॅशन डिझाइन: ग्लॅमर आणि संधी

भारतीय फॅशन उद्योगाला वेगळ्या उंचीवर नेण्याची कामगिरी गेल्या ३५ वर्षांत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था) या संस्थेच्या बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन (फॅशन डिझाइनमधील पदवी अभ्यासक्रम) हा अभ्यासक्रम केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अभ्यासक्रम बेंगळुरू, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, कानूर, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, पाटणा, रायबरेली, शिलाँग, कांग्रा, जोधपूर, भुवनेश्वर, श्रीनगर तसेच इतर कॅम्पसमध्ये शिकवला जातो. या कॅम्पसमध्ये एकूण शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

सध्याचे फॅशन प्रवाह आणि त्याअनुषंगाने भविष्यातील विविधांगी जागतिक फॅशन कल (ट्रेंड), प्रवाह आणि शक्यतांचा सर्जनशील विचार करण्याची क्षमता या अभ्यासक्रमातील विषय घटकांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी अभ्यासक्रमात सातत्याने बदल, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि या क्षेत्रातील उद्योगांसोबत सहकार्य या तीन बाबींचा अवलंब करण्यात येतो. सध्याचे फॅशन कल आणि प्रवाह, आयात-निर्यात आणि उद्योगाच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन विषय घटक निर्धारित केले जातात.

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग (फॅशन डिझाइनमधील पदवी) हा एनआयएफटीचा फ्लॅगशिप (सर्वात महत्त्वाचा) अभ्यासक्रम समजला जातो. सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या या क्षेत्रासाठी बहुआयामी सर्जनशीलता असलेल्या मनुष्यबळाचा पुरवठा गेली तीन दशकांपासून ही संस्था करत आहे. हा अभ्यासक्रम केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी देशासोबतच परदेशातही मोठे नाव कमावले आहे.

काय शिकाल?

 

या अभ्यासक्रमात—(१) डिझाइन अँड इलस्ट्रेशन (अभिकल्प आणि रेखाटन), (२) अपेरल डेव्हलपमेंट विथ पॅटर्न मेकिंग (वस्त्र विकास आणि पॅटर्न बनवणे), (३) ड्रेपिंग अँड गार्मेंट कंस्ट्रक्शन (ड्रेपिंग आणि वस्त्र निर्माण) या मुख्य विषयांचा समावेश आहे. याशिवाय फॅशनचा इतिहास आणि समकालीन फॅशन, समकालीन सांस्कृतिक-सामाजिक विषयांचा फॅशन प्रवाहावर पडणारा परिणाम, उद्योगांच्या विविध गरजा आदी विषय घटकांचाही समावेश केला जातो. विविध स्तरातील ग्राहकांच्या गरजेनुसार फॅशन डिझाइन करता येणे शक्य व्हावे यासाठी तंत्रकुशलता वाढवली जाते. प्रात्यक्षिकांसाठी खास सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यात आले असून त्यामुळे सर्जनशील कल्पनांचा विस्तार करणे आणि सादरीकरणाचे तंत्र हस्तगत करणे शक्य होते.

आंतरराष्ट्रीय फॅशन प्रवाह आणि कल यांचा सूक्ष्म अभ्यास विद्यार्थ्यांना या अभ्यासांतर्गत करायला मिळतो. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाची कक्षा वैश्विक स्वरूपाची होते. विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक शिवणकाम कला, कौशल्य व तंत्राचेही ज्ञान प्राप्त करून दिले जाते. त्यामुळे आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा सुयोग्य संयोग साधणे सहजसुलभ ठरते.

या अभ्यासक्रमामध्ये—(१) अभिकल्प प्रक्रिया, (२) व्यावसायिक पद्धती, (३) फॅशन अभ्यास, (४) फॅशन आरेखन आणि अभिकल्प, (५) पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट (पोर्टफोलिओ विकास), (६) पॅटर्न मेकिंग (पॅटर्न बनवणे), (७) मेन्सवेअर डिझाइन अँड डेव्हलपमेंट ड्रेपिंग (पुरुषांच्या वस्त्रांचा अभिकल्प आणि विकास ड्रेपिंग), (८) एंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट (उद्योजकता विकास), (९) गार्मेंट कंस्ट्रक्शन (वस्त्र निर्माण), (११) सरफेस डेव्हलपमेंट टेक्निक (सतह विकास तंत्र), (१२) रिसर्च मेथड्स (संशोधन पद्धती), (१३) एलिमेंट्स ऑफ टेक्सटाइल्स (वस्त्रांचे घटक), (१४) क्रॅफ्ट क्लस्टर स्टडी (हस्तकला समूह अभ्यास), (१५) हिस्ट्री ऑफ डिझाइन अँड फॅशन कौच्युर (ग्राहकाच्या विशिष्ट आवश्यकता आणि मोजमापानुसार फॅशन कपड्यांची रचना), डिझाइन, (१६) डिजिटल इलस्ट्रेशन अँड प्रेझेंटेशन (डिजिटल रेखाटन आणि सादरीकरण), (१७) थिएटर कॉस्च्युम्स अँड डिझाइन (नाट्य पोषाख आणि अभिकल्प), (१८) मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस (उत्पादन प्रक्रिया), (१९) मार्केटिंग (विपणन), (२०) डिझाइन कलेक्शन (अभिकल्प संग्रह) हे विषय घटक शिकवले जातात.

या संस्थेच्या सर्व कॅम्पसमध्ये पॅटर्न मेकिंग, ड्रेपिंग आणि गार्मेंट कंस्ट्रक्शन या विषयांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज अशा प्रयोगशाळांची सुविधा आहे. अंतिम सत्रात उद्योगांशी संबंधित व त्यांनी प्रायोजित केलेल्या प्रकल्पावर काम करावे लागते किंवा स्वतःच्या सर्जनशीलतेने विविध डिझाइनची निर्मिती करावी लागते. वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात पदवीधरांच्या डिझाइन्स ठळकपणे प्रदर्शित केल्या जातात.

 

या अभ्यासक्रमांतर्गत (१) लक्झरी अँड कौच्युरे (लक्झरी आणि कौच्युर), (२) फॅशनिंग इंटरसेक्शन, इमेज अँड स्टायलिंग (फॅशन छेदनबिंदू, प्रतिमा आणि स्टायलिंग), (३) ग्लोबल रिटेल फॅशन बिझनेस (जागतिक किरकोळ फॅशन व्यवसाय), (४) फॅशन इनोव्हेशन (फॅशन नवोपक्रम) या विषयांमध्ये स्पेशलायझेशन (विशेषीकरण) करता येते.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना (१) अथलेटिकवेअर डिझायनर (क्रीडावस्त्र डिझायनर), (२) डिझायनर्स फॉर स्पेशल नीड्स (विशेष गरजांसाठी डिझायनर), (३) इंडस्ट्रियल डिझायनर (औद्योगिक डिझायनर), (४) फॅशन मर्कंडायझर (फॅशन व्यापारी), (५) व्हिज्युअल मर्कंडायझर (दृश्य व्यापारी), (६) रिटेल/एक्स्पोर्ट एंटरप्रेन्युर (किरकोळ/निर्यात उद्योजक), (७) आर्टिसनल फॅशन डिझायनर (हस्तकला फॅशन डिझायनर), (८) कन्सलटंट (सल्लागार), (९) पर्सनल शॉपर (वैयक्तिक खरेदीदार), (१०) स्टायलिस्ट (स्टायलिस्ट), (११) कॉस्च्युम डिझायनर (पोषाख डिझायनर), (१२) वॉर्डरोब मॅनेजर (कपड्यांच्या संग्रहालयाचा व्यवस्थापक), (१३) नवीन फॅशन प्रवाह भविष्यवक्ते, (१४) फॅशन रेखाटन तज्ज्ञ, अशा विविध संधी मिळू शकतात.

प्लेसमेंट

हा अभ्यासक्रम केलेल्या बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांना पुढील कंपन्यांमध्ये उत्तमोत्तम करिअर संधी मिळत असते. प्लेसमेंटची प्रक्रिया दिल्ली येथील कॅम्पसमध्ये राबवली जाते.

(१) रिटेल क्षेत्र—रिलायन्स रिटेल, रेमंड्स, तनेरा, टीसीएनएस, पँटलून्स, ब्लॅकबेरी, लँडमार्क, गुडअर्थ, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, (२) टेक्सटाइल मिल—अरविंद, रेमंड्स, कलाकुसर क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था, (३) ई-कॉमर्स क्षेत्र—अॅमेझॉन, मायंत्रा, अजिओ, फर्स्ट सिटी, टाटा क्लिक, (४) फॅशन प्रवाह भविष्यवेत्या कंपन्या—डब्ल्यूजीएसएन, पॅटर्न बँक, (५) फॅशन डिझायनर्स—गौरव गुप्ता, सब्यासाची मुखर्जी, राजेश प्रताप सिंग, रितू बेरी, तरुण तहलियानी, संदीप खोसला, मनीष मल्होत्रा, अमित अग्रवाल, सुकेतू धीर, राहुल मिश्रा, अनिता डोंगरे, अबू जानी, (६) आयात-निर्यात कंपनी—ओरिएंट क्रॅफ्ट, स्पॅन इंडिया, मॉडेलामा एक्स्पोर्टस, ली अँड फंग, टायबर्ग अँड इम्पल्स.

उद्योजकतेला प्रोत्साहन

हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची कास धरावी यासाठी संस्थेमार्फत प्रोत्साहन दिले जाते. हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी स्वतःचा फॅशन ब्रँड विकसित करून व्यवसायात उतरू शकतात. चित्रपटातील नट/नटी, मोठे उद्योजक, इतर क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती (सेलिब्रिटीज), इव्हेंट्स, फॅशन शो आदींसाठी फॅशन स्टायलिस्ट म्हणून स्वतंत्ररीत्या काम करण्याची संधी मिळू शकते. नाटक/चित्रपट/टीव्ही कार्यक्रम यातील शेकडो पात्रांसाठी लागणाऱ्या पोषाखांचे डिझाइन करण्याची फार मोठी संधी गेल्या काही वर्षांत निर्माण झाली आहे. ऐतिहासिक/धार्मिक कार्यक्रमांच्या संख्येत वाढ झाल्याने यातील पात्रांसाठी बहुढंगी/बहुरंगी पोषाखांची मागणीही वाढली आहे. (सर्व एनआयएफटी कॅम्पसमधील **बी.डेस. इन फॅशन डिझाइन (FD) च्या एकूण सीट्स-८०१)

नवा अभ्यासक्रम

एनआयएफटीमध्ये बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम फॅशन डिझायनिंग, निटवेअर डिझायनिंग, टेक्सटाइल डिझायनिंग, लेदर डिझायनिंग, फॅशन कम्युनिकेशन या विषयांमध्ये करता येतो. बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन इंटरिअर्स (फॅशन अंतर्गत सजावट) हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमांतर्गत (१) लक्झरी डिझाइन (लक्झरी अभिकल्प), (२) एक्झिबिशन डिझाइन (प्रदर्शन अभिकल्प) आणि (३) व्हर्नॅक्युलर डिझाइन (स्थानिक/पारंपरिक अभिकल्प) या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.

काय शिकाल?

(१) फंडामेंटल्स ऑफ फॅशन (फॅशनची मूलतत्त्वे), (२) फॅशन फिलॉसॉफी (फॅशन तत्त्वज्ञान), (३) इंटरिअर डिझाइन स्टुडिओ (अंतर्गत अभिकल्प स्टुडिओ), (४) रेसिडेन्शियल, कमर्शिअल अँड पब्लिक स्पेसेस (निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक जागा), (५) डिझाइन रिप्रेझेंटेशन (अभिकल्प सादरीकरण), (६) डिजिटल कम्युनिकेशन (डिजिटल संवाद), (७) ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (वर्धित वास्तव, आभासी वास्तव, कृत्रिम बुद्धिमत्ता), (८) इनोव्हेटिव्ह मटेरिअल (नवोपक्रमी साहित्य), (९) फिटिंग फर्निचर आणि फिक्चर (फर्निचर आणि फिक्चर बसवणे), (१०) एन्व्हायरनमेंटल डिझाइन (पर्यावरणीय अभिकल्प), (११) मटेरिअल स्किन अँड फर्निशेस (साहित्य त्वचा आणि फर्निशिंग), (१२) प्रोफेशनल प्रॅक्टिसेस (व्यावसायिक पद्धती), (१३) एस्टिमेशन अँड कॉस्टिंग (अंदाज आणि खर्च), (१४) डिझाइन रिसर्च (अभिकल्प संशोधन), (१५) पेपर मेकॅनिक्स (कागद यांत्रिकी), (१६) फॅब्रिक इन इंटरिअर (अंतर्गत सजावटीतील कापड), (१७) कलर इन इंटरिअर (अंतर्गत सजावटीतील रंग).

करिअर संधी*

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात—(१) इंटरिअर स्टायलिस्ट (कॉर्पोरेट/रिटेल/हॉस्पिटॅलिटी/हेल्थकेअर), (२) सेट डिझायनर, (३) इव्हेंट डिझायनर, (४) लक्झरी डिझाइन, (५) क्रॅफ्ट डेकोर डिझायनर, (६) लाइटिंग स्टायलिस्ट, (७) फर्निचर स्टायलिस्ट, (८) इंटरिअर लँडस्केप स्टायलिस्ट, (९) कलर कन्सलटंट, (१०) व्हिज्युअल मर्कंडायझिंग.

हा अभ्यासक्रम वाराणसी कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.

**संपर्क**— https://nift.ac.in/admission

**शिष्यवृत्ती**

एनआयएफ्टीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे साहाय्य केले जाते. आर्थिक विवंचनेमुळे विद्यार्थी एनआयएफ्टीच्या शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी “सार्थक” ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना या संवर्गासाठी असलेली राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते. याची विस्तृत माहिती scholarship.gov.in या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ठेवण्यात आली आहे. या पोर्टलच्या माध्यमातूनच दोन्ही संवर्गातील उमेदवारांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा लागेल. एनआयएफ्टीची सर्व कॅम्पसेस या पोर्टलशी जोडली गेली आहेत.

२०२६ मधील नवे बदल

 

– एनआयएफ्टीकडे आता २० कॅम्पस आहेत (नवा रायपूर हा नवीन कॅम्पस जोडला गेला आहे). 

– फॅशन इंटरिअर्स हा अभ्यासक्रम मुख्यतः वाराणसी आणि नवा रायपूर कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे. 

– अभ्यासक्रमात २०२५ पासून सुधारित अभ्यासक्रम लागू आहे, ज्यात मेजर्स-मायनर्स, डिजिटल नवकल्पना, शाश्वतता आणि लवचिकता यांवर भर दिला आहे. 

  • एनआयएफटीने (NIFT) डिजिटल व सस्टेनेबल (Sustainable – पर्यावरणपूरक) फॅशन प्रक्रियांना अभ्यासक्रमात अधिक प्राधान्य दिले आहे.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अंतर्भाव: फॅशन आणि डिझाइनच्या प्रक्रियेत जनरेटिव्ह एआय (Generative AI) आणि थ्रीडी (3D) व्हर्च्युअल प्रोटोटायपिंग तंत्रज्ञानाचा सविस्तर समावेश आता अभ्यासक्रमाचा मुख्य भाग बनला आहे.
  • पोर्टल व शिष्यवृत्ती प्रणाली: नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे (NSP) दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती प्रक्रियेत पूर्णपणे डिजिटल व कागदपत्रविरहित (Paperless) पडताळणी पद्धत २०२६ मध्ये अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे.

 

एनआयएफटी नवा रायपूर (रायपूर) आणि श्रीनगर येथे शिकवले जाणारे अभ्यासक्रम (२०२६)**

एनआयएफटी नवा रायपूर

हा नवीन (२०वा) कॅम्पस आहे. येथे फक्त **बी.डेस. (Bachelor of Design)** अभ्यासक्रम उपलब्ध आहेत:

– **Accessory Design (AD)** – अॅक्सेसरी डिझाइन 

– **Fashion Design (FD)** – फॅशन डिझाइन 

– **Fashion Interiors (FI)** – फॅशन इंटरिअर्स 

 

 

एनआयएफटी श्रीनगर

येथे खालील अभ्यासक्रम शिकवले जातात:

**बी.डेस. (Bachelor of Design):**

– Fashion Design (FD) – फॅशन डिझाइन 

– Fashion Communication (FC) – फॅशन कम्युनिकेशन 

– Fashion & Lifestyle Accessories (Accessory Design) – फॅशन अँड लाइफस्टाइल अॅक्सेसरीज 

– Textile Design (TD) – टेक्सटाइल डिझाइन 

**पोस्ट ग्रॅज्युएट:**

– Master of Fashion Management (MFM) – मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट