(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ७७- गुन्ह्यांच्या शोधाचे विज्ञान,तंत्र आणि कौशल्य

भारत सरकारने न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेंसिक सायन्स) आधारित शोधाला न्यायदान प्रक्रियेत सामावून घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या सध्याच्या ५० टक्के दरात आणखी वाढ होऊ शकेल. कायदेविषयक गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यकशास्त्राचे पुरावे आवश्यक ठरवण्यात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या कार्यात न्यायवैद्यकशास्त्राचा महत्त्वाचा सहभाग असतो. सध्या बहुतेक सर्वच बँकांना, फ्रॉड (फसवणूक शोध) डिपार्टमेंटसाठी न्यायवैद्यकशास्त्राशी निगडित प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. कॉर्पोरेट क्षेत्रातही संभाव्य फ्रॉड थोपवण्यासाठी या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. प्रत्येक राज्यसरकारने न्यायवैद्यकशास्त्राच्या प्रयोगशाळा उघडल्या आहेत. त्यामुळे, या क्षेत्रात अधिकाधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे.

अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, गुन्हेगार करू लागल्याने न्यायवैद्यकशास्त्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळेच भारत सरकारने, नॅशनल फॉरेंसिक सायन्स युनिव्हर्सिटीची स्थापना २०२० मध्ये केली असून या संस्थेला इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेचे कॅम्पसेस गांधीनगर (गुजरात), दिल्ली, गोवा, त्रिपुरा, भोपाळ, धारवाड, गौहाटी, भुवनेश्वर, चेन्नई, रायपूर, जयपूर, नागपूर आणि वाराणसी येथे कार्यरत आहेत. पुणे आणि मणिपूर येथे प्रशिक्षण अकादमी सुरू आहेत. याशिवाय युगांडा येथे आंतरराष्ट्रीय कॅम्पसही आहे. न्यायवैद्यक, डिजिटल न्यायवैद्यक, सायबर सुरक्षा, वर्तणूक (बिहेव्हिरल)शास्त्र या विषयात शिक्षण, प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी, ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेमार्फत ७० हून अधिक देशांत, या क्षेत्रातील क्षमता बांधणी केली जात आहे. भारताची न्यायवैद्यक क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट या संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेमार्फत न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याचा कार्यक्रम राबवला जाईल. प्रत्येक जिल्ह्याला सर्व यंत्रसामुग्रीने सुसज्ज अशी मोबाइल शोध वाहने पुरवली जातील. या क्षेत्रातील विविध घटकांच्या अनुषंगाने, सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी केली जाईल. शोधकार्याच्या गुणवत्तेत देशभरात एकसमानता राहावी यासाठी गृहमंत्रालयाने लक्ष केंद्रित केले आहे.

या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास गुन्हे घडलेल्या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक ठरते. गुन्हे घडलेल्या ठिकाणाच्या वस्तूंची ने-आण करण्याची प्रक्रिया आणि या वस्तू सुरक्षित ठेवण्याची पद्धती समजून घ्यावी लागते. न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत प्रत्यक्ष काम करताना या बाबींचे तंत्र समजून घेणे शक्य होऊ शकते. अशा गुन्ह्यांमध्ये केवळ तपासाचा अहवाल सादर करणे अपेक्षित नसून गुन्ह्यांची सामाजिक कारणे कोणती आणि त्याच्या संभाव्य उपाययोजना, याचे सुतोवाच करणे अपेक्षित असते.

नॅशनल फॉरेंसिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत विविध ज्ञानशाखांच्या स्कूल्सची निर्मिती करण्यात आली आहे. या स्कूल्समध्ये, न्यायवैद्यकशास्त्राशी निगडित विविध पैलूंना स्पर्श करणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरचे आहेत. याशिवाय, व्यावसायिक कौशल्य निर्माण करणाऱ्या काही पदविका अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. काही इंटिग्रेटेड अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचे असून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम करता येतात. पदव्युत्तर पदवी आणि पदवी अभ्यासक्रम हे विज्ञान, कला, विधि या शाखेतील आहेत. त्यामुळे यंदा करिअरच्या रोडमॅपमध्ये या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांचाही विचार विद्यार्थ्यांनी व पालकांनी करायला हवा.

नॅशनल फॉरेंसिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमांना २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून नॅशनल फॉरेंसिक ॲडमिशन टेस्ट (एनएफएटी) बंद करण्यात आला आहे. आता प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा जसे की सीयूईटी, सीएटी, सीएलएटी, जेईई, गेट यांच्या गुणांवर आधारित आहे. अर्ज प्रक्रिया एप्रिल २०२६ मध्ये सुरू झाली होती आणि शेवटची तारीख जून २०२६ च्या आसपास होती. भविष्यातील प्रवेशांसाठी अधिकृत संकेतस्थळावरून अद्ययावत माहिती तपासावी.

स्कूल्स आणि अभ्यासक्रम (कंसामध्ये अभ्यासक्रम असलेले कॅम्पस)

(१) स्कूल ऑफ फॉरेंसिक सायन्स

(१) बी.एस्सी – एमएस्सी इन फॉरेंसिक सायन्स (गांधीनगर, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, धारवाड, भोपाळ, वाराणसी), (२) एम.एस्सी इन फॉरेंसिक सायन्स (गांधीनगर, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, भोपाळ, गौहाटी, भुवनेश्वर, रायपूर, नागपूर, चेन्नई, जयपूर, धारवाड, वाराणसी), (३) एम.एस्सी इन फॉरेंसिक बायोटेक्नॉलॉजी (गांधीनगर), (४) एम.एस्सी इन मल्टिमीडिया फॉरेंसिक (गांधीनगर), (५) एम.ए इन फॉरेंसिक मास कम्युनिकेशन अँड जर्न्यालिझम-स्पेशलायझेशन इन फॉरेंसिक जर्न्यालिझम (गांधीनगर), (६) प्रोफेशनल डिप्लोमा इन फिंगरप्रिंट सायन्स (दिल्ली), (७) प्रोफेशनल डिप्लोमा इन फॉरेंसिक डाक्युमेंट एक्झामिनेशन (गांधीनगर, दिल्ली), (८) प्रोफेशनल डिप्लोमा इन क्राइम सिन मॅनेजमेंट (गांधीनगर, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, भोपाळ, गौहाटी, धारवाड, पुणे, मणिपूर, रायपूर, जयपूर, नागपूर, भुवनेश्वर, चेन्नई), ऑनलाइन प्रोफेशनल डिप्लोमा इन फॉरेंसिक जर्न्यालिझम (गांधीनगर), (९) प्रोफेशनल डिप्लोमा इन फॉरेंसिक बॅलिस्टिक्स (गांधीनगर), (१०) प्रोफेशनल डिप्लोमा इन कॅनाइन फॉरेंसिक (दिल्ली)

(२) स्कूल ऑफ मेडिको-लिगल स्टडी

(१) प्रोफेशनल डिप्लोमा इन फॉरेंसिक ऑर्किऑलॉजी (गांधीनगर), (२) एम.एस्सी इन टॉक्सिकॉलॉजी (गांधीनगर)

(३) स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

(१) बीबीए-एमबीए (स्पेशलायझेशन- (अ) फॉरेंसिक अकाउंटिंग अँड फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन, (ब) फायनांशिअल मॅनेजमेंट, (क) बिझिनेस अॅनालिटिक्स अँड इन्व्हेस्टिगेशन, (ड) हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट) (गांधीनगर, दिल्ली), (२) एमबीए इन (अ) फॉरेंसिक अकाउंटिंग अँड फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन, (ब) बिझिनेस अॅनालिटिक्स अँड इन्व्हेस्टिगेशन, (क) हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट, (ड) सायबर सेक्युरिटी मॅनेजमेंट (गांधीनगर)

(४) स्कूल ऑफ बिहेव्हियरल फॉरेंसिक्स

(१) एम.एस्सी- फॉरेंसिक सायकॉलॉजी (गांधीनगर, दिल्ली), (२) एम.एस्सी-न्युरो सायकॉलॉजी (गांधीनगर), (३) एम.एस्सी- क्लिनिकल सायकॉलॉजी (गांधीनगर, दिल्ली), (४) एम.ए. क्रिमिनॉलॉजी- स्पेशलायझेशन- फॉरेंसिक सायकॉलॉजी (गांधीनगर, दिल्ली), (५) एम.ए. क्रिमिनॉलॉजी (गांधीनगर, दिल्ली), (६) बीएस्सी क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेंसिक सायन्स (गांधीनगर, दिल्ली, चेन्नई), (७) प्रोफेशनल डिप्लोमा इन सायबर सायकॉलॉजी (गांधीनगर), (८) प्रोफेशनल डिप्लोमा इन इन्व्हेस्टिगेटिव्ह सायकॉलॉजी (गांधीनगर)

(५) स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी

(१) एम.एस्सी- नॅनोटेक्नॉलॉजी (स्पेशलायझेशन- फॉरेंसिक नॅनोटेक्नॉलॉजी) (गांधीनगर), (२) एम.एस्सी- फूड टेक्नॉलॉजी (स्पेशलायझेशन- फॉरेंसिक फूड अॅनालिसिस) (गांधीनगर), (३) एम.टेक-सिव्हिल इंजिनीअरिंग (स्पेशलायझेशन-फॉरेंसिक स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग) (गांधीनगर)

(६) स्कूल ऑफ पोलीस सायन्स अँड सेक्युरिटी स्टडीज

(१) एम.एस्सी- होमलॅण्ड सेक्युरिटी (गांधीनगर), (२) एम.ए-पोलीस अँड सेक्युरिटी स्टडीज (गांधीनगर), (३) प्रोफेशनल डिप्लोमा इन सेक्युरिटी स्टडीज (गांधीनगर)

(७) स्कूल ऑफ लॉ, फॉरेंसिक्स जस्टिस अँड पॉलिसी स्टडीज

(१) एलएलएम (सायबर लॉ अँड सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन) (गांधीनगर, भुवनेश्वर), (२) एलएलएम (क्रिमिनल लॉ अँड क्रिमिनल जस्टिस अॅडमिनिस्ट्रेशन) (गांधीनगर, दिल्ली), (३) बीएस्सी-एलएलबी (ऑनर्स) (गांधीनगर), (४) बीबीए-एलएलबी (ऑनर्स) (दिल्ली), (५) प्रोफेशनल डिप्लोमा इन सायबर लॉ (गांधीनगर)

(८) स्कूल ऑफ फार्मसी

(१) एम.फार्म इन फॉरेंसिक फार्मसी (गांधीनगर, धारवाड), (२) एम.फार्म इन फार्मास्युटिकल क्वालिटी अॅश्युरन्स (गांधीनगर), (३) एम.एस्सी इन केमिस्ट्री (स्पेशलायझेशन – फॉरेंसिक अॅनालिटिकल केमिस्ट्री) (गांधीनगर), (४) एम.एस्सी इन एनव्हिरॉन्मेंटल सायन्स (स्पेशलायझेशन- एनव्हिरॉन्मेंटल फॉरेंसिक) (गांधीनगर), (५) एम.एस्सी इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री (गांधीनगर), (६) प्रोफेशनल डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल सेफ्टी, हायजिन अँड एनव्हिरॉन्मेंटल मॅनेजमेंट (गांधीनगर)

(९) स्कूल ऑफ सायबर सेक्युरिटी अँड डिजिटल फॉरेंसिक्स

(१) एम.टेक इन सायबर सेक्युरिटी (गांधीनगर, धारवाड), (२) एम.टेक इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (स्पेशलायझेशन -सायबर सेक्युरिटी) (गांधीनगर, गोवा), (३) एम.एस्सी इन सायबर सेक्युरिटी (गांधीनगर, गोवा, भोपाळ, नागपूर, चेन्नई), (४) एम.एस्सी इन डिजिटल फॉरेंसिक्स अँड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी (गांधीनगर, दिल्ली, गोवा, भोपाळ, रायपूर, जयपूर, भुवनेश्वर), (५) बीटेक- एम.टेक इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (सायबर सेक्युरिटी) (गांधीनगर, दिल्ली, त्रिपुरा, धारवाड, गौहाटी), (६) प्रोफेशनल डिप्लोमा इन सेमिकंडक्टर सेक्युरिटी अँड फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेशन (गांधीनगर), (७) प्रोफेशनल डिप्लोमा इन सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन (गांधीनगर)

संपर्क संकेतस्थळ – nfsu.ac.in/admission, ईमेल-info@nfsu.ac.in, दूरध्वनी-०७९-२३९७७१०३

राज्यशासनाच्या संस्था

महाराष्ट्रात, राज्यशासनाने, (१) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) (https://gifsa.ac.in/programmes/), (२) नागपूर (https://ifscnagpur.in/) आणि (३) मुंबई (https://ifsm.ac.in/) येथे गव्हर्नमेंट इंस्टिट्यूट ऑफ फॉरेंसिक सायन्सची स्थापना केली आहे. या संस्थांमध्ये, बीएस्सी इन फॉरेंसिक सायन्स आणि एमएस्सी इन फॉरेंसिक सायन्स हे अभ्यासक्रम करता येतात. प्रत्येक संस्थेने वेगवेगळे पदविका अभ्यासक्रमही सुरू केले आहेत.

सुरेश वांदिले