(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ९७- फिट  है हिट है!

उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी अधिकाधिक नागरिक जिम, फिटनेस सेंटर आणि फिटनेस स्टुडिओंकडे वळत आहेत. स्वतःला “फिट अँड फाइन” ठेवण्याबाबत मोठ्या प्रमाणात जाणीवजागृती झाली आहे. ही बाब भारतातील फिटनेस इंडस्ट्रीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी (फिटनेस ब्रँड) भारतभर शाखाविस्तार केला आहे. जिम आणि हेल्थ सेंटर्सची संख्या वाढल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

सर्टिफाइड पर्सनल ट्रेनर (अधिकृत प्रमाणपत्रधारक व्यक्तिगत प्रशिक्षक) यांची मागणी वाढत आहे. अनेक संस्था असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवत असल्या तरी मान्यताप्राप्त संस्थांचा अभाव पूर्वी दिसत होता. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या **गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (GICED)** ने फिटनेस ट्रेनिंग संबंधी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पर्सनल ट्रेनर होण्यासाठी आवश्यक विषयघटकांचा यात समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भारत आणि परदेशातही चांगल्या संधी मिळतात.

 

फिटनेस न्यूट्रिशन हा कौशल्यनिर्मितीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जिम, हेल्थ सेंटर, फिटनेस सेंटर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात. मुंबई विद्यापीठातील तज्ज्ञांनी विषयघटकांना मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम अनुभवी व्यक्तींकडून शिकवला जातो आणि प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.

दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्हता – १०वी उत्तीर्ण आणि वयाची किमान १८ वर्षे पूर्ण केलेली असावी. 

संपर्क – https://www.gicededu.co.in

मुंबई विद्यापीठ – सर्टिफिकेट कोर्स इन फिटनेस सेंटर मॅनेजमेंट. कालावधी सहा महिने. कोणत्याही शाखेत १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. 

संपर्क – डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कलिना कॅम्पस, विद्यानगरी, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई – ४०००९८ 

https://parttimecourses.mu.ac.in/

मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन – मणिपाल कॉलेज ऑफ हेल्थ प्रोफेशन्स मार्फत **बी.एस्सी. इन एक्सरसाइज अँड स्पोर्ट्स सायन्स**. कालावधी तीन वर्षे + एक वर्ष इंटर्नशिप/एक्सटर्नशिप (एकूण चार वर्षे पर्याय उपलब्ध). अर्हता – १२वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र गटात सरासरी ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. करिअर संधी – हेल्थ ट्रेनर, हेल्थ फिटनेस स्पेशलिस्ट, एक्सरसाइज स्पेशलिस्ट, एक्सरसाइज अँड स्पोर्ट्स फिजिऑलॉजिस्ट, स्पोर्ट्स अॅडमिनिस्ट्रेशन इत्यादी. 

संपर्क – https://www.manipal.edu/soahs-manipal/program-list/b-sc–exercise-and-sports-science-.html

 

सिम्बायोसिस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सेस, पुणे बी.एस्सी. इन स्पोर्ट अँड एक्सरसाइज सायन्स (ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च)**. कालावधी चार वर्षे. अर्हता – कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. खुला संवर्ग ५० टक्के, राखीव संवर्ग ४५ टक्के. 

संपर्क – https://www.ssss.edu.in

सोमय्या स्पोर्ट्स अकॅडमी, मुंबई – बी.एस्सी. स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्स**. कालावधी तीन वर्षे. अर्हता – ४५-५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. 

संपर्क – https://sportsacademy.somaiya.edu

 

लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन (LNIPE), ग्वाल्हेर– 

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिटनेस मॅनेजमेंट – कालावधी एक वर्ष. कोणत्याही शाखेतील पदवीधर (खुला संवर्ग ४५ टक्के, राखीव ४० टक्के) प्रवेश घेऊ शकतो. चाळणी परीक्षा (लेखी + शारीरिक क्षमता चाचणी) द्वारे प्रवेश. विषयघटकांत फिटनेस व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे, नवीन प्रवाह, पोषण, स्नायू, ताकद, लवचिकता, तग धरण्याची क्षमता, व्यायामाचे शरीरशास्त्र इत्यादींचा समावेश आहे. 

संपर्क – https://lnipe.edu.in/

 

दूरशिक्षण/इतर डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी (स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स जर्नलिझम, स्पोर्ट्स अॅनालिटिक्स, स्पोर्ट्स सायकॉलॉजी इ.) संबंधित वर्षाच्या अधिकृत सूचना तपासाव्यात.

 

 क्रीडा पत्रकारिता

 

भारतीय क्रीडा विश्वाने बरीच प्रगती केली आहे. क्रिकेटसह बॅडमिंटन, बुद्धिबळ, हॉकी, कबड्डी, नेमबाजी, कुस्ती, टेनिस आदी खेळांमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे क्रीडा रसिकांचा ओढा इतर खेळांकडेही वाढला आहे. या सर्व बाबींची बातमी आणि विश्लेषण करण्यासाठी प्रशिक्षित पत्रकार/माध्यमकर्मींची गरज वाढत आहे. क्रीडा पत्रकारिता किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात चांगले करिअर घडवता येते.

**संस्था आणि अभ्यासक्रम**

(१) **लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन** – एम.ए. इन स्पोर्ट्स जर्नलिझम. कालावधी दोन वर्षे. कोणत्याही विषयातील पदवीधर (खुला संवर्ग ४५ टक्के, राखीव ४० टक्के). प्रवेशासाठी ऑनलाइन/लेखी चाळणी परीक्षा. अभ्यासक्रमात क्रीडा पत्रकारितेची ओळख, माध्यमांची भूमिका, वृत्तमूल्य व वस्तुनिष्ठता, बातमीचे घटक, माध्यमांचे प्रकार, नैतिक मूल्ये, व्यावसायिकता, संपादकीय कार्य, लेखन कौशल्य, इव्हेंट व्यवस्थापन आणि व्यवसाय संवाद यांचा समावेश आहे. 

संपर्क – https://lnipe.edu.in/

(२) **मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन** – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स कम्युनिकेशन. कालावधी एक वर्ष. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी (किमान ५० टक्के). करिअर संधी – मीडिया रिलेशन स्पेशलिस्ट (स्पोर्ट्स क्लब), राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा संघांचे प्रवक्ते, कम्युनिकेशन मॅनेजर, मीडिया आणि पब्लिक रिलेशन मॅनेजर, इव्हेंट कोऑर्डिनेटर. 

संपर्क – https://www.manipal.edu/soc/

(३) **इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड न्यू मीडिया, बेंगळुरू** – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ब्रॉडकास्टिंग, प्रिंट जर्नलिझम आणि ऑनलाइन/मल्टीमीडिया जर्नलिझम. यात स्पोर्ट्स रिपोर्टिंग हा ऐच्छिक विषय निवडता येतो. 

संपर्क – https://www.iijnm.org

 

— सुरेश वांदिले