मास्क मार्शल
कॉलनीतलेपिंटू,मिंटू,चिंटूआणि छिंटूहे चारपक्के मित्र. एकाचवर्गात शिकणारे. आजूबाजूच्या सदनिकेत राहणारे. मौज–मस्ती–दंगा–खेळआणि अभ्यासएकत्र करणारे. सर्वचबाबतीत आघाडीवरअसणारे. कोरोनामुळेमात्र याचौघांच्या सगळयाचहालचालीवर बंधनंआलित.गप्पा–टप्पा–कागाळ्या–उखाळ्या–पाखाळ्या, सारंकाही स्मार्टफोनच्या मदतीनं.
स्मार्टफोन वापरण्यातचौघेही तरबेजझालीत. झूममीटिंग कसंकरायचं हेत्यांनी शिकूनघेतलं.काका–काकू,आजीआजोबांच्या ऑनलाइनमिटिंग त्यांनीघेतल्या. घरातबंदिस्त राहूनहीकॉलनीतली मंडळीएकमेकांच्या घरीअशी पोहचतराहिली.
मार्चमध्येआलेला करोना, आताजाईल..उद्याजाईल असंम्हणता म्हणताआपला मुक्कामडिसेंबरपर्यंत लांबवला.हानकोसा पाहुणानव्या वर्षाततरी जाणारकी नाहीयाची शंकायायला लागली.
पिंटू,मिंटू,चिंटूआणि छिंटूनेठरवलं कीआपणच याकरोनाच्या पाठीमागेलागून त्यालापळता भूईथोडे करुया की..परवाही चौकडीकॉलनीतल्या आंब्याच्याझाडाखाली भेटलीतेव्हा हीचर्चा झाली.
अरे, चिंट्या, एखादयालापळवायचं म्हंटलकी तोआधी दिसायलाहवा कीनाही. उंदरालामांजर दिसतेतेव्हाच तोपळतो कीनाही.पिंटूम्हणाला.
हा कोरोनाउंदिर आहेकी मांजरआहे कीसाप आहेकी मुंगूसआहे हेचकळत नाही.
पण हाकुणी असलेनात्याला आपणभ्यायलाच नको..जोभ्याला तोगेला, अशीम्हणच आहेना..
मग कायकरायचं..
नव्या वर्षातकसं बिनधास्तराहयाचं..घाबरायचंनाही..
म्हणजे कायकरायचं..
हा मास्कआहे ना, त्यानेचभीती वाढते.तोघातला कीकरोनाचं भूतआठवू लागतं.हेभूत उरवण्यासाठी मास्क फेकूनद्यायला हवा..आतातर कायलस पणआलीय
अरे, बाबाअसं काहीकरायचं नाहीहं..हाकोरोना म्हणजेदबा धरुनबसलेला कोल्हाआहे. मास्कघालून आणिहातातोंडाची स्वच्छतापाळून आपणत्याचा जीवबराच कासावीसकेलाय की…आतापर्यंतकळ काढलीआता नव्यावर्षात आणखीकाही महिनेकळ काढू..
छिटूचंम्हणनं टोळीलापटलं..कॉलनीतलीमोठी मंडळीसुध्दा आज कालमास्कविनाच फिरायलालागल्याचं त्यांनीबघितलं होतं. मास्कविनाफिरणारी हीवडीलधारी मंडळी, करोनाविषाणू कॉलनीतघेऊन आलीतर गेलोआपण सारेचबाराच्या भावात..पिंटूनेभीती व्यक्तकेली.
नव्या वर्षातआपण मास्कमार्शल म्हणूनकाम केलंतर रे..
म्हणजे काय..
अरे, आपणकाही दिवसकॉलनीच्या गेटवरपहारच देऊआळीपाळीने. जेकाका काकूमास्क शिवायबाहेर जातीलकिंवा बाहेरुनयेतील, त्यांनाटोकत राहू..आतामास्क स्वस्तझाल्याने आपल्याखाऊच्या पैशातूनमास्क घेऊनठेऊ.. मास्कविसरलेल्यांना देतराहू..काहीतरपरिणाम नाहीका होणार..लाजेकाजेस्तव ही मंडळीनाही कामास्क घालणार..
वा S वासर्वजण एकासुरात म्हणाले..टोळीनेनव्या वर्षातमास्क मार्शलहोण्याचा निर्धारकेला..कॉलनीच्याव्हॉटस्ॲप ग्रुपवरुनत्यांनी तसंजाहीरही करुनटाकलं..
००००
पिंटू,मिंटू,चिंटूआणि छिंटूटोळीने पाठवलेलामास्क मार्शलकां आणिकशासाठीचा व्हॉटसॲपसंदेशामुळे थोडीफारखळबळ माजलीच.आगावूहोतीच आताअतिशहाणीही झालीटोळी,अशाप्रकारच्या प्रतिक्रिया काहींनी लिहिल्या.काहींनीतुम्ही कोण,आम्हीआमच्या मनाचेराजे अशाआशयाचं उत्तरदिलं.काहिंनीआवरा आपल्याकार्ट्यांना,असंतिखट बोलपिंटू,मिंटू,चिंटूआणि छिंटूच्याआईबाबांना ऐकवलं.याचानाही म्हणायलाथोडा फारपरिणाम चौघांच्याही आईबाबांवर झाला.प्रत्येकाला त्यांच्या घरीबोलणं खावंलागलं.नसतेउपदव्याप करण्यापेक्षा शिष्यवृत्ती परीक्षेचंयूट्यूबरील व्हीडिओबघून वेळसत्कर्णी लावाअसं सांगितलंगेलं.हेपण करुआणि तेपण करुचकरु,असानिर्धारच टोळीनंकेला.
ही टोळीजेव्हा काहीठरवते तेव्हामाघार घेतनाही. हेकॉलनीतल्या बहुतेकांनाठाऊक होतं.त्यामुळेनाही म्हंटलतरी बऱ्याचजणांनी त्यांचाधसका घेतला..मात्रहा उत्साह फार काळकाही टिकणारनाही,असहीबऱ्याच जणांनावाटलं.१जानेवारीला सकाळीसकाळीच टोळीकॉलनीच्या दारातदत्त म्हणूनउभी राहिली.
मास्क विनाकॉलनीच्या बाहेरजाऊ पाहणाऱ्यादेशपांडे काकाआणि वानखेडेकाकांना चौघांनीअडवलंच..
पिंटू त्यांनामास्क दिला
मला नाहीघालायचा…आतापर्यंतघालतच होतोकी..जुनेवर्षं गेलं..सोबतत्याने कोरोनालाहीनेलं..वानखेडेकाका रागावूनम्हणाले..
ते काहीनाही तुम्हालाघालावचं लागेल..
जबरदस्ती आहेकी काय…पोलिंसांकडे तक्रार करीन.देशपांडेकाका म्हणाले
चौघेही हसले.
काय रेगधड्यांनो मीविनोद नाहीकेला..हॅहॅ हॅकरायला..
अहो काका,पोलिसाततुम्ही आमचीतक्रार केलीतर आधीतुम्हालाच दंडकरतील,मास्कनाही घातलाम्हणून..आमचंकौतुक करतीलमास्क लावलाम्हणून..एवढयातजोशी काकातिथे आले.त्यांनीतोंड झाकेलअसाच मास्कघातला होता.नाकउघडच होतं.कावळेकाका बाहेरुनआले.त्यांनीतर फक्तगळयातच मासकलटकवला होता.एखादयाहारासारखा.यादोघांनांही टोळीनंटोकलच.बघताबघता गर्दीवाढली.टोळीचेआईबाबाही तिथेआले.इतरहीमंडळी आली.काहींनीबाचाबाची सुरुकेली.भांडणहोते कीअशी परिस्थितीनिर्माण झाली.त्याचवेळीबाजूच्या रस्त्यावरुन मोटर सायकलवरुनजात असलेल्याइंस्पेक्टर लहानेही गर्दीबघून थांबलेआणि आतआले.त्यांनाबघताच बाचाबाचीथांबली.
त्यांनी उत्सुकतेनंकाय घडलयते विचारलं.कुणीहीकाही सांगेना.तेव्हाछिंटूनं धिटपणेसारं काहीसांगून टाकलं.
देशपांडे काकाहळूच म्हणाले,हाआगावूपणाच नाहीका याशहाण्यांचा….
लहानेंच्या लक्षातसगळा प्रकारआला.त्यांनीमग सर्वसूत्र हातीघेतली.त्यांनीआबांच्या झाडाजवळसर्वांना एकत्रकेलं.तिथेअसलेल्या चबुतऱ्यावरते उभेराहिले.सर्वांनाउद्देशून तेम्हणाले
ही मुलंनक्कीच आगावूपणाकरीत आहेत.पणते त्यांचंवयच आहेकी.मात्रतुम्ही जेकरताहात तेकाय बरं..
म्हणजे..वानखेडेकाकांनी आश्चर्यानंविचारलं
म्हणजे असंसाहेब,कीतुम्ही मास्कन लावूनजे काहीकरता आहातते काय..तोमूर्खपणा आहेअसं मीम्हंटलं तर..मोठ्यांनाअसा मूर्खपणाचालतो का…
काहीतरीच कायइन्स्पेक्टर साहेब..देशपांडेकाकांनी नाराजीव्यक्त केली..
हे बघामंडळी,नवंवर्ष आलंतरी करोनाविषाणू गेलाअसा त्याचाअर्थ नाहीना..तोकुणाच्याही थुंकीतूनइकडे तिकडेजाऊ शकतो..आतापर्यंतजे झालंते झालं..पुढचेकाही दिवसमहत्वाचे…हीपोर सांगताततसा हाविषाणू लपूनबसलाय…मास्कही पहिलीढाल संरक्षणाची..दुसरीढाल लसीची..ती तुम्ही घतलीच असणार. तरी सुध्दा सावधगिरीबाळगायचीच असं सर्वच डॉक्टर सांगताहेत ना..मग त्यांचं नको का ऐकायला....एकदाविषाणू यानाकातून त्यानाकात, यातोंडातून त्यातोंडात शिरलातर मग..तुम्हालात्रास,घरीआजोबा आजीअसतील तरत्यांना अधिकचत्रास..नवीनवर्ष मजेतआनंदात घालवायचंअसेल तरतुम्ही सुध्दामास्क घालण्याचापक्का निर्धारकेलाच पाहिजे..आणिया पोरांचंऐकलं पाहिजे..
बरोबर ना..जोशीकाकांडे बघत लहानेम्हणाले……मुलंही देवाघरचीफुलं असंकोण म्हणालंहोतं,त्यांनीगर्दीला विचारलं,कुणीतरीम्हणाल सानेगुरुजी..
ते थोरहोते कीनाही..
होते..
मग,त्यांनीसांगितल्याप्रमाणे यादेवाघरच्या फुलांचंऐकण्यात शहाणपणाआहे कीआपल्या हेकखोरपणाकरण्यात शहाणपणा…
लहानेंनी बाउंसरचटाकला..यावरकाही क्षणकुणीही बोललंनाही.पिनड्रॉपशांतता निर्माणझाली…
या शांततेनेमाझ्या प्रश्नाचंउत्तर मिळालं.. लहानेम्हणाले.त्यांनीसर्वांना नव्यावर्षाच्या शुभेच्छादिल्या.आणिते निघूनगेले..देवाघरच्या फुलांचंऐकण्यातच आपलंहित असल्याचंबहुतेकांच्या लक्षातआलं…
सुरेश वांदिले