मैत्र जिवांचे
दोन दिवसापासून अलेक्झांडर (द डॉगी) अस्वस्थ होता. सकाळी उठल्या उठल्या घरच्या सर्वांना त्याच्या पध्दतीने गुड मार्निंग करणारा, लाड करवून घेणारा अलेक्झांडर दोन दिवसांपासून एकदम शांत होता. या खोलितून त्या खोलित अस्वस्थपणे फेऱ्या मारायचा. मध्येच खिन्न होऊन कोपऱ्यात जाऊन बसायचा. घरच्यांसोबत दंगामस्ती नाही, लुडबूड नाही, खाण्यापिण्यासाठी आग्रही नाही. तेजोमयी आणि बाबांच्या ते लक्षात आलं होतं. आई मात्र काही बोलली नाही.
बाबा, याला बरं नसेल का हो…तेजोमयीनं विचारलं..
काय होणार ठोंब्याला. खातो पितो नि झोपतो, सुखाचा जीव..आपण उगीच काळजी करतो..बाबा बोलण्याच्या आधीच आईने प्रतिक्रिया दिली.
अगं,तसं नसेल, इतका खिन्न असतो का कधी…काहीतरी नक्कीच बिनसलं असणार याचं, तेजोमयी म्हणाली..
बरं बाबा, करा त्याचे लाड आणि कौतुक, असं बोलून आई तिच्या कामामध्ये व्यस्त झाली. बाबा आणि तेजोयमी अलेक्झांडरजवळ बसले. दोघांनी त्याच्या अंगावरुन प्रेमाने हात फिरवला. अलेक्झांडरने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. डोळे मिटून तसाच पडून राहिला..
डॉक्टरकडे न्यायचं का हो बाबा यास …तेजोमयीनं काळजीच्या सुरात बाबांना विचारलं. बाबांनाही थोडी चिंता वाटल्यानं त्यांनी डॉगी क्लिनिकला,अलेक्झांडरला कधी आणायचं हे मोबाइलवरुन विचारलं.
डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आणायला सांगितलं. त्याप्रमाणे अलेक्झांडरला डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला त्यांच्या पध्दतीनं तपासलं. अलेक्झांडरला काहीही झालं नसल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. तसं त्यांनी बाबांना सांगितलं. मग,हा असा अस्वस्थ आणि खिन्न कां बरं हो काका, तेजोमयीनं विचारलं. डॉक्टरांनी तेजोमयीकडे बघितलं. अर्धा मिनिटं त्यांनी डोळे मिटले. कसल्यातरी विचारात ते गढून गेले. डोळे उघडल्यावर त्यांनी बाबांना, अलेक्झांडरचा दिनक्रम विचारला..बाबांनी सारं काही सांगितलं. त्यात सिम्बासोबत एक तास खेळण्याचा उल्लेख येताच, डॉक्टरांनी बाबांना विचारलं..हा सिम्बा कोण?
सिम्बा, हा बाजूच्या वानखेडे काकांचा डॉगी.अलेक्झांडर आणि तो दोघेही एकाच वेळी त्यांच्या त्यांच्या घरी आल्याने, लवकरच दोघांची गट्टी जमली. मग कधी अलेक्झांडरच्या घरी सिम्बा तर कधी सिम्बा अलेक्झांडरच्या घरी दररोज दंगामस्ती करत,खेळत. तेजोमयीचे बाबा अलेक्झांडरला फिरायला नेत. कधी कधी सिम्बासुध्दा त्यांच्यासोबत जायचा. वानखेडे काका सुध्दा सिम्बासोबत अलेक्झांडरला फिरायला घेऊन जात. हे सगळं ऐकून घेतल्यावर डॉक्टरांनी विचारलं, हा सिम्बा कुठाय सध्या..
घरी असावा.बाबा म्हणाले..
या दोघांची भेट झाली नाही का, दोन दिवसात..डॉक्टरांनी विचारलं..
खरच, दोन दिवसांपासून सिम्बा दिसलाच नाही… तेजोमयी आठवून म्हणाली..
मग ताबडतोब घरी जावून या दोघांची भेट घडवून आणा..आणि चमत्कार बघा.मित्राच्या विरहाने हा अस्वस्थ झालाय.. डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजोमयी आणि बाबा, अलेक्झांडरला घेऊन घरी आले. बाबांनी वानखेडे काकांच्या सदनिकेकडे बघितलं. दरवाजाला कुलूप होतं. वानखेडे काका- काकू सिम्बासोबत बाहेर गेल्याचं स्पष्ट झालं. बाहेर जाताना ते नेहमीच सांगून जात.
यावेळी त्यांनी कां बरं सांगितलं नसावं, बाबांनी तेजोमयीस विचारलं..
बाबा तुम्ही काकांना फोन कराना..बाबांना ते पटलं..त्यांनी वानखेडे काकांना मोबाइल लावला. ते डॉगीच्या मोठ्या दवाखान्यात होते. सिम्बॉला कावीळ झाल्यामुळे त्याला दोन दिवसांपासून दवाखान्यात भरती करावं लागलं होतं. सिम्बावर उपचार करताना घरची मंडळी जवळ असणं गरजेचं असल्यानं काका आणि काकू दोन दिवसांपासून तिथेच होते..
अहो, आम्हाला नाही का सांगायचं, आम्ही मदतीला आलो असतो ना.. बाबा म्हणाले. वानखेडे काकांनी काय उत्तर दिलं ते काही तेजोमयीस कळलं नाही….
०००
बाबांनीफोन बंदकरताच तेजोमयीम्हणाली, सिम्बालाभेटायला दवाखान्यातजाऊया.
दोघांना एकमेकांनाबघून बरंवाटेल. बाबांनाही कल्पनाआवडली.आजारीसिम्बाला बघण्यासाठीदवाखान्यात जातअसल्याचं तेजोमयीनंआईस बाहेरुनचसांगितलं.
दोघेहीअलेक्झांडरला घेऊनदवाखान्यात सिम्बाचाउपचार सुरुअसलेल्या खोलितपोहचले. दोनदिवसांपासून उपचारसुरु असूनहीसिम्बा उपचारांनाप्रतिसाद देतनव्हता. त्याच्यापोटात अन्नही गेलंनव्हतं त्यामुळेडॉक्टर चिंतेतहोते.. दवाखान्यातील खोलितील सिम्बाकडेअलेक्झांडरचं लक्षगेलं.
त्यालाबघताच अलेक्झांडरने कु S ईं s करुनआनंद व्यक्तकेला. तेजोमयीआणि बाबांनाआश्चर्य वाटलं. त्याहूनआश्चर्याची गोष्टम्हणजे, दोनदिवसांपासून मलूलझालेल्या सिम्बानेडोळे उघडले. अलेक्झांडरदिसताच, सिम्बानेत्याच्याकडे झेपावण्याचा प्रयत्न केला…पणअशक्तपणामुळे त्यालाते जमलंनाही..तिथेउपचारासाठी आलेल्याडॉक्टरांच्या लक्षातया सर्वबाबी आल्या.
सिम्बा शंभर टक्के बरा होणार बघा..त्याचं औषध आलय आता..काळजीच मिटली..वानखेडेकाकांना डॉक्टरम्हणाले.
तेजोमयीच्या बाबांनी मगआपला अनुभवडॉक्टरांना सांगितला.सिम्बालाबघताच दोनदिवसांपासूनची अलेक्झांडरची अस्वस्थता कशीसंपली,हेडॉक्टरांच्या लक्षातआणून दिलं.
अलेक्झांडर, इथे काही दिवस राहिला तर सिम्बा लवकरात लवकर बरा होईल..दोघांची मैत्री घट्ट आहे. एकमेकांना बघून त्यांना होणारा आनंद आमचे उपचार अधिक अधिक प्रभावी करतील. तेव्हा ठेवाल ना याला इथे,डॉक्टरांनी विचारलं…
ठेऊया की..त्यातकाय मोठसं…असंतेजोमयीस म्हणावसंवाटलं.पणहे इतकंकाही इतकंसोपं नव्हतं..कारणकसल्यातरी कारणांवरुनकाही दिवसांपासून आई आणिवानखेडे काकूंचंबोलणं बंदहोतं.त्यामुळेआईला विचारुनचनिर्णय घ्यावालागणार होता. तसंतिने बाबांनाबाजूला नेऊनसांगितलं..चांगल्याकामासाठी आईनाही म्हणणारनाही याचीत्यांना खात्रीहोती. त्यांनीआईस फोनलावला.आतापर्यंतकाय कायघडलं तेसांगितलं. आईएका क्षणातकोणतेही आढेवेढेन घेतातयार झाली.
मीसुध्दा दवाखान्यातयेते, तोपर्यंततिथेच थांबाअसा निरोपहीदिला. तसेबाबांनी वानखेडेकाका–काकूंनासांगितलं. दोघांनाहीबरं वाटलं. एकातासात आईदवाखान्यात पोहचली. सोबततिने काकाकांकूसाठी डबाआणला. अलेक्झांडरचाही डबा आणला. वानखेडेकाकुंच्या डोळयातूनअश्रू ओघळले.
काकूंचाहातात हातघेऊन आईम्हणाली..अहो, अशावेळी शेजारधर्मपाळायचा नाहीतर कधी. हेमुके जीवआपली लेकरआहेत..त्यांच्याठी इतकही नाहीकरायचं का..काकांनागहिवरुन आलं. त्यारात्री काकांच्यामदतीला बाबादवाखान्यात थांबले. काकूंनाघेऊन आईघरी परतली.
अलेक्झांडरडोळयासमोर दिसतअसल्याने सिम्बाउपचारांना शहाण्याबाळासारखा प्रतिसाद देऊलागला. फारत्रास नदेता इंजेक्शनघेऊ लागला. दुसऱ्यादिवशी सकाळीआई आणिकाकू दवाखान्यातआल्या. त्यांनीबाबा आणिकाकांना सुटीदिली.असेतीन चारदिवस गेले. सिम्बापूर्ण बराझाला. काकांनीडॉक्टरांचे आभारमानले.
आमचेआभार मानण्याच्या ऐवजी अलेक्झांडरचे माना..तोआला निसारं चित्रबदललं..थँक्यूअलेक्झांडर. त्याच्यापाठिवर प्रेमानेहात फिरवतडॉक्टर म्हणाले.सिम्बालादवाखान्यातून सुटीमिळाली. त्याच्याआजारपणामुळे आईआणि काकूंचंभांडण मिटलं. तेजोमयीसआईचा अभिमानवाटला..घरीयेत असतानातिने आईचीपप्पी घेतली..अलेक्झांडरही आईच्या कुशीतशिरला.
सुरेश वांदिले