आपल्या देशातील, वाणिज्यशाखेचे शिक्षण देणाऱ्या काही प्रमुख संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास पदवीस्तरापासूनच करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.१२वीनंतर वाणिज्य शाखेचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयांचा प्राथमिकतेने विचार करायला हवा. अशी काही महाविद्यालये आणि शिक्षण संस्था पुढील प्रमाणे आहेत.
(१) श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स
गेल्या अनेक वर्षापासून, वाणिज्य शाखेतील सर्वोत्कृष्ट शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स या संस्थेने ख्याती प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सूक्ष्म संनियंत्रण, करिअर करण्यासाठी आणि व्यक्तीमत्व विकासास उपयुक्त ठरतील, अशा विविध विषयांचा समावेश, संशोधनास चालना आणि उत्कृष्ट प्लेसमेंट सेल, या वैशिष्ट्यांमुळे देशातील विद्यार्थ्यांचा, या संस्थेतील वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न असतो. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ट्युटोरिअल्स, सहभागी शिक्षण, औद्योगिक प्रकल्पांना भेटी, क्षेत्रीय भेटी,वेगवेगळी चचासत्रे आणि नियमितपणे सादरीकरणाची संधी, इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलाजीचा, अध्यापनात अधिकाधिक वापर ही आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. संस्थेने २०१८ मध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, अशा अभ्यासक्रमांचा प्रारंभ केला. यामध्ये बॅाम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सहकार्याने, बिझिनेस ॲनॅलिटिक्स वुइथ आर (डाटा मायनिंग आणि सांख्यिकी विश्लेषणासाठी उपयोगात आणली जाणारी संगणकीय भाषा), चार्टर्ड इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटट्न्टस, या संस्थेच्या सहकार्याने, डाटा ॲनॅलिटिक्स वुइथ आर, याच संस्थेच्या सहकार्याने, अकाउंटन्सी स्टार, या लघु मुदतीच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या संस्थेची गुणवत्ता लक्षात घेऊन, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (मनुष्यबळ विकास मंत्रालय) वाणिज्य आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी नॅशनल रिसोर्स सेंटर, म्हणून मान्यता प्रदान करुन तशी सुविधा दिली आहे. यामुळे अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यकांना नवे ज्ञान ग्रहण करणे आणि संशोधन करण्यास साहाय्य होते.
संस्थेत प्लेसमेंटसाठी मॅकन्सी, बीसीजी, ब्लूमबर्ग, केपीएमजी, गुगल, मायक्रोसॉफ्ट, नोमुरा,बार्कलेज,एचएसबीसी अशा कंपन्या येतात. या महाविद्यालयात गेल्या वर्षी प्लेसमेंट प्रकियेत १२० कंपन्यांनी सहभाग घेतला. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना वेगवेगळया कंपन्यांमध्ये, त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी मिळाली.
संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पदवीस्तरीय विद्यार्थ्यांनासुध्दा इंटर्नशीपची सुविधा मिळवून दिली जाते. आपल्याकडील अत्यल्प महाविद्यालयांमध्ये याकडे लक्ष पुरवले जाते. अनेक महाविद्यालये याचा विचारही करत नाही व तशी सुविधाही संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्नही करत नाहीत. संस्थेचा प्लेसमेंट सेल हा करिअर सेवा घटक किंवा करिअर सर्विस युनिट सारखा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो.
संपर्क- श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, नॉर्थ कॅम्पस, मॉरिस नगर,दिल्ली-११०००७, दूरध्वनी- ०११-२७६६७९०५, ईमेल-admissions@srcc.du.ac.in, संकेतसथळ-srcc.edu
०००
(५) सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स
अभ्यासक्रम-(१) बी.कॉम, (२) बी.कॉम इंटिग्रेटेड, (३) बी.कॉम इन मॅनेजमेंट अकाउंटिंग, (४) बी.कॉम इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (५) बी.कॉम इन अकाउंटिंग ॲण्ड फायनांस.
संपर्क- सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, सेनापती बापट रोड, पुणे- ४११००४, दूरध्वनी-०२०-२५६५३९०३, ईमेल-contact@symbiosiscollege.edu.in, संकेतस्थळ- https://symbiosiscollege.edu.in/
000
मुंबईतील आघाडीची महाविद्यालये-
(१) नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स, (२) सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, (३) मिठिबाई कॉलेज ऑफ आर्ट्स, चौहान इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड अमृतबेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स(स्वायत्त), (४) के.जे.कॉलेज ऑफ कॉमर्स, (५) के.सी.कॉलेज, (६) एस. के. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स.
०००
पुण्यातील आघाडीची महाविद्यालये-
(१) सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, (२) नेस वाडीया कॉलेज ऑफ कॉमर्स ,(३) सेंट मिरा कॉलेज फॉर गर्ल्स, (४) इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड सायन्स, (५) स्कूल ऑफ कॉमर्स-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, (६) सर परशुरामभाऊ कॉलेज, (७) एमआयटी आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज
०००