(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

(१) नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स

() बी.कॉम – वित्तीय आणि आणि आर्थिक जगातील समस्यांचा सक्षमपणे सामना करता येणे शक्य व्हावे, यासाठी या अभ्यासक्रमात व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात. लेखा, वित्त आणि कर निर्धारण, या तीन विषयघटकांवर,अभ्यासक्रमात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना सीए, आयसीडब्ल्यूए, सीएफए,सीएमए, एमबीए आणि वित्त व लेखा विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणे सुलभ जावे, यादृष्टिने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना वित्त, गुंतवणूक, लेखा, परीक्षण, माहिती प्रक्रिया या विषयांमध्ये कौशल्य प्राप्त होऊ शकते.

अभ्यासक्रमात, इंटर सीए विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सीए, सीएमए, सीएफए, या करिअरकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासक्रमातील विषयघटक उपयुक्त ठरतात.

(२) बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनांशिअल मार्केट्स- या अभ्यासक्रमात वित्तीय बाजाराशी निगडित विविधांगी पैलू शिकवले जातात.अभ्यासक्रमात वित्त, गुंतवणूक, अर्थशास्त्र, गुंतवणुकीतील जोखिम, वित्तीय बाजारात यशस्वी होण्यासाठी लागणारे विविध सिध्दांत, कायदेशीर बाबी, संवाद कौशल्य आदी विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे. योग्य निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचे कौशल्य, विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कालावधी-तीन वर्षे.

(३) बी कॉम इन अकाउंटिंग ॲण्ड फायनांस या  अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) आणि वित्तीय विश्लेषक (फायनांशिअल ॲनॅलिस्ट) हे करिअर करण्याच्या अनुषंगाने, हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. कंपनी/ उद्योगाची वित्तीय बाजू अधिक सक्षम आणि बळकट करण्याचे कौशल्य, हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार प्राप्त करु शकतात. योग्यवेळी वित्तीय निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता या उमेदवारांमध्ये निर्माण होते.

इतर अभ्यासक्रम

बी कॉम इन- (१) इकॉनॉमिक्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स, (२) इकॉनॉमिक्स, (३) मॅनेजमेंट ॲण्ड फायनांस, (४) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

संपर्क- नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स ,स्वामी भक्तीवेदांत मार्ग, भागुबाई मफतलाल कॉम्प्लेक्स, कूपर रुग्णालयाच्या विरुध्द दिशेला. विले पार्ले(पश्चिम), मुंबई-४०००५६, दूरध्वनी- ०२२-४२३३८०००, ईमेल- info@nmcollege.in संकेतस्थळ- https://nmcollege.in/

०००

(४) सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिकस

महाराष्ट्र शासनाच्या अख्यत्यारितील हे महाविद्यालय, वाणिज्य शाखेतील शिक्षण देणारे महत्वाचे महाविद्यालय समजले जाते. या महाविद्यालयास १०७ वर्षाची परंपरा आहे. वाणिज्य शाखेतील शिक्षणाचा देशात आणि आशिया खंडात पहिल्यांदा प्रारंभ करणाऱ्या संस्थांमध्ये या महाविद्यालयाचा समावेश होतो. वित्तीय घडामोडींचे केंद्रस्थान असलेल्या,मुंबईतील चर्चगेट परिसरात हे महाविद्यालय कार्यरत आहे.

अभ्यासक्रम

() बॅचलर ऑफ कॉमर्स इन बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे असून, कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळायला हवेत. विद्यार्थ्याने एकाच प्रयत्नात १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. बँका, इंश्युरन्स कंपन्या व आस्थापनांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात, या हेतुने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. या दोन्ही क्षेत्रात, खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे विविध संधी उपलबध झाल्या आहेत. अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. याक्षेत्रात उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञानही शिकवले जाते.

इतर अभ्यासक्रम

(१) बी कॉम इन अकाउंटिंग ॲण्ड फायनांस, (२) बी कॉम इन बँकिंग ॲण्ड फायनांशिअल ॲनॅलिटिक्स, (३) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, (४) बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, (५) बॅचलर इन लक्झरी ब्रँड ॲण्ड रिटेल मॅनेजमेंट

संपर्क- सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, बी रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०, दूरध्वनी- ०२२-२२०४२८९७, ईमेल-sydprincipal@sydenham.ac.in,
sydprincipal@yahoo.co.in,संकेतस्थळ- http://sydenham.ac.in/

०००

सुरेश वांदिले

०००