वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभूमीवर आरोग्य सेवेच्या बाबतीत काही बाबी ठळणपणे निदर्शनास आल्या. त्यामध्ये मेडिकल लेबॉरेटरी टेक्निशियन यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. यापुढील काळात कोरोना विषाणू व इतर रोग्यांची थुंकी,रक्त, मूत्र आदी बाबींच्या तपासणीसाठी अधिक प्रयोगशाळा आणि अधिक तंत्रज्ञ लागण्याची शक्यता, हेल्थ केअर उद्योगाशी निडगित तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असे तंत्रज्ञ देशातील विविध भागातच नव्हे तर जगात इतरत्रही लागू शकतात. त्यामुळे मेडिकल लेबॉरेटरी टेक्निशिअनचा अभ्यासक्रम हा चांगले करिअर घडवण्याचा उत्तम पर्याय ठरु शकतो.
या अभ्यासक्रमांतर्गत प्रयोगशाळेत रुग्णांचे रक्त,मूत्र आणि थुंकीची तपासणी करणे, या तपासणीचे निष्कर्ष काढणे आणि त्याचा विस्तृत अहवाल तयार करणे या बाबींचा समावेश आहे. हा अहवाल आणि त्यातील निष्कर्षांचा मोठा उपयोग डॉक्टरांना उपचारांची योग्य दिशा ठरवण्यासाठी होत असतो. डॉक्टरांच्या यशामध्ये मेडिकल लेबॉरेटरी तंत्रज्ञ महत्वाची भूमिका बजावतात.
अभ्यासक्रम
आपल्याकडे मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ) हा अभ्यासक्रम अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये सुरु करण्यात आला आहे. काही संस्थांमधील या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा तर काहींचा कालावधी तीन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याने 12 वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा.
संस्था आणि अभ्यासक्रम
(1) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायंस – या संस्थेत तीन वर्षे कालावधीचा बी.एस्सी इन मेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत चाचण्या, त्यांच्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांची हाताळणी, देखभाल, दुरुस्ती, माहितीचे विश्लेषण,यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्याच्या हेतुने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हायटेक वैद्यकीय उपचारांमध्ये या तंत्रज्ञांना डॉक्टरांच्या बरोबरीने कार्य करण्याची संधी त्यांच्याकडे असणाऱ्या तांत्रिक आणि शास्त्रीय माहितीमुळे मिळू शकते. विद्यार्थ्यांची निवड चाळणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर मेडिकल टेक्नॉलॉजी इंडस्ट्री, मेडिकल इक्विपमेंट्स कंपनी, होमकेअर इंडस्ट्री, मेडिकल इमॅजिन इंडस्ट्री, डायलेसीस सेंटर ॲण्ड सर्व्हिसेस, पथॉलॉजी लेबॉरेटरी, सिम्युलेशन सेंटर, रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटर, आयटी इन मेडिकल टेक्नॉलॉजी, उद्योजक अशा काही क्षेत्रांमध्ये करिअर करता येणे शक्य आहे.
संपर्क– सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायंसेस, सेनापती बापट मार्ग, पुणे – 411004, दूरध्वनी-020-25658015, ईमेल- admin@sihspune.org,संकेतस्थळ-sihspune.org, (2) मनिपाल कॉलेज ऑफ हेल्थ सायंस –
या संस्थेने बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेकॉनॉलॉजी हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. यामध्ये एक वर्षं कालावधीच्या इंटर्नशीपचा समावेश आहे.
अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी या विषयांसोबत जीवशास्त्र, गणित, संगणकशास्त्र, सांख्यिकी, इलेक्ट्रॉनिक्स, मानसशास्त्र यापैकी एक विषय घेतलेला असावा. विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण मिळायला हवे. प्रवेशासाठी मनिपाल एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागते.
संपर्क- मनिपाल कॉलेज ऑफ हेल्थ प्रोफेशन्स,कस्तुरबा मेडिकल कॉलेज,मनिपाल-576104, संपर्कध्वनी-92437777,टेलेफॅक्स-0820-2922400,ई-मेल- admissions@manipal.edu
, संकेतस्थळ-https://manipal.edu/
(3) जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल सायंस-
अभ्यासक्रम (1) बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी. कालावधी – तीन वर्षे. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. (2) सर्टिफिकेट कोर्स इन इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन कोर्स- कालावधी – एक वर्षं. या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी 12 वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशासत्र आणि जीवशास्त्रात मिळालेल्या गुणांचा आधार घेतला जातो. प्रवेश प्रकिया ऑगस्ट ते सप्टेबर या कालावधीत राबवली जाते.
संपर्क- जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सायंस कॅम्पस रोड, गोरीमेदू, धन्वंतरी नगर, पुडीचेरी- ६०५००६,दूरध्वनी-०४१३-२२९८२८८,फॅक्स-२९१२१११,ईमेल-dean@jipmer.edu.in,संकेतस्थळ- https://jipmer.edu.in/
(4) एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स
या संस्थेच्या नवी मुंबई आणि औरंगाबाद कॅम्पसमध्ये चार वर्षे कलावधीचा बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क– एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायंसेस, एमजीएम कॅम्पस, सेक्टर 1, कामोठे, नवी मुंबई-410209, दूरध्वनी- 020-27432471 , फॅक्स- 27431094
संकेतस्थळ- mgmuhs.com, ईमेल- registrar@mgmuhs.com, संकेतस्थळ- mgmuhs.com
(5) आयटीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायंस
या संस्थेने बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम मुंबई आणि नवी मुंबई कॅम्पसमध्ये करता येतो.
संपर्क– (१) आयटीएम – इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, सेक्टर-१२, प्लॉट क्रमांक ११, न्यू पनवेल(पूर्व), रायगड, ४१०२०६, ईमेल- ihs@itm.edu (२) के.बी.हाजी बचुली चॅरिटेबल ऑप्थलॅमिक ॲण्ड इएनटी हॉस्पिटल, ५८/६०, जाहंगीर मेरवानी, रोड परळ, मुंबई-४०००१२, संकेतस्थळ- itm.edu
(6) डॉ.डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर,
अभ्यासक्रम- सर्टिफिकेट कोर्स इन ॲडव्हान्स्ड मायक्रोबॉयलॉजी लेबॉरेटरी टेक्निक,अर्हता-विज्ञान शाखेतील 12 वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम संपर्क- संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे- 411018. दूरध्वनी- 020–67116400, फॅक्स- 27805217, ईमेल- info.medical@dpu.edu.in, संकेतस्थळ- dpu.edu.in
(7) भारती विद्यापीठ
या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नलॉजी हा एक वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- बी.एस्सी इन मायक्रोबॉयलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री किंवा केमिस्ट्री किंवा झुऑलॉजी किंवा बॉटनी. विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक. विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखत याद्वारे निवड केली जाते.
संपर्क- मेडिकल कॉलेज, पुणे – सातारा रोड, पुणे- 411043 ,दूरध्वनी- 020-24373226, फॅक्स- 24372175, ईमेल- bvumedicalpune@gmail.com, संकेतस्थळ- https://mcpune.bharatividyapeeth.edu/
(8) प्रवरा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम- बी.एस्सी -एम.एस्सी इन मेडिकल बायोटेक्नॉलॉजी,कालावधी- पाच वर्षे,अर्हता- विज्ञान शाखेतील 12वी उत्तीर्ण.
12 वी विज्ञान शाखेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो.
संपर्क – लोणी- 413736, तालुका- रहाता, जि- अहमदनगर, दूरध्वनी- 02422-271340, फॅक्स- 273413, ईमेल- biotechonlogy@pmtpims.org, संकेतस्थळ https://www.pravara.com/
तीन वर्षानंतर विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाच्या बाहेर पडण्याची मुभा आहे. अशा विद्यार्थ्यांना बी.एस्सी इन मेडिकल बायोटेक्नॉलॉजी ही पदवी प्रदान केली जाते.
(9) अम्रिता सेंटर फॉर अलाइड हेल्थ सायंसेस-
अभ्यासक्रम- बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी,कालावधी-चार वर्षे, अर्हता- 12 वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात 60 टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची 12 वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. उपलब्ध जागेनुसार गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो.
संपर्क – अम्रिता इंस्टिट्यूट फॉर अलाइड हेल्थ सायन्सेस, अम्रिता विश्व विद्यापीठम, हेल्थ सायंसेस कॅम्पस, एआयएमएस पोनेक्करा, पोस्ट ऑफिस कोची- 682041, दूरध्वनी- 0484-2858383, फॅक्स- 2858374, ईमेल- ugadmissions@aims.amrita.edu
,संकेतस्थळ- aims.amrita.edu
(10) के.जे सोमय्या मेडिकल कॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर–
अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी,कालावधी- एक वर्षं या अभ्यासक्रमांतर्गत बायोकेमेस्ट्री, मायक्रोबॉयलॉजी आणि पॅथलॉजी या तीन विषयांपैकी कोणत्याही एकामध्ये स्पेशलायझेशन करण्याची सुविधा आहे.
संपर्क-सोमय्या विद्याविहार, कॉम्प्लेक्स, पूर्व द्रुतगती मार्ग, सायन(पूर्व), मुंबई-400022, दूरध्वनी- 022-50954700, ईमेल- somaiyamedical@somaiya.edu, संकेतस्थळ-
000