साधना आणि संधी
शास्त्रीय संगीत आणि नृत्यामध्ये करिअर करण्याची इच्छा आणि आवड असली तरी, यासाठी अतिशय कष्ट करण्याची गरज असते. या क्षेत्रात लगेच संधी मिळेल असे संभवत नाही. त्यामुळे आपली कला सातत्याने उजळण्यासाठी सरावाच्या साधनेला पर्याय नसतो. प्रतिभा आणि परीश्रमाच्या बळावर संधी मिळू शकते. गुरुंकडे प्रशिक्षणाच्या सर्व बाबी आणि पैलू हस्तगत केल्यावर त्याचा वापर सर्जनशीलतने आपल्या कलेत सादर करता येणे गरजेचे आहे. तुमची कला ही इतरांपेक्षा वेगळी असेल तर रसिकांचे लक्ष कोणत्याही टप्यावर जाऊ शकते. चिकाटी ही सुध्दा महत्वाची ठरते. कोणत्याही टप्प्यावर नैराश्याला थारा देता कामा नये.
संगीत-नृत्य शिकवणा-या संस्था
(१) भातखंडे राज्य संस्कृती विश्वविद्यालय हे देशातील शास्त्रीय संगीत आणि नृत्य या विषयांमध्ये शिक्षण – प्रशिक्षण देणारी महत्वाची शिक्षण संस्था आहे. पूर्वी ही संस्था भातखंडे म्युझिक इंस्टिट्यूट या नावाने ओळखली जात असे. आक्टोबर 2000 मध्ये या संस्थेस केंद्र सरकारने डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला. गेल्या अनेक वर्षात या संस्थेत अनेक श्रेष्ठ गुरु आणि तज्ज्ञांनी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे.
अभ्यासक्रम
या विद्यालयात पुढील विषयांचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. (1) कंठसंगीत (शास्त्रीय कंठसंगीत, ठुमरी, दादरा, सुगम संगीत), (2) नृत्य (कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, लोकनृत्य), (3) स्वरवाद्ये (सतार, सरोद, गीटार, व्हायोलिन, सारंगी, हार्मोनिअम, बासरी), (4) तालवाद्य – (तबला ,पखवाज) आणि (5) संगीतशास्त्र. या पाचही प्रकाराचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाच स्वतंत्र विभाग आहेत.
अभ्यासक्रम – (अ) (1)बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स, कालावधी- तीन वर्षे, (2) मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट् स, कालावधी- दोन वर्षे. (ब) दोन वर्षे कालावधीचे पदविका अभ्यासक्रम- (1) प्रवेशिका, (2) परिचय,(3) प्रबुध्द, (4) पारंगत,(क) दोन वर्षं कालावधीचे स्पेशल अभ्यासक्रम- (1) ध्रुपद धमार , (2) ठुमरी दादरा, (3) हार्मोनियम, (4) लोकनृत्य, (4) सुगम संगीत (क) एक वर्षं कालावधीचे स्पेशल अभ्यासक्रम – (1) लोकसंगीत , (2) ढोलक
प्रवेश प्रक्रिया
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी साधारणत: 9जुलै ते 17 जुलै रोजी चाळणी परीक्षा घेतली जाते. निकाल 20 जुलै रोजी लावला जातो. 27 जुलैपासून प्रत्यक्ष शिकवणीस प्रारंभ होतो. 25 मे ते 25 जून या कालावधीत प्रवेश अर्ज करता येतो. भारत सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास संवर्ग आणि दिव्यांगांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी संबंधित संवर्गातील उमेदवारांनी अर्ज न केल्यास त्या जागा खुल्या संवर्गातील संवर्गातून भरल्या जातात.
निवास व्यवस्था
या संस्थेत मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात 60 विद्यार्थींनीच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. मुलांच्या वसतिगृहाची क्षमता 15 विद्यार्थ्यांच्या निवासापुरती मर्यादित आहे.
संपर्क-
संपर्क: भातखंडे राज्य सांस्कृतिक विद्यापीठ, 1 कैसरबाग लखनौ(उत्तरप्रदेश.)-२२६००१, संकेतस्थळ -www.bhatkhandemusic.edu.in, ईमेल-info@ www.bhatkhandemusic.edu.in दूरध्वनी–०५२२–४०४५६८६/२६१०२४८,फॅक्स–२६२२९२६
०००
(2) श्रीराम भारतीय कला केंद्र
दिल्लीस्थित श्रीराम भारतीय कला केंद्र, ही संगीत आणि नृत्य या विषयात शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी देशातील महत्वाची संस्था आहे. दिल्लीतील सांस्कृतिक संस्थांचे केद्र बनलेल्या मंडी भागात ही संस्था कार्यरत आहे. संस्थेची स्थापना 1948 साली करण्यात आली. या संस्थेला मनुष्यबळविकास मंत्रालायाने मान्यता प्रदान केली आहे. या संस्थेचे शैक्षणिक वर्षं दरवर्षी 1 जुलै रोजी सुरु होते.
या संस्थेत (1) हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ गायन – खयाल, (2) हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ सुगम गायन आणि गझल, भजन आणि गीत गायन, (3) तबला/ सतार/ सरोद , (4) कथ्थक (जयपूर घराणे आणि लखनौ घराणे), (5) भरतनाट्यम (कलाक्षेत्र शैली), (6) ओडिशी (केलूचरण मोहपात्रा शैली), (7) छाऊ (मयूरभंज शैली), (8) नृत्य-नाट्य याविषयांचे प्रशिक्षण घेता येते.
संस्थेत पुढील अभ्यासक्रम चालविण्यात येतात- (1) संगीत आणि नृत्य रसग्रहण अभ्यासक्रम, कालावधी- एक ते दोन वर्षे, (2) प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी- 3 वर्षे, (3) पदविका अभ्यासक्रम, कालावधी – 2 वर्षे, (4) पदविकोत्तर अभ्यासक्रम, कालावधी –2 वर्षे, (5) व्यावसायिक अभ्यासक्रम- हा अभ्यासक्रम पदविकोत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर करता येतो. कालावधी- एक वर्षाच्या पुढे.
संपर्क– श्रीराम भारतीय कला केंद्र, इंस्टिट्यूट ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक ॲण्ड डान्स, 1 कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- 110001, दूरध्वनी- 011-43503333, टेलेफॅक्स-23386428, ईमेल- sbkk@thekendra.com, संकेतस्थळ- sbkk.in
०००
(३) कंटेम्पोरेरी वेस्टर्न म्युझिक
नर्सी मोंजी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेने हा बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन कंटेम्पोररी वेस्टर्न म्युझिक हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. यामध्ये संगीताचा इतिहास, व्यवसाय, संगीत तंत्रज्ञान, संगीत सिध्दांत संगीत रचना, की-बोर्ड अभ्यास, म्युझिक अरेंजिंग, कंपोझिशन प्रॉजेक्ट्स अशा विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:चा संगीत अल्बम यू-ट्यूबवर अपलोड करावा लागतो. त्याची लिंक संस्थेकडे पाठवावी लागते. त्यानंतर मुलाखत आणि कलचाचणीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते.
या संस्थेने बीए इन इंडियन म्युझिम हा दुसरा अभ्यासक्रमही सुरु केला आहे. कालावधी-तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण
संपर्क– एनएमआयएमएस, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट् ,दादाभाई रोड, सीएनएमएसच्या बाजूला, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई–४०००५६, संपर्क –०२२–४२३३३०८८, sopa@nmims.ed,संकेतस्थळ–performingarts.nmims.edu
००००
(४) संपर्क – (म्युझिक प्रॉडक्शन ॲण्ड कम्पोजिझन या अभ्यासक्रमासाठी) व्हीसलिंग वूड्स इंटरनॅशनल,फिल्मसिटी कॉम्प्लेक्स,गोरेगाव(पूर्व) मुंबई–४०००६५,दूरध्वनी–०२२-३०९१६१४६/३०९१६००/८४५१८०३८५२ ईमेल-admissions@ whistlingwoods.net संकेतस्थळ -www.whistlingwoods.net
०००
मनोरंजन क्षेत्रातील संधी
फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया – भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या कार्यरत असणाऱ्या या संस्थेने टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात उत्तम करिअर घडवणे शक्य व्हावे यासाठी पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
1) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्क्रीन रायटिंग (फिल्म,टीव्ही ॲण्ड वेब सिरीज), कालावधी – दोन वर्षे, अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी.
(2) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिप्लोमा इन डायरेक्शन ॲण्ड स्क्रीनप्ले रायटिंग (कालावधी- तीन वर्षे. अर्हता – कला/ वाणिज्य/ विज्ञान शाखेतील पदवी).
निवड प्रक्रिया- अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी 100 गुणांची चाळणी परीक्षा (जॉईंट एन्ट्रन्स टेस्ट) घेतली जाते. कालावधी – तीन तास. या परीक्षेत विशिष्ट गुण मिळणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. अंतिम निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि प्रात्यक्षिकांमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते.परीक्षा केंद्रे-मुंबई आणि पुणे.
संपर्क– फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे- 411004, दूरध्वनी- 25580005, टेलेफॅक्स-2558007, फॅक्स- 22580152 ईमेल- academics.office@ftii.ac.in, संकेतस्थळ- http://www.ftiindia.com.
०००
कौशल्य विकास
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या संस्थेला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत माध्यमे आणि मनोरंजन कलेशी निगडित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुरु करण्यास परवानगी दिली आहे. हे लघु कालावधीचे अभ्यासक्रम पुणे, गौहाटी,जयपूर आणि विशाखापट्टणम येथे चालवले जातात.
संपादन, मेकअप आर्टिस्ट, कॅरेक्टर डिझाइन, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट सेट कार्पेंटर, साऊंड असिस्टंट, असिस्टंट कॅमेरामन, युनिट प्रॉडक्शन मॅनेजर, पटकथा लेखन, डिजिटल व्हिडिओ एडिटिंग या अभ्यासक्रमांना मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांविषयी प्रत्यक्ष संपर्क साधणे उचित ठरेल.
०००
पॉडकॉस्टिंगचे तंत्र
इंट्रोडक्शन टू पॉडकॉस्टिंग ॲण्ड ऑडिओ मीडिया हा आठ दिवसांचा ऑनलाइन अभ्यासक्रम फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या संस्थेने सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात विविध पोडकास्टची ओळख आणि ध्वनी प्रक्षेणाच्या पध्दती, पॉडकास्टसाठी तांत्रिक साहित्याची उपलब्धता, ध्वनीमुद्रण कथाकथनाचे तंत्र, पॉडकास्टची निमिती, ध्वनीमुद्रण आणि संपादन, तुमची ऑन एअर ओळख निर्मिती, कार्यक्रमाची सहिंता लेखन आणि सादरीकरण, आवाजातील चढउतार आणि सादरीकरण, स्वत:ची पोडकास्ट वाहिनी सुरु करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.(संस्थेच्या संकेतस्थळावर याचे वेळापत्रक जाहीर केले जाते.) संपर्क ईमेल-info.cfol@ftii.ac.in, दूरध्वनी- 020–25580085
सुरेश वांदिले