(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शॉक ट्रिटमेंट

मालकीनबाई घरी नाही हे बघून मार्गारेट मावशीने बाहेर मोकळ्या हवेत फिरुन येण्याचं ठरवलं. तिने रॉबिन्सनला इशारा केला. तो काय, नेहमीच बाहेर उंडारायला तयार असायचा. नेपोलीयन डॉगीपासून संरक्षण करण्यासाठी मामाचा उपयोग ढालीसारखा मावशी करुन घ्यायची. घराबाहेर पडल्याबरोबर मावशीने...

निष्कारण रागाचा विनाकारण प्रताप

“या पावसाने नुसता वैतागच आणलाय. आईने चिडून प्रतिक्रिया दिली. तिला भिशीपार्टीसाठी बाहेर जायचं होतं, नि नेमकी पावसाची रिपरिप सुरु झाली. येईल नि लगेच जाईल असं तिला वाटलं. पण, आधी हळूवार येणाऱ्या पावसाने नंतर चांगलाच जोर धरला. त्यामुळे आई वैतागली. तिच्या वैतागण्याकडे...

माझं नाक,माझी शक्ती!

“या मार्गेटलीचं काही कळतच नाही बुवा. त्या नेपोटल्या-फिपोटल्यावर एवढी खार खाऊन असते. पण आज म्हण्ये त्याला काँग्रेटस द्यायला जावू. येडी झालीय मार्गी. नेपोटल्या काय हिला थँक्यू म्हणणार का? की त्याचं हाडूक देणार हिला चघळायला? उलट आयतीच मेजवाणी चालत आली म्हणून तो थयथय...

आरोग्यासाठी एआय!

तशी त्याची आवडनिवड जरा वेगळीच समजायला हवी. एखाद्या आजारामुळे किंवा शारीरिक दु:खामुळे कुणी त्रासलेलं दिसलं की याला वाटायचं की आपण यांचं दु:ख, त्रास दूर करण्यासाठी काहीतरी करायला हवं. एकदा रायपूरला तो त्याचा जवळच्या मित्राच्या घरी गेला असताना या मित्राचे बाबा, यकृताच्या...

शिवमणीचा वारसदार!

एके दिवशी वर्ग सुरु असतानाच, त्याला कंटाळा आला नि तो आपला डेस्क वाजवू लागला. सरांनी मागे वळून बघितलं. आता या मुलाला चांगला ओरडा मिळणार असं इतर विद्यार्थ्यांना वाटलं, पण झाल भलतच. त्याला रागावण्याऐवजी सरांनी त्याची पाठ थोपटली, मस्त झक्कास वाजवलं असं कौतुक केलं....

गोष्टिच्या गमतीचं ‘गणित’!

मालकीनबाई जरी दुष्ट, खाष्ट आणि मार्गारेट मांजर मावशीवर सतत हाटहूट करत असल्या तरी त्यांचा मूड जेव्हा चांगला असेल तेव्हा शेजारच्या लहान मुलांना बोलावून त्या गोष्टी सांगत. या गोष्टी एकताना मुलं रंगून जात. मार्गारेटसाठी असणारी खाष्ट बाई, मुलांसाठी मात्र गोड गोष्टिवाली...