(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कुलूप “कटकट”

मार्गेटले, कुलूप कुठं ठेवलय गं, दिसतय का तुला? मालकीनबाईंनी आवाज दिला. “ठेवणार या आणि आठवणीची अपेक्षा माझ्याकडून. वारे वा! वारे वा! चांगला मामला आहे हा,” मार्गाारेट स्वत:शीच पुटपुटली. पुन्हा मालकीनबाईंचा आवाज आला. “मार्गे खादाडे, तुला काहीच कसं लक्षात राहत नाही. आँ!”...

आनंद व्दिगुणित!

बघताबघता दिवाळी आली आणि गेलीसुध्दा. दिवाळीच्या पाच दिवसात तेजोमयीच्या घरी निव्वळ धमाल होती. आईने बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थ्यांची मेजवाणी, गप्पा, पत्ते, टीव्हीवरचे कार्यक्रम, नव्या कपड्यात सजणं, असा सगळाच आनंदीआनंद! भाऊबिजेच्या दिवशी, आईबाबांसोबत तेजोमयी एका...

महाराजांचा कोणता आदर्श?

“महाराजांचा तुम्ही आदर्श ठेवला पाहिजे.” गोष्टीचा शेवट केल्यावर आजी टिल्लूला म्हणाली. कोणतीही गोष्ट सांगितली की आजी, याचा हा आदर्श ठेवला पाहिजे, त्याचा तो आदर्श ठेवला पाहिजे असं सांगायची. त्याशिवाय तिची गोष्ट पूर्ण होत नसे. “समजा, मी महाराजांचा आदर्श नाही ठेवला तर काय...

पिवळी जादू

आज हलवायाच्या दुकानातल्या दुधावर डल्ला मारण्याची इच्छा रॉबिन्सनला झाली. तसं त्याने मार्गारेट मावशीला सांगितलं. मालकीनबाईंच्या घरचं दूध  मार्गारेटला आजकाल जरा बेचव वाटू लागलं हेातं. त्यामुळे ती लगेच तयार झाली. दुपारी मालकीनबाई झोपल्या. ही संधी साधून दोघेही,...

आजचे, ‘नरकासूर!’

आज नरकचतुर्थी असल्याने, पहाटेच तेजोमयीच्या घरी सगळे जण उठले. अलेक्झांडरसह सगळयांचं अभ्यंग स्नान झालं. या छान आनंदी वातावरणात बाबांनी, यू-ट्युबर हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन लावलं. घरातलं वातावरण आणखी प्रसन्न झालं. हे सगळं काळजीपूर्वक बघणाऱ्या अलेक्सा गोर्जीला फार...

रहस्याचं गणित!

टिल्लूचे आईबाबा दोघेही,एका संगणक कंपनीत मोठ्या हुद्यावर होते. त्यांना दररोज सकाळी लवकरच ऑफिसमध्ये जावं लागे.तर यायला उशीर होत असे.त्यामुळे खाण्यापिण्याचे त्यांचे आबाळ होऊ लागले.टिल्लूलाही त्याचा फटका बसला.यावरचा तोगडा म्हणून त्यांनी, एक स्मार्ट रेफ्रिजरेटर घरी...