(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

चमत्कार?

यंदा बाप्पा कोणता चमत्कार घडवतात, याची वाट तेजोमयी बघू लागली. बाप्पा जाण्याची वेळ आली तरी बाप्पा शांतच! तिने मूषकस्वामींकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. पण तोही आपला ध्यानस्थ! तेजोमयीकडे त्याने ढुंकूनही बघितलं नाही. “तुम्हाला काय वाटतं?” तेजोमयीनं बाबांना विचारलं. “मला,...

बाप्पांच्या फुलातील अळी

बाप्पांच्या आगमनानंतर तेजोमयीच्या घरी फुलांनी सुंदर सजावट केली गेली. बाप्पांना मखरात साग्रसंगीत बसवलं गेलं. बाबांनी पूजा केली. पुजेची तयारी आईने करुन दिली होती. तेजोमयीनेही बरीच मदत केली. पूजा सुरु असतानाच एका फुलातून अळी बाहेर आल्याचं, तेजोमयीनं बघितलं. तिची चुळबूळ...

पृथ्वी प्रदक्षिणेचा नवा अर्थ

बाप्पांची एक गोष्ट बाबा तेजोमयीला सांगत होते. तशी ती सर्वांनाच ठाऊक असलेली. बाप्पा आणि त्यांचे बंधुराज कार्तीकस्वामी यांच्यात एकदा स्पर्धा लागली, की कोण सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतो ते. यावेळी नारदमुनी तिथेच होते. पार्वती माता आणि महादेवांना वंदन करुन...

नवा धडा

तेजोमयीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांना मखरात बसवलं गेलं. सजावटीसाठी बाबांनी खूप फुलं आणली होती. तिघांनीही मिळून छान सजावट केली. मखरात बसलेला  कुणीतरी खासा असल्याचं अलेक्झांडर  ला कळलं होतं. त्यामुळे तोही कौतुकानं तिघांच्या सजावटीकडे बघत होता. हे तिघेही काम...

अलेक्झांडरचा सन्मान

घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्यावर भुंकायचं नाही, असं वारंवार अलेक्झांडरला सांगितल्यानं,त्याला तशी सवय लागली. बेल वाजली की आई-बाबा किंवा तेजोमयी पैकी कुणीही दार उघडायला जाण्याआधी ही स्वारी, येणाऱ्या व्यक्तीच्या स्वागतासाठी दारात हजर. घरी येणाऱ्या सगळयांसोबतच त्याची...

रंग भारी, मस्त तपकिरी!!

“ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे ! खा माझ्या सवे!! दोघेही होऊ मस्त स्ट्राँग ! नाचू मग ढिंगटाँग टिंगटाँग ढिगटाँग!” असं गाणं गात मार्गारेट मावशी भिरभिर नजरेनं इकडेतिकडे बघत होती. तिचं भिरभिरणं काही थांबतच नव्हतं. हे बघून रॉबिन्सन मामाने न राहवून विचारलच शेवटी तिला....