(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मंत्र्यांच्या विरोधात गेलेली मुलगी

आपल्याच देशातील सर्व शक्तीमान अशा मंत्र्यांच्या विरोधात थेट न्यायालयात खटला भरण्याचं तिचं धाडस, तिच्या समवयस्क मित्र मैत्रिणींना तोंडात बोट घालवणारं आणि मी मी म्हणवणाऱ्या मोठ्यांची बोलती बंद करणारं ठरलं. ही गोष्ट घडली ऑस्ट्रेलियात. या देशाच्या पर्यावरण मंत्री सुसान ले...

खरा हिरो

“माझ्या बाबांची आराममशीन होती. आराममशीन म्हणजे तुम्हाला ठाऊकाय का काय, असते ती? तर या आराममशीनमध्ये मोठमोठे लाकडं टाकतात ‍नि त्याच्या फळ्या तयार करतात. ही आमची आराममशीन काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा खेड्यात होती. या आराममशीनच्या कारखान्यात जायला मला आवडायचं....

पाण्याची काळजी आणि आकाशातला सन्मान

तिच्या आई-बाबांचा  अजिबात विश्वास बसत नव्हता. त्या बातमीवर. कसा बसणार? त्यांच्या १५ वर्षीय कन्येला असा काही अफलातून सन्मान मिळू शकतो, असं त्या दोघांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र जगात काहीच अशक्य नाही हे वचन सत्य असल्याची त्यांची खात्री, आपल्या मुलीला मिळालेल्या...

“तीचा ” सवाल शिकायचं कशाला?

सॅनफ्रँसिस्को, हे अमेरिकेतलं मोठं शहर. या शहरात सिटी हॉल नावाच्या नामांकित ठिकाणी, या शहरातील मोठी-जाणती-सुजाण माणसं वेगवेगळया कामानिमित्त सतत जात येत असतात. हा हॉल या मोठ्या माणसांनी गजबलेला असतो. या हॉलच्या प्रवेशव्दाजवळ दर शुक्रवारी न चुकता, ती मुलगी ठरलेल्या वेळी...

रेश्माचं झाडं होताना…

अभ्यास करताकरता रेश्माचा डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. लगेच ती गाढ निद्रेत गेली. मध्यरात्र उलटून गेली होती. रेश्माच्या स्वप्नात दोन झाडं आलीत. या झाडांना बघून ती दचकली. कारण ती काही फळा-फुलांनी बहरलेली हिरवीगार झाडं नव्हती. तर जळून काळी ठिक्कर पडलेली, फांद्यांची...