(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
मी बिच्चारी नाही!

मी बिच्चारी नाही!

जे काही माझ्या बाबतीत घडलंय,त्याचं दु:ख किती दिवस कुरवाळत बसणार?शिवाय मला कुणी बिच्चारी,अरेरे,असं म्हंटलेलं अजिबातच आवडत नाही.जरी मी लहानपणापासून दृष्टिहीन असले म्हणून, मी बिच्चारी कशी बरं झाली?हीच पुढं काय होणार,असं कुणी माझ्या आईबाबांना म्हंटल तर मला फार फारच राग...
मयूर नृत्य

मयूर नृत्य

एकदा मोरांच्या कुटुंबातील सर्वात वयोवृध्द आजोबांच्या वाढदिवसासाठी त्यांचे बरेच नातेवाईक गोळा झाले. वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला. खाणं-पिणं झाल्यावर मोर मंडळी गप्पांमध्ये रंगून गेली. एका नातवाने आजोबांना विचारलं, “आजोबा आम्ही असं ऐकलय की, आपल्या एका...
डाव उलटला

डाव उलटला

एकदा कोल्होबा आणि लांडगोबांनी ठरवलं की, सिंहासारखा आळशी प्राणी आपला राजा कसा काय राहू शकतो? यापुढे त्याला वननगरीचा राजा राहू द्यायचा नाही. आता आपणच सत्ता हाती घेतली पाहिजे. “तुम्ही राजे!” लांडगोबा कोल्होबांना म्हणाले. “तुम्ही आमचे प्रधान!”...
खरं कुणाचं?

खरं कुणाचं?

उंदीर जरी मामा असले आणि श्रीगणेशाच्या जवळ असताना ते मूषकस्वामी असले, तरी घरी अधूनमधून येऊन दंगामस्ती करुन जाण्याची त्यांची खोड काही आईस आवडायची नाही. उंदीरराव घरात दिसले रे दिसले की आई ते मामा आहेत की मूषकस्वामी याची कोणतीही तमा न बाळगता त्याच्या पाठीमागे लागायची....
वाघोबावर विश्वास ठेवा

वाघोबावर विश्वास ठेवा

सुट्यांमध्ये करायचं काय, असा प्रश्न तेजोमयीला पडायचा. फिरणार किती, पत्ते कुटणार किती, टीव्ही पाहणार किती, चित्रपटांना जायचं किती असे अनेक प्रश्न तिच्या मनात रुंजी घालायला लागले. त्याच त्याच गोष्टी किती वर्ष करायच्या ? व्यक्तिमत्व विकास कँपचा तर तिला कंटाळा आला होता....
पुसीची भ्रमंती

पुसीची भ्रमंती

पुसीची भ्रमंती आज सकाळपासूनच पुसी कॅटची लगबग सुरु होती. बाहेर जाण्यासाठी तिने छान तयारी केली. ‘अगं, तू इतकी नटूनथटून चाललीस तरी कुठे?’ रोनाल्डो डॉगीने तिला विचारलं. ‘चक्कर मारुन येत जरा.’ ‘अगं, तू दररोजच चक्कर मारायला जातेस. घरी आईबाबा...