by sureshwandile.web@gmail.com | Apr 24, 2024 | बालकथा
परवा तेजोमयी,बाबा,आई आणि अलेक्झांडर कॉलनीच्या आवारात फिरत असताना एक मांजर अचानक आडवी धावत गेली. आई तिथेच थांबली आणि सात पावलं मागं गेली. ती परत आल्यावर चौघं पुढे चालू लागले. वाटेत एक उंदिर आडवा गेला. आता आई पुन्हा सात पावलं मागं जाईल म्हणून तेजोमयी आणि बाबा थांबले. हे...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2024 | बालकथा
पुस्तकाच्या शोधात… “आजची मुलं कुठे पुस्तक वाचतात हो”, रवीचे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे ते रवीसाठी क्वचितच पुस्तक आणत. त्याला अजिबातच आवड नाही. असं कौतुकानं सांगत. पण खरंच त्याला आवड नव्हती का? की बाबांनीच आपलं मत बनवलं होतं, इतरांचं ऐकून? हा प्रश्न...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 15, 2024 | बालकथा
बरेच दिवसांनी आजी तेजोमयीच्या घरी आली. तेजोमयीस खूप आनंद झाला. ती आजीची फार लाडकी. आजीजवळ गोष्टींचा खूप मोठा खजिना. खाऊ आणि हा खजिना आजी तिच्यासाठीच राखून ठेवायची. आजीने दारात पाऊल टाकताच, तेजोमयीनं तिला मिठी मारली. आजीने तिचे गालगुच्चे घेतले. अलेक्झांडरला आणल्यावर...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 14, 2024 | बालकथा
चौदा पुस्तके! बाबासाहेब कोणतीही पूर्वसूचना न देता तेजोमयीच्या घरी आले. त्यांना बघून सर्वांची धांदल उडाली. आईबाबांनी त्यांना घाईघाईत दंडवत घातला. तेजोमयीनेही तेच केलं. ते बघून अलेक्झांडरनेही तशीच कृती केली. बाबासाहेबांनी अलेक्झांडरला जवळ घेतलं. त्याच्या मानेवरुन मायेनं...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 13, 2024 | बालकथा
गुणी बाळ अलेक्झांडरचं घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षण चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो बरोबर त्याच्या पध्दतीने...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 12, 2024 | बालकथा
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार 1 पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली. तक्रारीचा विषय होता, पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप. आरोपात काय होतं, तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की, पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही. त्याच्या...