(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बाळाचा चांदोबा…

     बाळाचा चांदोबा… बाळास चांदोबा फार आवडतो. संध्याकाळी किंवा रात्री तो आभाळात दिसायला लागला की बाळाची कळी खुलते. गॅलरीतल्या खिडकीत जाऊन तो न्याहळत बसतो. चांदोबाकडे बघत बघत छान जेवणही करतो. कधी कधी चांदोबाच्या समोरुन ढग जातात. त्यावेळी चांदोबाचं दर्शन होत नाही....

लहान तोंडी…

       लहान तोंडी… सध्याच्या वननगरितील सिंह महाराजांचे चिरंजीव म्हणजेच  युवराज फार भित्रे होते. त्यांना कशाचीही भीती वाटायची. एकदा ते न्याहरी करुन विश्रांती करत असताना, चार उंदिर त्यांच्या अवतीभवती गोळा झाले नि खेळू लागले. उंदरांच्या आरडओरडीमुळे युवराजांना जाग...

एक ना धड ..

  एक ना धड ..     गॅदरिंग आलं नि तेजोमयीच्या ग्रुपमध्ये उत्साह संचारला. हा ग्रुप नेहमी सांस्कृतिक कार्यकक्रमात सहभागी होण्यात आघाडीवर असायचा. या ग्रुपने एक नृत्य आणि एक नाटक बसवण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे जमवाजमव झाली. मग तालमी सुरु झाल्या.     या ग्रुपमध्ये असलेली...

बद्रुद्दिन ओझा

   बद्रुद्दिन ओझा  तेजोमीयची चुलत बहीण कल्याणी परदेशात शिक्षणासाठी नुकतीच गेली. तिला पोहचवायला आईबाबांसोबत तेजोमयी सुध्दा विमानतळावर गेली होती. हे तिघेही विमानतळावर पोहचले तरी कल्याणी आणि तिचे आईबाबा अद्यापही पोहचले नव्हते. कल्याणी तेजोमयीच्या बाबांची फार लाडकी. तिला...

   कोल्हा फसला..  एकदा, एका बिळात राहणाऱ्या सशाकडे कोल्ह्याचे लक्ष गेले. हा आपल्या तावडीत सापडला तर त्याच्या मऊ मऊ मासावर मस्त मेजवाणी झोडता येईल, असे कोल्ह्यास वाटले. आता ससा कधी बिळाच्या बाहेर पडतो, याची तो बराच वेळ वाट बघत बसला. अधूनमधून तो बिळाच्या समोर येराझा-या...

मिशन एक्स

  मिशन एक्स  खरं तर तेजोमयीचा पहाटेच्या स्वप्नांवर फारसा विश्वास नाही. ती विज्ञानाची विद्यार्थीनी. त्यातही गणितात विशेष आवड. त्यामुळे कोणत्याही आभासी गोष्टींमध्ये तिला रस वाटत नसे. विज्ञानाचा पाया गणित असल्यानं आणि ते सिध्द करावं लागत असल्यानं तिला स्वप्न बिप्न भाकड...