(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

डिजिटल तुरुंग

डिजिटल तुरुंग तेजोमयीच्या बाजूच्या सदनिकेत राहणाऱ्या सपाटे काका-काकूंनी, एक मनीमँऊ आणली. गोजरी, गोबरी, घाऱ्या डोळ्यांची! राजकन्याच जणू! या मनीला बघण्यासाठी, एकेदिवशी तेजोमयी आणि तिच्या आईबाबांना, त्यांनी निमंत्रण दिलं. आईबाबांनी मनीसाठी, छान खेळणं घेतलं नि मनीला...

मराठीची शक्ती!

मराठीची शक्ती! अलेक्सा गोर्जीने, तेजोमयीच्या कानात काहितरी सांगितलं. ते तिने  बाबांच्या कानात सांगितलं. आपल्याला कुणीच काही सांगत नाही, हे बघून अलेक्झांडरची चुळबूळ सुरु झाली. तेव्हा ही चूक तेजोमयीने लगेच दुरुस्त केली. अलेक्झांडरला जवळ घेऊन तेजोमयी, त्याच्या कानात...

चित्रकार सूर्योबा!

चित्रकार सूर्योबा! संधी मिळाली की मार्गारेट मावशी, रॉबिन्सन मामासोबत सूर्यास्ताच्या समयी बाहेर पडून, गावातील टेकडीकडे फेरफटका मारण्यासाठी निघायची. टेकडीच्या पाठीमागे सूर्य जाऊ लागताच, आभाळाचा निळा रंग बदलून आकाशात वेगवेगळे रंग दिसायला लागत. विशेषत: लाल, शेंदरी आणि...

ग्रंथालयात युध्द!

ग्रंथालयात युध्द! ग्रंथालयातील ग्रंथांना रात्री विश्रांती मिळायची. ग्रंथपाल आणि कर्मचारी घरी जाताना दिवे बंद करुन जात. या अंधार आणि शांततेमुळे ग्रंथालयातलं वातावरण भयाण व्हायचं. याची भीती वाटून, रहस्यमय विभागातील ग्रंथातील पात्रांना, या भयाण वातावरणातून पळून जावसं...

नियम महत्वाचा की आनंद?

नियम महत्वाचा की आनंद? वाळवंटाची सफारी करायला मिळणार म्हणून कल्याणी खुष होती. वाळूत खेळायचं, उड्या मारायच्या, वाळूच्या टेकडीवर धावत जायचं, घसरगुंडी करायची, वाळूंच्या टेकड्यांवर जाऊन बसायचं. फोटो काढायचे, अशा कितीतरी गोष्टी तिच्या मनात होत्या. सकाळी सहा वाजताच...

जादुचा दोरा

जादुचा दोरा स्पॉटला जेव्हा नुकतच कल्याणीच्या घरी आणलं,  तेव्हा  तो सुरुवातीला सकाळपासून निव्वळ मख्ख बसून असायचा. मान खाली, स्वत:ला गुंडाळून नि डोळे मिटून. मध्येच हळूवार पापण्या हलवून डोळे किलकिले करायचा. काहीक्षणात पुन्हा डोळे मिटायचा. मग, त्याच्या छोट्याशा मऊशार...