(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शेपटीच्या शोधात…

आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीतभीत विचारलं. “महाराज, आज आपली तब्येत बरी नाही का?” “अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही…”असं काही तरी गजराज म्हणाले. तेव्हा प्रधानजींसोबत दरबारातील इतरांच्याही...

पुसीची भ्रमंती

आईबाबा कधी ऑफिसला जातात याची वाट पुसी कॅट बघतच होती. ते जाताच तिने शेपूट वर आपला आनंद व्यक्त केल नि मग तिची लगबग सुरु झाली. घरातून बाहेर जाण्यासाठी तिने छान छान तयारी सुरु केली.नटली.थटली. आरशात बघून स्वत:वरच खुष झाली.हे सगळं रोनाल्डो डॉगी बघत होता.आईबाबा गेले की ही...

हत्तीशी मैत्री

कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… “कावळोबा सकाळपासून बघतेय,  तुझं चित्त काही थाऱ्यावर...

दूरुन डोंगर साजरे!

मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा या दोघांना रात्री चंद्रदर्शन करायला फार आवडायचं. मालकीनबाई झोपल्या की दोघं हळूच खिडकीतून बाहेर पडत नि टेरेसवर जाऊन चांदोबाकडे टक लावून बघत. चांदोबावर जाता आलं तर काय धम्माल येईल असं रॉबिन्सनला नेहमी वाटे. तो प्रत्येक वेळी...

अनमोल झेप

ते वर्षं होतं २०२४. महिना फेब्रुवारी. भारताच्या महिला बॅडमिंटन चमूने पहिल्यांदा आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकून विक्रमाची नोंद केली. यासाठी सर्वाधिक महत्वाची कामगिरी ‘तिने’ बजावली.     साखळी फेरितील अत्यंत अटीतटीच्या सामन्यात तिने चिनच्या वु लूओ यूचा परावभ केला....

आनंदानुभव

आमच्या कॉलनीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या झाडावर वर्षभर साम्राज्य असतं ते कावळ्यांचं. दिवसभर इकडून तिकडे उडून आले की ते या झाड्यांच्या फांद्यावर बसून कावकाव करतात. भूक लागली की पुन्हा उडतात. काही हुषार कावळे किचनच्या खिडकीजवळ येऊन आई-आजी-मावशीशी सलगी...