(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जादूची शाळा

बाबांनी टिल्लूच्या कानशिलात एक सणसणित ठेवली. बाबा असं काही करेल, हे टिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्यांना  हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर,  ते फार तर, “नाही रे माझ्‍या राज्या, पुन्हा कधीतरी”, असं...

कान्हा!

हेमामालीनी, माधुरी दीक्षित, उस्ताद तौफिक कुरेशी आणि तो यांच्यात काय साम्य असेल? तो अतिशय मधुर बासरी वाजवतो आणि त्याने या तिनही मान्यवरांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची साथसंगत केली आहे. या कलाकारांसमवेत त्याची जुगलबंदी रंगली आहे. तो बासरी वाजवतो तेव्हा, ऐकणारे श्रोते...

ताकापुरती आजी

परवा तेजोमयीने, ताकापुरती असलेली आजी हवी, असा हट्टच धरला. तिच्या  या हट्टाने बाबा चक्रावले. आई रागावली. अशी काही आजी नसते, असं आईने सांगून बघितलं. अशी आजी जर मी दाखवली, तर काय द्याल? तेजामयीने बाबांना थेट विचारलं. “आँ!” “अशी आजी कुठून...

अशूभ..

तेजोमयीच्या आजोळी आजोबांनी घराच्या अवतीभवती खूप झाडे लावली होती. त्यामुळे त्याचं छोटसं वनच झालं होतं. या झाडांच्या आश्रयाला बरेच पक्षी येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा किलबिलाट चालू असे. या झाडावरुन त्या झाडावर, त्या झाडावरुन त्या फांदीवर त्या पक्षांचं उडणं,...

शिवमणीचा वारसदार!

एके दिवशी वर्ग सुरु असतानाच, त्याला कंटाळा आला नि तो आपला डेस्क वाजवू लागला. सरांनी मागे वळून बघितलं. आता या मुलाला चांगला ओरडा मिळणार असं इतर विद्यार्थ्यांना वाटलं, पण झाल भलतच. त्याला रागावण्याऐवजी सरांनी त्याची पाठ थोपटली, मस्त झक्कास वाजवलं असं कौतुक केलं....

लस्सी बाद!

अलेक्झा गोर्जी आणि तेजोमयी यांच्यामध्ये आज बरीच वादावादी झाली. वाद घडला लस्सीवरुन! उन्हाळ्यात लस्सी पिण्याची मज्जाकाही औरच असते. त्यातही बर्फ टाकून थंडगार सायीसकट लस्सीतर, तेजोमयीची फारच आवडती. त्यामुळे यंदा, अशी झक्कास लस्सी, आपली सदनिका असलेल्या परिसरात कुठे मिळेल,...