(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
भूत जोकोलिया

भूत जोकोलिया

रॉबिन्सन उंदीर मामा, उदास चेहऱ्याने खाली मान घालून बसलेले मार्गारेट मनी मावशीनं बघितलं. मरु दे, आपल्याला काय त्याचं? असं तिचं एक मन म्हणालं. लगेच तिने एक डोळा बारिक करुन मामाकडे बघितलं. तिला त्याची दया आली. काही झालं तरी दोघांचं पटेना नि एकमेकावाचून वाचून करमेना असच...
“जंकू”ला करा टाटा!

“जंकू”ला करा टाटा!

मार्गारेट मांजर मावशीला, रॉबिन्सन उंदीर मामा आवडत नसला तरी, त्याच्यावाचून तिला करमतसुध्दा नसे. त्यामुळे दोनतीन दिवसांपासून तो जेव्हा घरी फिरकला नाही तेव्हा  तिला काळजी वाटली. मग तिने मामांवर पाळत ठेवली.  संध्याकाळ झाली की मामा कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशा...
कराटे गर्ल

कराटे गर्ल

सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीचं दिवाणखाण्यातील भिंतीकडे बघून कराटे खेळात जसे हूँ हाँ करत हातवारे केलं जातं, तसं सुरु झालं. अलेक्झांडर तिच्याकडे आश्चर्यानं बघून मध्येच दचकत असे. आपल्या अंगावर ही येते की काय या भीतिनं काही वेळाने तो तिच्यापासून दूर जाऊन बसला. हातवारे...
उपटसुंभांची बाग

उपटसुंभांची बाग

तेजोमयीच्या सदनिकेला तीन गॅलऱ्या आहेत. प्रत्येक गॅलरीमध्ये वेगवेगळी फुलझाडं आईनं लावली आहेत. या झाडांची सगळी देखभाल आईच करते. बाबांकडे या झाडांना पाणी देण्याचं काम. ते न चुकता दररोज सकाळी करतात. हे काम त्यांना आता आवडायला लागलय. सुरुवातीला भसाभसा पाणी टाकणारे बाबा आता...
आईचं दु:ख.

आईचं दु:ख.

तेजोमयीच्या कॉलनित खूप मनीमँऊ आहेत. त्या वेगवेगळया सदनिकांच्या दारांजवळ घुटमळतात. दुपारच्या वेळी निवांत ताणून देतात.जिन्यांच्या आडोशाला खेळतात.  बहुतेक मनीमँऊ धीट म्हणायच्या. कुणाला फारशा घाबरत नाहीत. वेगवेगळया सदनिकेत राहणारे काका-काकू, दादा-ताई, जेव्हा बाहेर पडतात...
आंब्याच्या आनंद

आंब्याच्या आनंद

तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला राहणाऱ्या देशपांडे काकांकडे कुरिअरने आंब्याची पेटी नुकतीच आल्याचं तिने बघितलं होतं. देशपांडे काकांना कुणीतरी भेट म्हणून पाठवलेली असावी किंवा मग त्यांनी ऑनलाइन आंबे बोलावले असावेत असं तिला वाटलं. आपले बाबा असं कां करत नाही बॉ, असा प्रश्न...